आता बी-बियाणे रास्तभाव दुकानात शेतकऱ्यांची गैरसोय टळणार, दुकानदाराचेही उत्पन्न वाढणार

Date:

पुणे  : राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे तसेच गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणित बी-बियाणे स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हावीत, हा दुहेरी हेतू साधत राज्य सरकारने आता प्रमाणित बी- बियाणांची रेशनिंग दुकानातून विक्री करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

मंत्री बापट म्हणाले की, रास्तभाव दुकानदारांना बी-बियाणांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना प्राप्त करणे अनिवार्य असून सीड सर्टिफिकेशन एजन्सीद्वारे प्रमाणित बी-बियाणेच त्यांना विक्रीस ठेवता येतील. हा परवाना प्राप्त करण्याची कार्यपद्धती, अर्जदाराची पात्रता त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज याबाबतची सर्व माहिती ‘ई परवाना’ या पोर्टलवर उपलब्ध आहे. रेशनिंग दुकानदारांना केवळ प्रमाणित बी-बियाणेच विक्रीस ठेवता येतील. कोणत्याही परिस्थितीत रासायनिक खते, जंतुनाशके व इतर रसायने विक्रीस ठेवता येणार नाहीत.

 

ते पुढे म्हणाले की, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दैनंदिन सेवा पुरविण्याबरोबरच रेशनिंग दुकानदारांनाही आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे. अन्न नागरी   पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन या दोन्ही विभागात ई गव्हर्नन्सचा वापर करून नागरिकांना सेवा देण्यावर सरकारचा भर आहे. यासाठी विविध योजना सरकारने हाती घेतल्या आहेत. रास्तभाव दुकानात कॅशलेसचा वापर वाढावा, यासाठी दुकानांमध्ये शिधा वस्तूंची किंमत अदा करण्यासाठी मोबाईलद्वारे रक्कम हस्तांतरण व ई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत . दैनंदिन व्यवहाराबरोबरच दुकानदारांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी राज्यातील रास्तभाव दुकानदारांची ठराविक अटींची पूर्तता करून व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही सरकारने आता घेतला आहे. या योजनेची परिणामकारक व गतिमान अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व खासगी बँका यांच्या सोबतच CSC e-governence services india ltd नवी दिल्ली या कंपनीच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठीही शासन प्रयत्नशील  आहे. यांसारख्या असंख्य निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील लोकांना पारदर्शक व कार्यक्षम सेवा देण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. पुढील काळात यामध्ये आणखी मोठे बदल दिसून येतील अशी आशा मंत्री बापट यांनी व्यक्त केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...