कमाल बागुल कुटुंबाची -लॉक डाऊन च्या काळात धमाल जनसेवेची
विलगीकरणातील गरजू रुग्णांसाठी ३७ दिवसांपासून सुरु आहे ‘आबा का ढाबा’
पुणे – दृष्ट लागू नये अशी कामे पुण्यातच होतात , म्हणूनही म्हणतात पुणे तिथे काय उणे ….राजकारण समाजकारण करताना अनेकदा जनसेवेची संधी उपलब्ध होते आणि या संधीत ‘हे’कुटुंब एकत्रित राहणारे कुटुंब सारच्या सारे या जनसेवेत रमतंय..एकट्या दुकट्या ची नव्हे तर साऱ्या कुटुंबाची हि जणू हौसच आहे.. कॉंग्रेसचे नगरसेवक आबा बागुल आणि जयश्री बागुल यांचं हे कुटुंब ,मुले सुना ,नातवंडे ,सारेच्या सारे ,कार्यकर्त्यांसह गेली ३७ दिवस रोज आपल्या हाताने जेवण तयार करून घरोघरी गरजूंना पोहोचवीत आहेत .
आजचा खास मेनू होता ,’फिश करी’
माजी उपमहापौर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेले आबा बागुल हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत .अनेक नवनव्या कल्पना ,योजना मांडायला त्यांना आवडतात आणि त्या मांडल्या कि त्यांचं सारं कुटुंब त्यात हिरारीने भाग घेत सहभागी होत त्याची अंमलबजावणी देखील करतं .आबा थोडेसे फ्री माइंडेड मानले जातात ,सर्व स्तरात ते चटकन मिसळतात , अशी त्यांची ओळख आहे. जे जे होम कोरोंटाइन असतील आणि गरजू असतील त्यांना मदतीचा हाथ देऊन आपण आपली वेळ सत्कारणी लावतो आहे, घरात बसून बोअर होण्यापेक्षा या कामात मन रमतं असं मानणारं हे कुटुंब, आज फिश करी करण्यात रमलं होतं . त्यांनी त्यासाठी चक्क ३०० किलो मासे मिळविले .
हे सारं कसं शक्य होतं ? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो तेव्हा आबा बागुलांनी सिंघम चित्रपटातील संवाद ऐकविले ,पोलिसांनी जर ठरविलं तर चोऱ्या होणारच नाहीत …आणि एवढ्या वर्षे राजकारणात ,सगळे घरदार समाजकारणात वाहून घेतंय असं दिसलं कि मग दानशूर देखील पुढे येतात ..या शहरात त्यांची कमी नाही , फक्त करण्याची उमेद पाहिजे ,इच्छया पाहिजे ,सर्व काही होतं .असे आबा सांगत होते .
या जेवणाच्या सोयीसह रिक्षाचालकांना मदतीसाठी बागुल कुटुंबाने शक्कल लढविली. ज्यांच्या रिक्षा सीएनजी वर आहेत त्यांना प्रती दिवसाला १०० रुपयांचा सीएनजी गैस साठी कुपने त्यांनी वाटली. सामाजिक अंतर राखून ,मास्क लाऊन लॉक डाऊन काळात ही लोकसंपर्क या कुटुंबाने अशा पद्धतीने साधला आहे.