पुणे-डॉल्बी लावून विक्षिप्त अंगविक्षेप ज्या नगरसेविकेचा पती विसर्जन मिरवणुकीत करत होता त्या प्रकरणी केवळ ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा पोलिसांनी आमच्या मागणीवरून दाखल केला वास्तविक पाहता हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता तो धुड्कारून न्यायालयाचा अवमान केला आणि तो हि भाजपच्या नगरसेविकेच्या मंडळाने ..म्हणून आता त्या नगरसेविकेचे पद रद्द करणार काय ? असा सवाल रणपिसे यांनी पुढे उपस्थित केला . शिवाय पालकमंत्री यांनी डॉल्बी लावू नका असे आदेश देवूनही त्यांच्याच पक्षाच्या या नगरसेविकेने आणि तिच्या पतीच्या मंडळाने जुमानले नाही .हि बाब देखील भाजपने ध्यानी घ्यावी .
कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यावर खडक पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि अटक प्रकरणी पत्रकारंशी आ. रणपिसे यांनी बोलताना नेमके काय म्हटले ते पहा आणि ऐका ….