मतदार  जागृती व शिक्षण कार्यक्रम (स्‍वीप)

Date:

भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप)  या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदार वर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्‍यासाठी मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम फार महत्‍त्वाचा घटक ठरला आहे.

मतदान प्रक्रियेत मुख्यत्वे दोन महत्त्वाचे घटक-

१)    मतदान केंद्राची सुसज्ज व्यवस्था व सुलभ मतदान करण्याची व्यवस्था तयार करणे

२)    मतदारांना जागृत करून मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदान करण्यास आवाहन करणे आणि त्यासाठी नावीन्‍यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे.

आजपर्यंत जाणीव – जागृती कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थाद्वारे मुख्यत्वे पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, शपथ समारोह, प्रभात फेरी इत्यादी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. परंतु सध्‍याच्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी स्वीपमध्ये विशेषता नावीन्यपूर्ण कल्पना संकल्पना आणि मतदान मतदार जागृतीची शासन यंत्रणा उभी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नवीन संकल्पना सांगितल्या आहेत.

भारत निवडणूक आयोग नवीन संकल्पना-

१) चुनाव पाठशाळा

2) महाविद्यालय स्तरावर मतदार जागृती मंडळाची स्थापना,  प्रशिक्षण  कामे व जबाबदारी

३) माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर भविष्यातील मतदारांसाठी मतदान मतदार जागृती मंडळाची स्थापना व प्रशिक्षण

४) मतदार जागृती मंचाची स्थापना

सर्व शासकीय राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय,  स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये, कारखाने, सर्व खासगी व्यवस्थापनाची कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची कार्यालय याठिकाणी मतदार जागृती मंचाची स्थापना करून जाणीव जागृती उपक्रम, चर्चासत्र, स्पर्धा, दृकश्राव्य साधनांद्वारे जागृती आणि सर्व कर्मचाऱ्यांची मतदान नोंदणी करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे.
५) दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन- या लोकसभा निवडणुकांचे ब्रीदवाक्यच ‘सुलभ निवडणुका’  हे आहे. यात कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये.  दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्‍टया दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून त्यांच्यासाठी मतदार नोंदणी करण्यास मदत करणे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी – येण्यासाठी सहाय्य करण्यासाठी  स्वयंसेवकांची नियुक्‍ती करणे  इत्यादी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिव्यांग जनजागृती कार्यक्रमांमध्ये निश्‍चीत करण्‍यात आल्‍या आहेत.

६) महाविद्यालयातील कॅम्पस अँम्बेसिडरचा मतदार जनजागृतीमध्ये  सहभाग-     महाविद्यालय स्तरावर सहभाग वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तरुणांना प्रोत्साहित करून स्थानिक समुदायांमध्ये जसे ग्रामस्थ,  वस्ती- वाड्यांवर जनजागृतीच्या मोहिमांमध्‍ये  महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचा सहभाग वाढवणे.

मतदार जाणीव जागृती व शिक्षण यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी काय उपक्रम राबवू शकतात-

१) सर्व गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, पतसंस्था सहकारी संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन मतदारांसाठी शपथ समारंभाचे आयोजन, पथनाट्य, चर्चासत्र, दृक-श्राव्य साधनांद्वारे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या चित्रफिती, क्लिप्स, व्हिडीओ क्लिप्स, संदेश, चित्रसंदेश मतदारापर्यंत पोहोचविणे, स्पर्धांचे आयोजन करणे, विशेषत: महिला मतदार आणि युवक – युवती मतदारांचे  मेळावे, चर्चासत्र आयोजित करणे, सोशल मीडियाचा उपयोग करून आदर्श आचारसंहितेचे पालन करत मतदारापर्यंत मतदान जागृती संदेश पोहोचवणे.

२) शाळा आणि महाविद्यालय, माध्यमिक कनिष्ठ, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय इत्यादी स्तरावर स्थापन झालेला मतदार जागृती क्‍लबने  पथनाट्य बसवून महाविद्यालयात आणि महाविद्यालयाबाहेरील समुदायामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये वाड्या – वस्त्यांमध्ये त्या कार्यक्रमाचे आयोजन करणे.

३) ग्रामस्तरावर चुनाव पाठशाळा – ग्रामस्‍तरावर  चुनाव पाठशाळा सदस्यांना सक्रिय करून त्यांना मतदार जागृती प्रशिक्षण देणे आणि संबंधित मतदान केंद्र अधिकारी म्हणजे बीएलओ  यांच्याशी संपर्क करून ग्रामीण जनतेला जागृत करण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे करणे.

४) खाजगी संस्था, कंपन्या यांच्या मदतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची जागृती होण्यास सहाय्य करणे.मतदार जागृती मध्ये लक्षात घ्यावयाच्या विशेष बाबी-

१) आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओ  त्यांच्याशी सतत संपर्कात राहून त्यांना मतदार जागृती कार्यक्रम व मतदान नोंदणी अभियानात सक्रिय मदत करणे.

२) मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून मतदार नोंदणीची,  मतदान करण्यासाठीची  जागृती केली पाहिजे, असे पोस्टर, बॅनर, होर्डिंग याशिवाय सोशल मीडिया  म्हणजेच समाजमाध्यमे,  रेडिओ,  कम्युनिटी, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे मतदार जागृतीचे संदेश पोहोचविणे.

३) मतदार ओळखपत्र – प्रत्येक मतदारांना मतदार ओळखपत्र  बीएलओ द्वारा घेण्यासाठी मदत करणे आणि सहाय्य करणे.

४) मतदार सहायक केंद्राद्वारे मतदारांना आपले नाव तपासून पाहण्याची सोय उपलब्ध करून देणे, राज्‍याच्‍या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पोर्टलवरून मतदारांचे नाव यादीत आहे की नाही याविषयी त्यांना माहिती करून देणे.

५) नैतिक मतदानाची माहिती – मतदारांना नैतिक मतदानाची माहिती व जागृती करून देणे, भारतीय लोकशाहीत नागरिकांचे कर्तव्य आणि मतदानाची पावित्र्य राखण्यासाठी विविध माध्यमांद्वारे नैतिक मतदानाचे महत्‍त्व पटवून देणे, विशेषत:  चर्चासत्रे, वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, रॅली, मानवी साखळी व शपथपत्र इत्यादी माध्‍यमांचा  नैतिक मतदानासाठीचा उपयोग करता येतो.
६) मतदान केंद्राची माहिती सामान्य जनतेला पोहोचणे, मतदान केंद्रासंबंधी सहाय्य करणे.

७) आदर्श मतदान केंद्र उभारण्‍यासाठी विशेष मदत व सहाय्य करणे – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान प्रक्रिया लोकशाही उत्सव म्हणून साजरा करणे आणि प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे,

आदर्श मतदान केंद्रासाठी नावीन्‍यपूर्ण खालील बाबींचा उपयोग करता येईल.  १) पहिल्या शंभर मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्‍वागत करणे २) मतदान केंद्रावर रांगोळी काढणे आणि मतदान केंद्र सुशोभित करणे ३) मतदान केंद्रावर सनई चौघडे वाजविणे ४) दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर आहे की नाही याची चौकशी करून ते उपलब्ध करून देणे ५) ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे  इत्यादी नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या परिसरातील मतदान केंद्र आदर्श करण्याचा प्रयत्न करणे, जसे आपण समारंभासाठी जय्यत तयारी करतो तसे मतदान केंद्र साठी आणि मतदानासाठी तयारी करणे.

८) इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन (इव्हीएम) व्‍होटर व्‍हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल  (व्‍हीव्‍हीपॅट) बाबत जागृती – व्‍हीव्‍हीपॅट ही नवीन प्रणाली असून मतदारांना डेमो देऊन तज्ञ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून व्‍हीव्‍हीपॅट  जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे. या प्रणालीमुळे आपण मतदान कोणाला केले हे दिसते आणि पारदर्शकता निर्माण होते.

पुणे जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वीपचे सुभाष बोरकर, आशाराणी पाटील, यशवंत मानखेडकर हे विविध स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या सहकार्याने मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवत आहेत.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आकांक्षा रंजनच्या ‘इक्का’ची झलक; कोर्टरूम थ्रिलरमध्ये दिसणार नव्या अंदाजात

मुंबई | अभिनेत्री आकांक्षा रंजन आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत वेगळेपणा...

‘मसाला किंग’ धनंजय दातार यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला शाहरुख खान, सोनू निगम यांची उपस्थिती

मुंबई | प्रतिनिधी 'मसाला किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती धनंजय...

युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टची भेट

ऐल्फा  च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील जोग महाराज व्यायामशाळेला...

लॉरिट्झ नुडसेनने 50 GW सौर क्षमता सक्षम असल्याचे सिद्ध केले.

जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये आपल्या भूमिकेचे केले समर्थन युटिलिटी स्केल सोलर फार्म्सपासून घरांना प्रकाश देणाऱ्या रूफटॉप सिस्टीम्सपर्यंत लॉरिट्झ नूडसेन सौर घटक उत्पादन संयंत्रांना केटरिंगसह, ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी आपला सात दशकांचा वारसा - स्वच्छ ऊर्जेचा लाभ बाजारपेठेतील समुदायांपर्यंत पोहोचविण्यास मदत करत आहे मुंबई, : आपल्या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल तंत्रज्ञानाने संपूर्ण भारत आणि जागतिक बाजारपेठेत 50 GW पेक्षा जास्त सौरऊर्जेची क्षमता निर्माण केल्याचे भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने आज जाहीर केले आहे. केवळ सौरऊर्जा क्षमता निर्मिती नाही तर त्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, व्यापक उपलब्धता, कारखाने, शेत, घरे आणि सेवा उपलब्ध न होणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचणे, राष्ट्रीय ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक विस्ताराला समर्थन देण्यासाठी सौर ऊर्जा सक्षम करण्यावर हा महत्त्वाचा टप्पा स्पष्टरित्या लक्ष केंद्रित करतो. भारताचा सौर प्रवास आता मोठ्या युटिलिटी पार्कपुरता मर्यादित राहिलेला नाही. पीएम-कुसूमद्वारे सिंचनाची उर्जा, पीएम सूर्य घर अंतर्गत कुटुंबांना सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत - पारंपारिक ग्रीडच्या आवाक्याबाहेरील समाजापर्यंत खात्रीशीर वीज पर्याय उपलब्ध करून देणे, हे देखील दिसत आहे. हे परिवर्तन अत्यंत वेगाने झाले आहे. भारताने सातत्याने सौर ऊर्जा क्षमतेत वाढ केली असून, सध्या स्थापित अक्षय्य ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा जवळपास ५५% इतका आहे आणि ही क्षमता 154 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. दोन समांतर मार्गांनी हा विस्तार होतो आहे: एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील युटिलिटी प्रकल्प, जे ग्रीडची क्षमता वाढवून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतात; आणि दुसरे म्हणजे डिस्ट्रिब्युटेड प्रकल्प, ज्यांचा थेट आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडतो. लॉरिट्झ नुडसेन ही कंपनी युटिलिटी-स्केल पॉवर प्लांट्स, कमर्शियल अँड इंडस्ट्रिज आणि निवासी क्षेत्र अशा तीन विभागांमध्ये कार्यरत आहे. प्रगत AC सोल्युशन्स, DC स्विचगिअर, स्मार्ट मीटरिंग आणि क्लाउड-आधारित रिमोट मॉनिटरिंग सोल्युशन्स कंपनी पुरवते, ज्यामुळे सौर ऊर्जा यंत्रणा सुरक्षित, विश्वसनीय आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी सक्षम राहतात.या क्षमतेचा पाया भारतातील विद्युत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात असलेल्या सात दशकांहून अधिक काळातील अनुभवावर आधारलेला आहे. कंपनीने 2,350 हून अधिक सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य केले आहे, 350 हून अधिक EPC कंपन्या व 300 ​​हून अधिक डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे, तर 300 हून अधिक सिस्टम इंटिग्रेटर्सना प्रशिक्षण दिले आहे; अशा प्रकारे या क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेली स्थानिक क्षमता निर्माण केली आहे. लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेश कुमार म्हणाले: “जेव्हा एखादा शेतकरी डिझेलवर आधारित सिंचनाचा वापर सोडून देतो किंवा एखाद्या कुटुंबाला विजेचा खात्रीशीर पुरवठा मिळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ऊर्जा संक्रमण सुरू होते. 50 गिगावॅटच्या टप्प्याचे महत्त्व केवळ त्याच्या विस्तारामध्येच नाही, तर त्याचे फायदे किती व्यापकपणे जाणवतात यातही आहे. सौर पायाभूत सुविधा विश्वसनीय, सहज उपलब्ध आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी तयार केल्या जातील, हे सुनिश्चित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.” भारताची सौर परिसंस्था जसजशी विस्तारली आहे, तसतशी तिची तांत्रिक गुंतागुंतही वाढली आहे. उच्च क्षमता, बदलती ग्रिड गतिशीलता आणि विकेंद्रित वीज निर्मिती मॉडेलच्या वाढीमुळे अधिक प्रगत, विशिष्ट वापरासाठीच्या विद्युत उपायांची गरज वाढत आहे. वीज निर्मितीपासून ते वहन आणि ग्रीडमधील एकत्रीकरणापर्यंतच्या संपूर्ण सौर मूल्य साखळीला लॉरिट्झ नुडसेन समर्थन देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हा बदल दिसून येतो, ज्यात मध्यम-व्होल्टेज सोल्यूशन्स, एसी आणि डीसी स्विचगियर सोल्यूशन्स, सॉफ्टवेअर आणि सेवांसह नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवीकरणीय ऊर्जेतील ही वाढ देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण देखील वाढवते आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2026 या काळात भारताच्या सौर उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे देशाचे आत्मनिर्भरत्व अधिक मजबूत झाले. गरजांनुसार तयार केलेल्या मजबूत, भविष्यासाठी सज्ज विद्युत प्रणालींनी उत्पादन सुविधा सुसज्ज करून लॉरिट्झ नुडसेनने या उत्क्रांतीला पाठिंबा दिला आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट जीवाश्म-इंधन-विरहित क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, आता संक्रमणाच्या प्रमाणावरून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जेणेकरून ऊर्जेची उपलब्धता केवळ विस्तारितच नव्हे, तर तिचे समान वितरणही सुनिश्चित होईल. या प्रवासात लॉरिट्झ नुडसेनची भूमिका त्यांच्या मूळ उद्देशाशी ठामपणे जोडलेली आहे: अशी एक विद्युत पायाभूत रचना उभारणे, ज्यामुळे सौर ऊर्जा विश्वसनीय आणि सहज विस्तारण्यायोग्य बनेल, तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासातील प्रत्येक स्तरावर ती सुलभतेने उपलब्ध होईल.