पुणे : जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास रु. १५ हजार व व्दितीय पुरस्कारास रु.१० हजार व मानचिन्ह देण्यात येते. जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांनी या पुरस्कारासाठी दि.३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग-2 हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा, दिनांक 1 जानेवारी 2015 पुर्वीचे भाग-2 तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच लघु उद्योगांची निवड ही त्यांने केलेली भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता तसेच प्रथम पिढीतील नव उद्योजक, उत्पादीत वस्तू बाबतची गुणवत्ता, निर्यातक्षम सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र इ. बाबींचा विचार करण्यात येतो.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जाकरीता व पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे दुरध्वनी क्र.20-25539587, 25537966 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.