बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता : देवेंद्र फडणवीस

Date:

मुंबई – विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी,”तुम्ही विचारता बाबरी पाडताना कुठे होता, मी अभिमानाने सांगतो मी तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता! असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तर मुंबई महाराष्ट्राची आहे, आणि राहणार त्यामुळे त्यांनी त्यावर भावनिक राजकारण करू नये असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.ते मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित सभेत बोलत होते.

“मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा म्हणाले बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता.”

“एवढंच नाही, तर त्याआधीच्या कारसेवेत याच राम मंदिरासाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. आम्ही लाठी गोळी खाण्याचं काम केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात? खरं म्हणजे बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेते गेला होता. एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

या सभेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, सहप्रभारी जयभान सिंह पवैया, चंद्रकांत दादा पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

तुम्ही रावणांकडून की रामाच्या बाजुने?

राज्यात हनुमान चालिसा म्हटले तर सरकार उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवसेनेनी एकदा सांगावे की तुम्ही रामाच्रूा बाजुने आहे, की रावणाच्या बाजूने आहे. असा प्रश्न विचारत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही – देवेंद्र फडणवीस

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, ही जीवन पद्धतीने प्रत्येक व्यक्तिला जगण्याचा आधार दिला हे लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

वर्क फॉर्म होम माहिती मात्र वर्क फॉर्म जेल ?

संजय राऊत रोज सकाळी घराबाहेर येतात आणि नौटंकी करतात, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर इफ्तार पार्ट्या झोडून होणार नाही असे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दारूच्या किंमती कमी होऊ शकतात, मात्र पेट्रोलचा दर कमी होऊ शकत नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरें सरकारवर केली आहे. हे सरकार केवेळ दारुड्यासाठी, बिल्डर यांच्या साठी काम करते असेही त्यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांचे वर्क फॉर्म होम माहिती होते, मात्र आता नवाब मलिक यांचे वर्क फॉर्म जेल हे आताच समजले असे म्हणत ठाकरे सरकारवर आरोप केला आहे.

आमच्यावर तुटून पडाल तर तुटाल – फडणवीस

आम्ही इंदिराजींना घाबरलो नाही, तुम्हाला काय घाबणार, आमच्यावर तुटून पडाल तर तुम्ही तुटाल आणि पडाल देखील असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...