पुणे, दि. 18 : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर शहराच्या काडलाबल या भागात दि. 17 डिसेंबर 2016 रोजी दुपारी लष्करांच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादयांनी केलेल्या हल्यात पुणे येथील फुरसुंगी भेकराई नगरातील गुरुदत्त कॉलनीतील जवान सौरभ नंदकिशोर फराटे (वय 32) हे शहिद झाले.
त्यांचे पार्थिव आज रात्री 9 वाजेच्या सुमारास विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आणले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन महापौर प्रशांत जगताप यांनी अभिवादन केले. तसेच उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, हवेली प्रांताअधिकारी ज्योती कदम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बिपीन शिंदे,लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व जवान यानी देखील अभिवादन केले.
उद्या दि. 19 डिसेंबर 2016 रोजी भेकराईनगर येथील गंगाधाम येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहिदजवान सौरभ नंदकिशोर फराटे यांना वीरमरण आल्याचे समजताच फुरसुंगी येथे शोककळा पसरली काल रात्रीपासून अनेक मान्यवर,नागरिक त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करीत होते.
शहिद जवान सौरभ फराटे यांचे पार्थिव पुण्यात;आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Date: