पुणे -सध्याच्या आंतरराष्ट्रीय दरानुसार जे पेट्रोल ४० रुपये लिटर दराने विकायला हवे ते पेट्रोल सरकार ८० रुपयाहून अधिक दराने विकत आहे हि लुटमार कोणाच्या खिशात घातली जाते आहे असा घणाघाती आरोप करत काश्मीर मध्ये गेल्या 4 वर्षात सर्वाधिक नागीरीकांचे ,पोलीस आणि लष्करी जवानांचे बळी गेले ,आणि आम्ही संपुष्टात आणू पाहत असलेला आतंकवाद मोदी सरकारच्या काळात अधिक उग्र झाल्याचे येथे आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलामनबी आझाद यांनीसांगितले .
कोल्हापूर, सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली.या पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोपाची सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारीमलिकर्जुन खर्गे,काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,मोहन जोशी,अरविंद शिंदे,अविनाश बागवे,अजित दरेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी गुलामनबी आझाद म्हणाले की,स्वातंत्र्यपूर्व काळात बाहेरील व्यक्तीकडून आपल्याला धोका होता.मात्र सध्याचे देशातील वातावरण लक्षात गबेता आपल्याला आपल्या व्यक्तीकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.इंग्रज बंदुकीने तर भाजप सरकार आता “सीबीआय’सारख्या यंत्रणेच्या धाकाने देशाचा कारभार करीत असून, सध्या देशात “डिक्टेटरशिप’ च्या माध्यमातून तीन लोक कारभार हाकत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या मूळ विचारधारेपासून देशाला खरा धोका आहे,तर काँग्रेसच्या नेत्यांनी,पदाधिकायांनी देशाच्या स्वातंत्र्यमध्ये कारवास भोगला किंवा बलिदान देखील दिले.मात्र भाजपकडून कोणत्याही नेत्यांचे स्वातंत्र्यमध्ये किंवा सध्याच्या सरकारमध्ये काही ही योगदान नाही.अशा शब्दात केंद्राच्या कारभारावर टीका केली.
ते पूढे म्हणाले की, कश्मीरमधील आमची सत्ता असताना दहशतवाद संपवला.मात्र भाजप ची त्या ठिकाणी सत्ता आल्यावर आणखी दहशतवाद वाढला असून याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खूप आश्वसने दिल्याने ते सत्तेमध्ये आले आहेत.त्यांना कोणतेही आश्वसने पूर्ण करता आली नाही.त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेऊन अर्थ व्यवस्था धोक्यात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.नोटबंदीच्या निर्णयाने अनेकांच्या हाताला रोजगार राहिला.त्यावर कोणी ही काही बोलण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की,देशात मागील महिन्यापासून संविधान बदलण्याची चर्चा सुरू आहे.संविधानामध्ये बदल केल्यास लोकशाही धोक्यात येईल.त्यामुळे या गोष्टीकडे सर्वानी लक्ष ठेवण्याची गरज असून असे प्रकार हानून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.