Industrialist

स्कॅनिया इंडियाने पीपीएस मोटर्ससोबत भागीदारी करतखाण क्षेत्रातील उपस्थिती मजबूत केली

हैदराबाद: स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि.ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री...

क्लोव्हर इन्फोटेकने पुण्यात स्थापन केले ओरॅकलवर भर देणारे जागतिक केंद्र

पुणे-क्लोव्हर इन्फोटेकने त्यांचे अत्याधुनिक ओरॅकल केंद्रित ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) पुण्यात सुरू केले आहे. 200-सीटर जागतिक ओरॅकल केंद्रित COE मध्ये ओरॅकलमधील व्यापक अनुभवासह विषय, डोमेन आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेले लोक असतील. क्लोव्हर इन्फोटेक आणि ओरॅकलची भागीदारी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. ओरॅकलच्या ऑन-प्रिमाइसेस आणि क्लाउडवरील काही अंमलबजावणीसाठी क्लोव्हर इन्फोटेक जबाबदार आहे. भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि जगभरातील ओरॅकल ग्राहकांना उच्च दर्जाची सेवांचा देण्यासाठी जागतिक ओरॅकल केंद्रित COE हा एकप्रकारे योग्य असा विस्तार आहे. क्लोव्हर इन्फोटेकचा भारत, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेमध्ये झपाट्याने विस्तार होत आहे आणि अलीकडेच गेल्या चार महिन्यांत चार फ्यूजन करारांसह अनेक ओरॅकल करार जिंकल्या आहेत. आपले मनोगत व्यक्त करताना क्लोव्हर इन्फोटेकचे अध्यक्ष जावेद तापिया म्हणाले की, “आमचे ओरॅकल-केंद्रित COE हे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी, संशोधनासाठी आणि नवनवीन उपक्रमांसाठी जागतिक केंद्र असेल. हे ओरॅकल उत्पादनांसाठी नवीन व्यवहारिक संरचना, प्रवेगक आणि पद्धती तयार करेल. हे जागतिक COE आमच्या ग्राहकांना त्यांच्या ओरॅकल गुंतवणुकीतून सर्वोत्तम ROI आणि मूल्य मिळविण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी खरोखरच आधुनिक अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञान तयार करेल.” EMEA, क्लोव्हर इन्फोटेकचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष दास याप्रसंगी भाष्य करताना म्हणाले की, “ओरॅकल केंद्रित COE ओरॅकल उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आणि ग्राहकांना व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम-इन-क्लास ऍप्लिकेशन्स आणि तंत्रज्ञानासह सक्षम करताना  व्यवहारिक सोल्युशन्स तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची जोरदार साक्ष देते.आम्ही दर महिन्याला उच्च ओरॅकल डीलसह आमचा व्यवसाय झपाट्याने वाढवत असताना, आमचे ओरॅकल केंद्रित COE आमच्या ग्राहकांसाठी आणि ओरॅकलसाठी उत्कृष्ट सेवा, नाविन्य आणि मूल्य निर्मितीचे प्रतीक आहे. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना ओरॅकल उत्पादने आणि व्यवहारिक कार्यक्षमता आणि व्यवसाय गतीसाठी सोल्युशन्सच्या अंमलबजावणीचा आवश्यक आत्मविश्वास आणि आश्वासन देईल.”

FedEx ने हैदराबादमधील टेकहबमध्ये १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक केली

हैदराबाद,: FedEx Corp. (एनवायएसई:एफडीएक्स) या प्रसिद्ध कंपनीची एक उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या FedEx Express (FedEx) ने हैदराबादच्या आर्थिक विश्वामध्ये तब्बल १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करत त्यांच्या पहिल्या ‘FedEx प्रगत क्षमता समुदाय’ (FedEx advanced capability Community-ACC) चे आज हैदराबाद येथे उद्घाटन केले. भारतात होत असलेल्या तांत्रिक आणि डिजिटल परिवर्तनाला आणि नवकल्पकतेला पाठिंबा देऊन भारतास उत्कृष्ट अश्या प्रतिभेचा लाभ मिळवून देण्यासाठी FedEx नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. या पहिल्या केंद्राच्या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये देखील त्यांची हीच कटिबद्धता सर्वात पुढे आहे. या उद्घाटन सोहळ्याला FedEx Corporationचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राज सुब्रमणियम आणि FedEx Express चे अध्यक्ष आणि एअरलाइन आणि इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड स्मिथ हे उपस्थित होते.             तांत्रिक आणि डिजिटल नवकल्पकतेचे केंद्र म्हणून FedEx ACC कडे पाहिले जात आहे. तांत्रिकी कौशल्याने संपन्न अश्या समुदायाला समर्थन देण्यावर तेलंगणा सरकारचा जो धोरणात्मक जोर आहे त्याच्याशी हे केंद्र पूरक आहे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासोबतच हे केंद्र नवीन क्षमतांच्या विकासासाठी आणि संपूर्ण जगभरातील FedEx च्या कामकाजाच्या तांत्रिकी गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा सहाय्यक ठरेल.             FedExCorporation चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राज सुब्रमणियम म्हणाले, “तांत्रिक व डिजिटल प्रतिभा आणि नवकल्पकतेमध्ये गुंतवणूक करणे हा उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या आणि जगभरात अतुलनीय असे स्मार्ट लॉजिसटिक्स उपाय पुरविण्याच्या आमच्या अत्यंत व्यापक योजनेचा एक भाग आहे. अत्यंत प्रतिभा संपन्न अश्या समूहाचा लाभ घेऊन आम्ही डिजिटल परिवर्तनाला गती देत आहोत आणि आमच्या ग्राहकांना नवनवीन कल्पक असे उपाय व पर्याय उपलब्ध करून देत आहोत.”             जगभरात अश्या तांत्रिक व डिजिटल प्रतिभेला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क उभारण्याच्या कंपनीच्या जागतिक धोरणाचे हे पहिले FedEx ACC एक महत्वाचे पाऊल आहे. शिवाय पुढे जाऊन हे कंपनीच्या वाढीला व विस्तारला चालना देईल आणि जागतिक पुरवठा साखळीच्या परिसंस्थेला अजून समृद्ध करेल.

रॅपिडोतर्फे शहराअंतर्गत प्रवासाचे वाजवी पर्याय उपलब्ध करण्यासाठी रॅपिडो कॅब्ज लाँच

बाइक टॅक्सी आणि ऑटो सेवा क्षेत्रातील मिळवलेल्या यशानंतर शून्य कमिशन आणि खात्रीशीरपणे सर्वात कमी किंमत देणाऱ्या ४डब्ल्यू ‘रॅपिडो कॅब्ज’ सुरू करत कंपनीतर्फे पहिली पारदर्शक वाहतूक व्यवस्था...

होंडा रेसिंग इंडिया रायडर्स थायलंडमधील २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील अंतिम फेरीसाठी सज्ज<

चँग इंटरनॅशनल सर्किट (बरियम), १ डिसेंबर २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) थरारक अंतिम फेरीसाठी सज्ज होत असून ही फेरी चँग इंटरनॅशनल सर्किट...

Popular