Industrialist

रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीजने C.R.E.W चा पुणे अध्याय केला सुरू

●  C.R.E.W, कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन हा देशव्यापी उपक्रम आहे. ●  आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर 670+ पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. पुणे, १७ जुलै २०२४ : भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन(C.R.E.W)साठी पुणे चॅप्टर सुरू केला. रिअल इस्टेट, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रातील महिला व्यावसायिकांना सक्षम करणे हा या देशव्यापी उपक्रमाचा उद्देश आहे. गोदरेज प्रॉपर्टीज नेहमीच विविधता आणि सर्वसमावेशकतेत आघाडीवर राहिली आहे, कंपनीने 31% महिला, LGBTQ, आणि PWD कर्मचाऱ्यांचे 32% प्रतिनिधित्व दाखविले आहे आणि 32% महिलांचे प्रतिनिधित्व FY24 साठी पुण्यात दिसून आले आहे. प्रोजेक्ट वुल्फ हा कार्यक्रमाच्या प्रमुख घटकांपैकी एक अंतर्गत अभ्यास आहे, ज्यामध्ये ५००+ पेक्षा जास्त महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे, उदासीनता आणि प्रतिबद्धता डेटाचे विश्लेषण करणे आणि कार्यात्मक आणि भावनिक गरजांवर आधारित लक्ष्यित उपाय विकसित करणे, हा याचा उद्देश आहे. एका महत्त्वाच्या शोधातून असे दिसून आले आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या भावनिक गरजा कामाच्या ठिकाणी त्यांच्या कार्यात्मक आवश्यकतांपेक्षा जास्त आहेत, त्यातून एक सहायक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. C.R.E.W ची कल्पना एक सर्वांगीण दृष्टिकोन म्हणून केली जाते, त्यात केवळ संख्या मोजली जात नाही. एक असे वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते, जिथे महिला कार्यात्मक आणि भावनिक दोन्ही गरजा पूर्ण करून खऱ्या अर्थाने भरभराट करू शकतात. हा उपक्रम केवळ गोदरेज प्रॉपर्टीजपुरता मर्यादित नाही, तर रिअल इस्टेट क्षेत्राला लैंगिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ म्हणून त्याची कल्पना आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या सीएचआरओ मेघा गोयल म्हणाल्या, “आम्ही या क्षेत्रात केलेली कामे आणि आमचे ध्येय यामध्ये हा फोरम सुरू करण्यामागील उद्देश दडलेला आहे. आम्ही पुढील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्व महिलांचा भरभराटीचा समूह म्हणून CREW तयार करण्यास उत्सुक आहोत, विशेषत: बांधकाम क्षेत्रात, जे खास करून महिलांसाठी सर्वात आकर्षक क्षेत्र नाही. आमच्या अंतर्गत अभ्यास 'प्रोजेक्ट वुल्फ'मधील डेटानुसार महिला प्रतिनिधित्व आणि समावेशासाठी डेटा-आधारित माहिती तयार करण्यात मदत करण्यासाठी आश्वासक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. या लाँच इव्हेंटला प्रभावशाली नेते आणि व्यावसायिक एकत्र आले. लैंगिक विविधता आणि उद्योगात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले पाहिजे. यात पॅनेल चर्चा, परस्परसंवादी कार्यशाळा आणि नेटवर्किंगच्या संधी होत्या. "रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या संधीचा शोध" या शीर्षकाच्या पॅनेल चर्चेत डॉ. सुषमा कुलकर्णी, NICMAR विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरू, सुश्री गायत्री वासुदेवन, समभाव फाउंडेशनच्या मुख्य प्रभाव अधिकारी, सुश्री हेमामालिनी उपूर, नीना पर्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ आणि सुश्री अकिला जयरामन, गोदरेज प्रॉपर्टीजच्या क्षेत्र प्रमुख यांचा समावेश होता. त्यांनी सर्वसमावेशक कार्यस्थळांना चालना देण्यासाठी, स्टिरियोटाइपला आव्हान देणारी आणि रिअल इस्टेटमधील महिलांसाठी मार्गदर्शन व लक्ष्यित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे समोर मांडली. C.R.E.W चे उपक्रम भारताच्या अनन्यसाधारण सांस्कृतिक आणि व्यावसायिक संदर्भानुसार तयार केले गेले आहेत. जे जेंडर नॉर्म्स आणि प्रासंगिकता व परिणामकारकतेसाठी परिणामकारक आहेत. प्लॅटफॉर्म लवचिकता धोरणे, कार्य-जीवन संतुलन आणि करिअर वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संस्कृतीत बदल घडवून आणण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सर्व स्तरांवर गुंतवून ठेवता येते. सर्वसमावेशक कार्यक्षेत्रासाठी गोदरेज प्रॉपर्टीजची वचनबद्धता C.R.E.W ला चालना देते, ज्यामुळे सर्जनशीलता, नावीन्यता आणि व्यावसायिक कामगिरी वाढते. C.R.E.W रिअल इस्टेटमधील स्त्रियांच्या कमी प्रतिनिधित्वाला संबोधित करते, त्यांच्या प्रतिभेचा फायदा घेऊन या क्षेत्रातील वाढ आणि उत्कृष्टता आणण्यासाठी प्रत्येक जण समृद्ध होऊ शकेल, असे वातावरण तयार करते.

किरण बेदींद्वारे सेफ्टी अलार्मसह एव्हरेडीच्या सायरन टॉर्चचे अनावरण

महिला सुरक्षेला बळकट बनविणारा एक नवोपक्रम- एव्हरेडीचा सायरन टॉर्च हे एक अनोखे आणि क्रांतिकारी उत्पादन आहे. हा टॉर्च सुरू कराल, तेव्हा त्याला जोडून असलेली साखळी खेचल्यावर एक 100dbA क्षमतेच्या सुरक्षा अलार्मचा आवाज होईल, ज्यामुळे संकटकाळात मदत मागण्यासोबतच आसपासच्या लोकांना सावध करता येते. https://www.youtube.com/watch?v=6mRanjeL2n8&t=2s - एव्हरेडीच्या या नवीन सायरन टॉर्चबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी #AwaazUthaneyKaPower ही मोहीम कर्णबधिर आणि मूक महिलांद्वारे चालविली जाते. या मोहिमेचे उद्दिष्ट महिलांना, तसेच अन्य लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि सुरक्षा साधनांसह सक्षम करणे, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करणे, हे आहे. मुंबई, १६ जुलै २०२४: शक्ती, कामगिरी आणि विश्वासार्हतेचा समानार्थी असलेला भारताचा नंबर 1 बॅटरी ब्रँड एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि. (EIIL) यांनी भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सुरक्षा अलार्मसह फ्लॅशलाइट - एव्हरेडी सायरन टॉर्चचे उद्घाटन केले. मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या अनोख्या सायरन फ्लॅशलाइटला 100dbA आवाजाचा सुरक्षा अलार्म आहे. याला लागून असलेली चेन खेचली जाते, तेव्हा हा अलार्म वाजतो. महिला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या या नवीन लाँच केलेल्या सायरन फ्लॅशलाइटचे उद्दिष्ट दैनंदिन जीवनातील सुरक्षा वाढविणे आहे. या नावीन्यपूर्ण उत्पादनाला ब्रँडच्या #AwaazUthaneyKaPower या नवीन मोहिमेचे पाठबळ आहे, ज्याचे नेतृत्व कर्णबधिर आणि मूक लोकांकडून केले जाते. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या उत्पादनाची आवश्यकता अधोरेखित केली जाते.#AwaazUthaneyKaPower मोहिमेसाठी एव्हरेडीने भारतातील कर्णबधिर समुदायाला भेडसावणाऱ्या "ॲक्सेसिबिलिटी"शी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत संस्था India Signing...

पुण्यातील दोन कंपन्यांनी टॅली एमएसएमई ऑनर्सच्या चौथ्या आवृत्तीत मारली बाजी

पुणे, : टॅली सोल्युशन्स ही जागतिक स्तरावर लघू आणि मध्यम उद्योगांसाठी नवनवीन उपाय शोधणारी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीने संपूर्ण भारतील ‘एमएसएमई सन्मान’च्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्याची घोषणा केली. डीबीएस (डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड) बँक आणि मायबिझद्वारे समर्थित टॅली एमएसएमई ऑनर्सच्या संपूर्ण भारतातील 100 एमएसएमईचा सन्मान करण्यात आला. जेनेसिस टेक इंजिनीयर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कनेक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील दोन कंपन्यांनी या वर्षी 19,000+ जागतिक नामांकनांमध्ये बाजी मारली आहे. व्यवसाय आणि उद्योजकांना राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानासाठी सन्मान करण्यासाठी टॅली एमएसएमई ऑनर्स हा वार्षिक उपक्रम आहे. एमएसएमईंच्या तळागाळातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींद्वारे विविधतेचा आणि सकारात्मक प्रभावांचा सन्मान केला जातो. अनेक नामांकित संस्थांकडूनही या उपक्रमाचे समर्थन केले जात असून, या वर्षी हा उपक्रम देशभरात पोहोचला आणि उन्नाव, आगरतळा, वापी, आसनसोल यांसारख्या दुर्गम आणि लहान भागातील व्यवसायांना सन्मानित केले आहे. शहरे, विभाग आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनोळखी नायकांना खऱ्या अर्थाने सन्मानित करणे एमएसएमई ऑनर्स हे सर्वसमावेशक ओळखीचे व्यासपीठ असल्याचा हा खरा पुरावा आहे. हा सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त दिला जातो आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध GSTIN असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतो. जेनेसिस टेक इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील शुभम पाटील यांना ‘न्यू जेन आयकॉन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. कंपनी विविध प्रकारच्या उद्योगांसाठी एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पाइपिंग) सिस्टीम डिझाइनमध्ये कुशल आहे, ज्यामध्ये सेमीकंडक्टर पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रातील ऊर्जा प्रकल्प, सौर पायाभूत सुविधा, वाहतूक, जागा आणि रासायनिक-तेल-गॅस डिझाइनचा समावेश आहे. जेनेसिस टेक इंजिनीयर्स एमईपी डिझाइन प्रमाणीकरण प्रदान करते, अभियांत्रिकी मानकांचे आणि स्थानिक सरकारी धोरणांचे पालन सुनिश्चित करते. कंपनी सर्वसमावेशक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोल्युशन्स देखील ऑफर करते, त्यामुळे वेळेत प्रकल्प वितरित केला जातो. त्यांचा विशेष प्रकल्प R&D विभाग नावीन्यपूर्ण आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करतो, जटिल अभियांत्रिकी आव्हानांना सामोरे जातो. Konnect Consultancy Services Pvt Ltd मधील कविता चक्रवर्ती यांना ‘वंडर वुमन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. कंपनी सर्वसमावेशक वित्तीय सेवा-बुककीपिंग, कर आकारणी आणि वेतन-मुख्यत: निर्यात क्षेत्राला पुरवते. ऑनलाइन आणि पारंपरिक विक्री चॅनेल दोन्ही वापरून, फर्मने स्थिर वाढ साधली आहे, त्याचा ग्राहक आधार वाढविला आहे आणि ग्राहकांचे समाधान वाढविले​​आहे. हा सन्मान ५ श्रेणींमध्ये देशातील चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण) मध्ये देण्यात आला: ●       वंडर वुमन : ज्या महिलांनी आव्हानांवर मात करत, व्यवसाय स्थापन करून भरभराट केली आणि या प्रक्रियेत इतरांना प्रेरणा दिली, त्यांना सन्मानित करणे. ●       बिझनेस मेइस्ट्रो: ज्यांचे कौशल्य आणि लवचिकता महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करते आणि जे चिरंतर यशाचा पाया घालतात, अशा अनुभवी व्यावसायिकांना सन्मानित करणे. ●       न्यू जेन आयकॉन : व्यवसाय क्षेत्रात गतिशील नेते म्हणून स्टार्टअप्सना हायलाइट करणे, जुन्या आव्हानांवर नवीन उपाय शोधणे आणि वाढीसाठी नवीन मार्ग तयार करणे. ●       टेक ट्रान्सफॉर्मर: तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आघाडीवर असलेल्या आणि त्यांच्या कार्यात कार्यक्षमता व परिणामकारकता आणण्यासाठी डिजिटल साधनांचा लाभ घेणाऱ्या व्यवसायांचा सन्मान करणे,. ●       चॅम्पियन ऑफ कॉज: एमएसएमईच्या जागतिक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या, अधिक शाश्वत आणि समावेशक व्यवसाय वातावरणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चॅम्पियन्सचा गौरव करणे.

‘टाटा केमिकल्सने सुरु केले मुळशीतील पहिले उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र’

~कौशल्य विकास आणि रोजगार संधी पुरवून स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण~ मुळशी, १२ जुलै, २०२४:  टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) या टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट” या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये उपजीविका व कौशल्य प्रशिक्षण केंद्र आज सुरु केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा केमिकल्स इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या १० गावांमधील सुमारे ४३० व्यक्तींना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.  उपजीविका पुरवण्यासाठी आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी या केंद्रामध्ये प्रशिक्षण पुरवले जाईल, इतकेच नव्हे तर, प्रशिक्षित व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते. टीसीएसआरडी आणि एलओएलटीने मुळशीमध्ये सुरु केलेल्या या सर्वसमावेशक कौशल्य केंद्रामध्ये लघुकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातील. यामध्ये एसी टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटर्स, ब्युटी केयर, इंग्रजी संभाषण, मेहेंदी डिझाईन आणि जॉब रेडीनेस ट्रेनिंग यांचा समावेश असेल. टाटा केमिकल्सचे हेड - इनोव्हेशन, आरअँडडी, सीक्युएच आणि चीफ एथिक्स काऊंसेलर, डॉ रिचर्ड लोबो म्हणाले, "मुळशीमधील आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या जवळ अशाप्रकारचे पहिले उपजीविका आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. वैविध्यतेवर भर देत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत स्थानिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्याप्रती टाटा केमिकल्सची बांधिलकी या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये अधोरेखित झाली आहे.  आजूबाजूच्या भागातील व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि संसाधने पुरवून, सक्षम करून शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा व आर्थिक स्वावलंबनासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. मुळशी भागातील व्यक्ती आणि कुटुंबांवर या केंद्राचा सकारात्मक प्रभाव निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या सह्योगी आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत." टाटा केमिकल्सचे मुख्य -...

जेएसडब्ल्यू समूहातर्फे बेंगळुरू येथे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी एमएसआरआयटी आणि शारिका यांच्यासह सामंजस्य करारावर सह्या

जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे फ्लेक्झिबल पॉवर सिस्टीम्स- स्मार्ट ग्रिड क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाला चालना दिली जाणार मुंबई आणि बेंगळुरू- अमेरिकी २४ अब्ज डॉलर्स जेएसडब्ल्यू समूहाने त्रिपक्षीय सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. संस्थेने विश्वेवरैय्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठाशी संबंधित व कर्नाटक राज्य सरकारची मंजुरी असलेली सरकार स्वायत्त खासगी अभियांत्रिकी एमएस रामय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीने (एमएसआरआयटी) आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित सेवा व प्रशिक्षण, तसेच स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचे डिझाइन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शारिका एंटरप्रायझेस कंपनीचा विभाग शारिका स्मार्टेक यांच्यासह हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पारंपरिक ऊर्जा यंत्रणांचे नावीन्यपूर्ण सुविधांच्या मदतीने परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणेत रूपांतर केले जाणार आहे. या त्रिपक्षीय करारानुसार बेंगळुरू येथील एमएसआरआयटीच्या कॅम्पसमध्ये स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानासाठी जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स (जेएसडब्ल्यू- सीओई) स्थापन केले जाणार आहे. या करारानुसार जेएसडब्ल्यू समूह जेएसडब्ल्यू- सीओईसाठी आवश्यक वित्तपुरवठा करेल, तर एमएसआरआयटी जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना व समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावेल. शारिका स्मार्टटेक या संस्थेची नॉलेज पार्टनर असेल आणि कंपनीद्वारे जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना, कामकाज व हाताळणीसाठी मदत केली जाईल. या सामंजस्य करारातील तीन पक्ष समाजाच्या एकत्रित शक्तीचा वापर करून सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना देऊन कर्मचारी, इंजिनीअर्स व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देतील. जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे शिक्षण, प्रशिक्षण आणि विकासासाठी प्लॅटफॉर्म पुरविला जाईल. हे अत्याधुनिक जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स शिक्षण आणि प्रशिक्षण मोड्युल्समध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी इंजिनीअरिंग व्यावसायिकांच्या नव्या पिढीला, पूरक स्टार्टअप्सना ‘लॅब एक सेवा म्हणून’ पुरवतील आणि त्या दरम्यान टेस्टिंग व सल्लासेवेच्या स्वरूपात मदत करतील. यामुळे वेगाने बदलत असलेल्या ऊर्जा यंत्रणा क्षेत्रात सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना मिळेल. एआय, डीप लर्निंग, बिग डेटा, ब्लॉकचेन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशनच्या येण्यामुळे ऊर्जा यंत्रणा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण सुविधांची मागणी अतिशय महत्त्वाची झाली आहे. एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स आधुनिक शिक्षण, डिझाइन, विकास आणि स्मार्ट ग्रिड किंवा परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणा क्षेत्रासाठी अंमलबजावणी क्षमता पुरवेल. स्मार्ट ग्रिड ऊर्जा यंत्रणा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत, दरम्यान इंजिनीअर्स, पदवीधर आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाला आधुनिक कौशल्ये व ज्ञान देऊन सक्षम केले जाणार आहे. त्यांच्या मदतीने एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स कुशल मनुष्यबळचा स्तर उंचावेल आणि त्यांची निर्मिती करेल. या उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सेंटर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक विकासाला चालना देईल. एम.एस. रामैय्या नगर, एमएसआरआयटी पोस्ट, बेंगळुरू, 560054 येथे वसलेले जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स ऊर्जा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाचे केंद्र बनून या उद्योगाचा विकास आणि प्रगतीसाठी योगदान देईल.

Popular