पुणे-राम कदमाला माफीने प्रायश्चित्त होणे नाही त्यांना शिक्षाच करायला हवी आणि कॉंग्रेस येत्या अधिवेशनात राम कदमांच्या बडतर्फीची मागणी करेल असे येथे विधानमंडळाचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले .याच बरोबर पेट्रोल अगोदर १०० रुपयांपर्यंत नेऊन ठेवून पेट्रोलियम कंपन्यांच्या तिजोऱ्या भरून ठेवायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल डीझेल चे दर मोठ्या प्रमाणात खाली आणून ..आता येत आहेत अच्छे दिन अशी हाकाटी पिटून जनतेची पुन्हा फसवणूक करायची असा डाव भाजप सरकारचा असावा अशी शक्यताही त्यांनी वर्तविली .
कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कात्रज येथील स्व राजीव गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यात प्रारंभ करण्यात आला. या वेळी हर्षवर्धन पाटील ,रमेश बागवे ,उल्हास पवार ,अनंतराव गाडगीळ ,मोहन जोशी ,आबा बागुल ,विश्वजित कदम,अविनाश बागवे ,अभय छाजेड ,अजित दरेकर ,संगीता तिवारी,नीता रजपूत ,सोनाली मारणे ,सतीश पवार,द.स .पोळेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसंघर्ष यात्रेच्या प्रारंभी उपस्थित होते .यात्रा सुरु झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील थोड्याच वेळात यात्रेत सहभागी झाले .
यावेळी ‘माय मराठी’ शी बोलताना पहा आणि ऐका .राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले ……
राम कदमाला माफी नाहीच ,शिक्षाच हवी -राधाकृष्ण विखे पाटील (व्हिडीओ)
Date: