Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धर्मवीर आनंद दिघेंचे नाव देऊन आजच करणार ‘त्या’ उद्यानाचे उद्घाटन:शिंदे गट भानगिरेंच्या पाठीशी समर्थपणे उभा (व्हिडीओ

Date:

पुणे-कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी त्यांच्या नावाने पालिकेच्या जागेवर स्वखर्चाने उद्यान उभारून त्यास शिंदे यांचे च नाव देऊन त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावर प्रसार माध्यमांनी जोरदार हल्ला चढविल्यानंतर,त्यांनी चुक काबुल करून माघार तर घेतली पण आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे समर्थक उद्या सामंत हे भानगिरे यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून ते अडकलेले जाले अलगदपणे सोडविनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कसे ते पहा .. आज सकाळी आ. उद्या सामंत यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले …

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उद्यानाचे उद्घाटन रद्द झाल्यानंतर उद्यानाचे नाव धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

हे नाव दिल्यानंतर मुख्यमंत्री संध्याकाळी उद्यानाचे उदघाटन करणार

संध्याकाळपर्यंत प्रशासकीय पातळीवर नामांतराच्या तरतुदी पूर्ण करणार

हे उद्यान सामान्य नागरिकांसाठी आहे इथे काय नाना भानगिरे सकाळ संध्याकाळ बसणार नाहीत

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे एखादा नगरसेवक किंवा कार्यकर्ता माझ्या नावाने जर उद्यान करत असेल तर ते मला मान्य नाही. त्यामुळे या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं   नाव द्यावं अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना भानगिरे यांना केली असल्याची माहिती उदय सामंत त्यांनी दिली.

कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात आणि कार्यकर्त्यांच्या भावना जपणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या प्रशासक राज्य असल्याने प्रशासकीय पातळीवर रात्रीपर्यंत काही निर्णय होऊ शकतात.  

मुख्यमंत्री कुठल्याही गैरकानुनी प्रकल्पांचे उद्घाटन करत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे गेल्या 3 4 दिवसांतील दौरे पाहून विरोधकांना पोटसुळ उठला आहे त्यामुळे या उद्यानाच्या मुद्द्याला त्यांनी राष्ट्रीय मुद्दा केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...