जलपर्णी घोटाळा नाही ,देवदूत चे उत्तर टाळले-सिंचन घोटाळा कारवाई अंतिम टप्प्यात – मुख्यमंत्री (व्हिडीओ)

Date:

पुणे-जास्त रकमेची टेंडर येणे हा घोटाळा नाही, पण माध्यमे त्यावर आवाज उठवितात त्याची दखल महापालिका घेते , हे चांगले काम आहे असे सांगत जलपर्णी घोटाळ्याला क्लीन चीट दिल्याचे आज सूचित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवदूत प्रकरणाच्या उल्लेखाकडे मात्र व्यवस्थित उत्तर देणे टाळले . राज्यातील सिंचन घोटाळ्यावरील कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले .
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली .
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल शहरात झाली. मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा ही पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघामधून निघाली. या सर्व मतदार संघामध्ये माेठ्याप्रमाणावर हाेर्डिंग लावण्यात आले हाेते. माेठ माेठ्या हाेर्डिंग आणि फ्लेक्समुळे सर्व रस्ते व्यापले हाेते. या सर्व फ्लेक्स बहाद्दरांना  मुख्यमंत्र्यांनी आज सुचक इशारा दिला. हाेर्डिंग लावल्याने काेणालाही तिकीट मिळणार नाही तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अनधिकृत हाेर्डिंग लावणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ?

बारामतीमध्ये ही जनादेश यात्रा गेली. तेथे मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका सुरु करताच राष्ट्रवादी समर्थकांनी घाेषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. याबाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, काल विराेध करणारे राष्ट्रवादीचे सात ते आठ लाेक हाेते. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घेऊ नये का, तिथे काय कलम 370 लागू केले आहे का, की बारामती महाराष्ट्राच्या बाहेर आहे ? लाेकशाहीमध्ये सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पवारांच्या प्रत्येक सभेत आमच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली तर चालेल का ? पवारांनी आमच्या इकडे यावं, सभा घ्यायला आम्ही त्यांना मदत करु असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.तसेच पवारांच्या एवढी काय पायाखालून जमीन सरकतीये की बारामतीमध्ये मुख्यंमत्र्यांनी सभा घेऊ नये असे त्यांना वाटते असा टाेलाही त्यांनी यावेळी पवारांना लगावला.

पुण्यातील पाणी नियोजन व्हायचेय

इंदापूरला आपण पाणी देणार आहोत .पुण्यात पाणी असूनही लोकांना येथे पाणी मिळत माही अशा तक्रारी आहेत यावर बोलताना ते म्हणाले , कि पुण्यात पाण्याचा वापर जास्त आहे आणि अपव्यय देखील होतो आहे . या साठी नियोजन करणे गरजेचे आहे २४ तास पाणी पुरवठा योजना हेच काम निश्चित करणार आहे . हि योजना पूर्ण झाल्यावर पुण्यात पाण्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...