छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२ मार्च रोजी सासवडला

Date:

दशरथ यादव यांची माहिती

सासवड, दि. ८ जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय बारावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२१ रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितली.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, श्यामकुमार मेमाणे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील धिवार, विजय तुपे, संतोष जवळकर, अमोल भोसले, संजय सोनवणे, सुरेश वाळेकर आदी उपस्थित होते.

क-हा काठावर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेल्या या परिसरात पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला. सात गड आणि नऊ घाटांचा ही शंभर चौरस मैलाची क-हेपठारची दौलत आजही दिमाखात उभी आहे. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात सहभागी होणा-या कवी,लेखकांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले..

खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक...

रस्त्यांचे झाले नाले..केंद्रीय मंत्री मोहोळ अधिकाऱ्यांना म्हणाले,आजवर तुम्ही काय केले.. ?

आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा पुणे (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि...

पन्नास वर्षांच्या संघर्षाला न्याय; महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक – डॉ. नीलम गोऱ्हे”

"शेतकरी महिलांच्या श्रमांना अखेर कायदेशीर मान्यता; सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे...