पुणे – (लोणी काळभोर) :- शासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणा-या योजना
‘संवादवारी’च्या माध्यमातून थेट पोहोचत असल्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद असून त्याचा फायदा
नागरिकांना निश्चितच होईल, असा विश्वास लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीच्या सरपंच श्रीमती
गौरी गायकवाड यांनी व्यक्त केला.
संवादवारी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी,
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी होत आहे.
जनतेला योजनांचा थेट लाभ मिळत आहे.
महाराष्ट्रात आषाढी वारीची जुनी परंपरा असून यानिमित्ताने आयोजित केलेला 'संवादवारी'
उपक्रम प्रथमच पाहण्यात आला. असा उपक्रम दरवर्षी व्हायला हवा, म्हणजे वारीमध्ये सहभागी होणा-या
सर्वांनाच शासनाच्या योजनांची माहिती मिळू शकते. शासनाच्या योजनांचा शेतकरी, वारकरी यांनी लाभ
घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. उपसरपंच भाऊसाहेब कदम यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, शासकीय योजनांची माहितीसंवादवारीच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरापर्यंत झाली.
चित्तरंजन गायकवाड यांनी संवादवारी उपक्रमाचा नागरिकांना लाभ होईल, असे मत व्यकत केले. यावेळी
नागरिक व वारकरी उपस्थित होते.
‘संवादवारी’चा उपक्रम कौतुकास्पद – सरपंच गौरी गायकवाड
Date:

