पुणे-सरकारी रूग्णालयात सरकारी खर्चाने होणारे उपचार आणि खाजगी रुग्णालयात स्वखर्च करून होणारे उपचार यात भेदभाव असल्याचा आरोप करीत , या उपचार पद्धतीचा पर्दाफाश व्हायला हवा , महापालिकेच्या आयुक्तांनी किमान खाजगी हॉस्पिटलची बिले तपासली तरी हा भेदभाव लक्षात येईल .असे मनसे चे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगत थेट महापालिका आयुक्तांना आव्हान दिले आहे . हा भेदभाव उपचारात कसा ? असा सवाल केला आहे.
त्यांनी आज महापालिका आयुक्तांना, जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे कि ,’ करोना वरील उपचार शहरातील अनेक हॉस्पिटल मधून मिळतात.शहरात सरकारी अनुदानाच्या माध्यमातून उपचार घेणारे व स्वखर्चातून उपचार घे णारे असे दोन घटक आहेत यातील स्वखर्चाने उपचार घेणारा रुग्ण वेगळ्याच प्रकारचे उपचार शहरातील हॉस्पिटल मधून घेत आहे .त्याच्या वरील उपचार खूप वेगळे असून अशा पद्धतीने स्वखर्च करणारे व अनुदानावर उपचार करणारे याच्या मधील उपचारामध्ये भेदभाव केला जात असल्याचं बिल बघितलं कि लक्षात येत.
आपले ऑडिट जर चालू असते तर आपल्याही लक्षात हा प्रकार आला असता कदाचित आपल्यालाही हे माहीत असावं पण आपण हि अनुदानाच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या करोना बाधित रुग्णाला ही असेच उपचार द्यावे लागतील म्हणून दुर्लक्ष करीत असावेत , स्वखर्चाने केला जाणारा अत्यंत परिणाम कारक व प्रभावी उपचार थोडा महाग आहे प्रभावी आहे आणि कोणतीही लुबाडणूक न करणारा आहे हे मात्र खरे …. कारण ऑडिटर नेमून बरेच दिवस झाले आणि खाजगी हॉस्पिटल आकारत असलेली ५ ते १० लाखाच्या पुढील बिलाची आकारणी गैर असल्याचे अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने म्हटलेले नाही . वा असा याबाबत लुट केल्याचा गुन्हा रुग्णालयावर दाखल केलेला नाही .
आपल्या या उपचार संदर्भातील भेदभावाचा मनसे निषेध करते आणि खाजगी हॉस्पिटल मधून स्वखर्चाने केला जाणारा प्रति रुग्ण ५ लाख ते १० लाख व त्या पुढील किमतीचा उपचारच सर्वसामान्य व सरकारी अनुदानातून उपचार घेणाऱ्या रुग्णावर करावा अशी मागणी करते जरा त्या अतिशय चांगल्या उपचाराचा लाभ आम्हाला हि द्या कि …. असे उपरोधिक पणे म्हणत ‘हे’ उपचार कोणते हे जर आपल्याला माहित करून घ्यायचे असतील तर या खाजगी हॉस्पिटल मधून केल्या जाणाऱ्या उपचारापोटी दिली जाणारी बिल निदान तपासा म्हणजे सहज लक्षात येईल .
कारण काही दिवसापूर्वी मा उपमुख्यमंत्री यांच्या आदेशा नुसार नवणीत कौर यांच्या सहित काही उपजिल्हा अधिकारी व मनपा अधिकारी याची नियुक्ती शहरातील खाजगी रुग्णालयातून करोना बाधित रुग्णावर उपचारापोटी आकारल्या जाणाऱ्या बिलाच्या ऑडिट साठी नियुक्ती करण्यात आली आहे.पुण्यात यासंदर्भात नेमकी काय स्थिती आहे हे आयुक्तांनी आणि महापौरांनी स्पष्ट करावे