Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शंभर टक्के बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करावे – जिल्हाधिकारी सौरभ राव

Date:

पुणे : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यावर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या रविवार दिनांक 2 मार्च 2017 रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकूण 11 लाख 88 हजार 510 बालकांना पल्स पोलिओची लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत शंभर टक्के बालकांचे लसीकरण करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी राव यांच्या अध्यक्षतेखाली पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या समन्वय समितीची बैठक तसेच मिशन इंद्रधनुष टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जाधव, पुणे महानगरपालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे याप्रसंगी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 लाख 26 हजार 738 आणि नगरपालिका हद्दींमध्ये 79 हजार 325 अशा एकूण 5 लाख 6 हजार 63, शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी ग्रामीण भागात 3 हजार 900 आणि नागरी भागात 356 याप्रमाणे एकूण 4 हजार 256 पोलीओ लसीकरण बूथ लावण्यात येणार आहेत. ट्रान्झिट बुथ 4 दिवसांसाठी  एकूण 369 असणार आहेत. दिनांक 2 एप्रिल रोजी ग्रामीण भागात 350 आणि नागरी भागात 48 मोबाईल बूथद्वारे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी बुथसाठी ग्रामीण भागात 9 हजार 550 आणि नागरी भागात 993 असे एकूण 10 हजार 543 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून ग्रामीण भागात 780 तर नागरी भागात 73 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात गृहभेटीद्वारे पोलीओ लसीकरणाअंतर्गत 3 दिवसांसाठी ग्रामीण भागात 2 हजार 900 पथके आणि नागरी भागात 293 अशी एकूण 3 हजार 193 पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांसाठी ग्रामीण भागात 8 हजार 700 आणि नागरी भागात 1363 अशा एकूण 9 हजार 936 मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि नागरी भागात मिळून 643 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयात विविध ठिकाणी ट्रान्झिट व मोबाईल बूथ लावण्यात येणार आहेत. टोलनाक्यांवर 18, साखर कारखाने, विटभट्टया व इतर  मोबाईल बुथ असे एकुण 287, बाजार ठिकाणी 8, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी 12, एस.टी.स्थानकांच्या ठिकाणी 26, रेल्वे स्टेशनवर 13, पर्यटन स्थळे आणि यात्रांच्या ठिकाणी 9 आणि इतर 242 ट्रान्झिट पथके लावण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. भगवान पवार यांनी यावेळी दिली.

पुणे महानगरपालिका हद्दीत 4 लाख 36 हजार 596 बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 1 हजार 560 बूथ लावण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक, एस.टी. स्थानके, तपासणी नाके, मॉल अशा ठिकाणी 4 दिवसांसाठी 70 ट्रान्झिट बूथची व्यवस्था करण्यात येणार आहे. 28 मोबाईल बूथ असणार आहेत. याशिवाय रात्रपाळीची 15 पथकेही नेमण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी 4 हजार 620 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून 300 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सोमवार ते शुक्‌रवार या 5 दिवसात घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 875 पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये 3 हजार 750 मनुष्यबळ व 260 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे शहरात मोहिमेबाबत 30 रिक्षांवर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. रोटरी क्लब आणि बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाईच्या सहकार्याने बांधकाम साईट्सवर लसीकरण मोहिमेसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. या मोहिमेत बांधकाम साईट्स, वीटभट्टया, रस्त्याच्या कडेची पाले, झोपडपट्टी भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी आणि लसीकरण अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर यांनी दिली.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत 2 लाख 45 हजार 851 बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 970 बूथ लावण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक, एस.टी. स्थानके, तपासणी नाके, मॉल अशा ठिकाणी 4 दिवसांसाठी 70 ट्रान्झिट बूथची व्यवस्था करण्यात येणार आहे. 70 मोबाईल बूथ असणार आहेत. याशिवाय रात्रपाळीची 8 पथकेही नेमण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी 2 हजार 844 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून 200 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सोमवार ते शुक्‌रवार या 5 दिवसात घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये 4 हजार 575 मनुष्यबळ व 200 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे तसेच महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी दिली.

शंभर टक्के बालकांचे पल्स पोलीओ लसीकरण करा : जिल्हाधिकारी सौरभ राव

या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे यांनी 17 जानेवारी 2017 रोजी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. काही ठिकाणी बालके लसीकरणापासून वंचित राहिली असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यावर श्री. राव यांनी सूचना दिल्या की, गेल्या लसीकरण मोहिमेत काही ठिकाणी बालके लसीकरणापासून वंचित राहिल्याबाबत जागतिक आरोग्य संघटना सर्वेक्षणाचा अहवाल आणि आरोग्य प्रशासनचा अहवाल यांचा अहवालाची तपासणी करण्यात यावी. त्यामध्ये बालके खरेच लसीकरणापासून वंचित राहिली असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. येणाऱ्या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. नागरिकांनीही आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना जवळच्या पोलीओ बूथवर पल्स पोलिओ लस पाजण्यासाठी घेऊन जाऊन पोलिओमुक्तीच्या मोहिमेला हातभार लावावा, असेही आवाहन श्री. राव यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...