पुणे- यंदाच्या गणेश उत्सवात शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरे करणारे छत्रपती राजाराम मंडळ जेजुरी गडावरील मल्हारी मार्तंड देवस्थानची ६५ फुटीभव्य प्रतिकृती उभारीत आहे . 5 साप्तेम्बारला या देखाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट करणार आहेत .
मंदिराची लांबी १२५ फुट रुंदी ३२ फुट आणि उंची ६५ फुट एवढी असेल . मंदिरात ३२ फुटी २ महाद्वार ;२० व १६ फुट उंचीच्या २ दीपमाळा, ,२० फुटी व्यासाचा कासव ,नांदी मंदिर ,बानू मंदिर, मार्तंडाचे अश्व, सभामंडप,आणि खंडोबाचे मंदिर आदींचा समावेश आहे .मंदिरावरील कळस ,खंडोबाचा गड चढण्यासाठी डोंगर, हि देखाव्याची वैशिष्ट्ये असतील असे आज पत्रकार परिषदेत मंडळाच्या पदाधिकारी यांनी सांगितले .
हिंदुस्थानातील पहिला गणपती बसविणारे भावूसाहेब रंगारी यांनी राजाराम मंडळाची मूर्ती साकारली आहे . उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून या मंडळाचा देखावा नागरिकांना पाहता येणार आहे .गेल्या वर्षी मंडळाने तुळजापूरच्या मंदिराचा देखावा साकारला होता .