Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नागरिकांनी ट्विटर अकाउंट्स हॅकिंगबाबत सावध रहावे!

Date:

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई, दि.१६ :- काही जगप्रसिद्ध व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच वरील व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे.    

तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर गुन्हेगारांच्या खात्यात साधारणपणे १.२ लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून घेतल्या झाल्याचा अंदाज आहे. अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत. हा सर्व प्रकार साधारणतः भारतीय प्रमाण वेळेनुसार १६ जुलै २०२० च्या मध्यरात्री ०१:३० वाजता घडला व त्यामुळे ट्विटरचे काही features व सोयी काही ठराविक काळाकरिता उपलब्ध नव्हत्या. ट्विटर support नी सदर प्रकार ओळखून याबाबत योग्य उपाययोजना व तांत्रिक खबरदारी घेऊन सदर प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढण्यापासून थांबविला.

या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेऊन, महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत की, त्यांनी भारतातील सर्व नागरिकांच्या, महत्त्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत blue tick ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट मधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची privacy ची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना असे काही प्रकार घडू नयेत. जर कोणत्याही अकॉउंट वरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्र सायबरने ट्विटर इंडियाला असे देखील सूचित केले आहे कि माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम  ७९(३)( ब) अन्व्ये सदर सर्व ट्विटर अकाउंट्सच्या सुरक्षिततेची जवाबदारी हि ट्विटर इंडियाची आहे. तसेच अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९(३)(बी) अन्व्ये नोटीस महाराष्ट्र सायबरने  अन्य सोशल मिडिया platforms(Facebook, whatsapp, instagaram etc) ना पण पाठवून त्यांना ही सर्व नागरिकांच्या प्रोफाईल व डेटा व privacy ची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे .

नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की

१) कृपया आपल्या ट्विटर व अन्य सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा .

२) ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या .

३) कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील अशा संदर्भात कोणती scheme किंवा offer आली तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करू नका. असे महाराष्ट्र सायबर मार्फत कळविण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही

मनमोहन महिमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चित्रपट...

श्री ओंकारेश्वर मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन साजरा

पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक ; आकर्षक सजावट...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एकावर स्थानबद्धेची कारवाई

पुणे, दि. 9: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार एमपीडीए...