केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12वीपाठोपाठ इयत्ता 10वीचाही निकाल जाहीर केला आहे. CBSE ने आज दुपारी 2 वाजता 10वीचा निकाल जाहीर केला. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसले आहेत, ते CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वरून त्यांचे बोर्ड निकाल (CBSE निकाल 2022) पाहू शकतात. इयत्ता 10वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी (CBSE निकाल 2022), विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक वापरावा लागेल.इयत्ता 12 वीमध्ये मुलांपेक्षा मुलींचा निकाल 3.29% जास्त आहे. त्याच वेळी, 10वीच्या निकालात मुली 1.41% ने पुढे आहेत.
असा चेक करा तुमचा निकाल
- सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.
- मुख्यपृष्ठावर दिसणार्या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
- येथे तुमचा रोल नंबर, डेट ऑफ बर्थ यासारखी विचारलेली माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
35 लाख विद्यार्थ्यांनी दिली 10वी आणि 12वीची परीक्षा
सुमारे 35 लाख विद्यार्थी 10वी आणि 12वी टर्म-2 च्या परीक्षेला बसले होते. यामध्ये 10वीच्या 21,16,290 व 12वीच्या 14,54,370 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 ते 15 जून 2022 या कालावधीत देशभरातील विविध ठिकाणी हजारो केंद्रांवर घेण्यात आली.
CBSE इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 33% आहे. प्रॅक्टिकल आणि थिअरी अशा दोन्ही विषयांत किमान 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.