Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज –पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पुणे –  देशाच्या स्वाभिमानावर, एकतेवर, सुरक्षिततेवर ज्या- ज्या वेळी आक्रमण झाले त्या- त्या वेळी महाराष्ट्र नेहमीच देशासाठी धावून गेला आहे. देशा समोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी यापुढेही महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या समारंभात पालकमंत्री श्री. बापट बोलत होते. शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे ठरविण्यासाठी देशाची घटना बनविली गेली. या राज्यघटनेची आखणी, मांडणी करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालो. आपण हा राष्ट्रीय सण धार्मिक उत्सवांसारखाच मोठया आनंदाने, कौतुकाने, उत्साहाने साजरा करतो. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना यानिमित्ताने आदरांजली वाहणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की,  साऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुध्दांचा हा देश आहे. पण या शांतीप्रिय देशात अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृतींचा धोका जाणवत आहे. अशा प्रवृतींना नामशेष करण्याची ताकत भारताजवळ आहे. अशा प्रवृतींविरुध्द समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून संघटीतपणे लढा देण्यासाठी सज्ज होऊया, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाकडे सारे जग एका आशेने पाहात आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची पात्रता भारताजवळ असून ही अपेक्षा पूर्ण करण्यास भारतीय नागरिक म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निरक्षरता, गरिबी, अस्वच्छता हेही समाजाचे शत्रु आहेत. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखताना मानव जीवन समृध्द करण्याची आज आपण शपथ घेऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री बापट यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस अधिकारी कर्मचारी,  खेळाडू आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सहायक पोलीस आयुक्त सुनील खळदकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय नाईक- पाटील, महिला पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव भोर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री पुनाजी डोईजड, अशोक झगडे, अरुण पोटे, अजिनाथ वाकसे, पोलीस हवालदार सर्वश्री विलास घोगरे, बळवंत यादव तसेच अशोक कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत प्रथम क्रमांक- कडबनवाडी (ता. इंदापूर), द्वितीय क्रमांक साकुर्डे (ता. भोर) आणि तृतीय क्रमांक वळती (ता. आंबेगाव) यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याशिवाय सामाजिक वनीकरण विभागाकडून वनीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या तीन शाळांचाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागातर्फे विविध गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्यात आले. यामध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) साक्षी तुषार मळभट, गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष) स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भुपेंद्र आचरेकर, क्रीडा संघटक मृदुला महाजन, क्रीडा शिक्षक पुणे मनपा क्षेत्र- हर्षल निकम, क्रीडा शिक्षक पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र- राजेंद्र महाजन, क्रीडा शिक्षक पुणे ग्रामीण क्षेत्र- निनाद येनपुरे, महिला क्रीडा शिक्षक- श्रीमती शबाना शेख यांना पुरस्कार देण्यात आले.

श्री. बापट यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली. कार्यक्रमात पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्नीशमन दल आणि नागरी संरक्षण दलाने शानदार संचलनाव्दारे पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना दिली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांचाही समावेश होता. संचलनामध्ये सामाजिक वनीकरण, वन विभाग, पुणे महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) तसेच महाराष्ट्र बँकेच्या चित्ररथांचाही सहभाग होता. शेवटी शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान,...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...