Industrialist

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) – सार्वजनिक मालकीच्या माध्यमातून राष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासगाथेत सहभागी

InvITs आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये ४ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून पुढील दशकात त्यात ६-८ लाख कोटी रुपयांची भर होण्याची...

पीएन गाडगील ज्वेलर्स लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपनीपैकी एक कंपनी आहे. जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेट्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दुस-या क्रमांकाच्या कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“SEBI”) दाखल केला आहे. कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10 च्या एकूण मूल्य  8,500 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा आणि दर्शनी मूल्य 10 रुपये असलेल्या 2,500 दशलक्ष रुपयांच्या  इक्विटी समभागांच्या विक्रीची ऑफरचा या ताज्या इश्यूमध्ये समावेश आहे. दर्शनी मूल्य 10 रुपये असलेले एकूण 11,000 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा यात समावेश आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये SVG बिझनेस ट्रस्टच्या (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) 2,500  दशलक्ष रुपयांच्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. IPO द्वारे उभारलेला निधी महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड किंवा पूर्व-पेमेंटसाठी, सामान्य कॉर्पोरेट  खर्चाच्या निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. पी एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलर्सपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील BIS-नोंदणीकृत आउटलेटसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. FY21 आणि FY23 मधील महसुलाच्या वाढीवर आधारित, कंपनी भारतातील प्रमुख संघटित ज्वेलर्समध्ये सर्वात वेगाने वाढणारा ज्वेलरी ब्रँड आहे. कंपनीने FY21 आणि FY23 दरम्यान 56.50% ची EBITDA वाढ मिळवली. तसेच FY23 मध्ये प्रति चौरस फूट सर्वाधिक महसूल मिळवला, जो भारतातील प्रमुख संघटित ज्वेलरी खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीने 33 स्टोअर्सपर्यंत विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील 18 शहरांमध्ये 32 स्टोअर्स आणि यूएस मधील एक स्टोअरचा समावेश आहे. याचे एकूण किरकोळ क्षेत्र अंदाजे 95,885 चौरस फूट आहे. सर्व स्टोअर्स चालवल्या जातात आणि व्यवस्थापित केल्या जातात. 23 मालकीची स्टोअर्स आणि 10 फ्रँचायझी स्टोअर्स आहे. फ्रँचायझी मालकीची आणि कंपनी संचालित (“FOCO”) मॉडेलवर हे स्टोअर्स चालवले जातात. या स्टोअर्सपैकी, 19 स्टोअर्स मोठे स्टोअर्स आहेत (2,500 चौ. फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाची), 11 स्टोअर्स मध्यम स्वरूपाची आहेत (1,000 चौ. फूट ते 2,500 चौ. फूट दरम्यानचे क्षेत्रफळ असलेली) आणि 3 स्टोअर्स लहान आहेत (1,000 चौ. फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले). याव्यतिरिक्त कंपनीने मार्च 2022 मध्ये मोबाइल ॲप्लिकेशन “PNG ज्वेलर्स” लाँच केले आहे. डिजिटल उपस्थितीमुळे ग्राहकांना नवीन डिझाइन्स आणि कलेक्शन्सबद्दल अपडेट ठेवता येते आणि त्यांना उत्पादन पोर्टफोलिओची ओळख करून देता येते. ज्यामुळे ग्राहकांचा स्टोअरमधील अनुभव वाढतो. सर्व दागिन्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील आणि बाहेरील 75 पेक्षा जास्त अनुभवी आणि कुशल कारागीर  करतात. ब्रँडचा प्रचार करण्यासाठी त्यांनी सध्या माधुरी दीक्षितला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ‘पीएनजी’ ब्रँडने त्याचा वारसा ‘पी एन गाडगीळ’ ब्रँडकडून घेतला आहे, ज्याचा 1832 पासूनचा समृद्ध वारसा आहे आणि एक शतकाहून अधिक काळाचा वारसा आहे. 'पीएनजी' ब्रँडची परंपरा आणि वारसा जपत कंपनीने महाराष्ट्रात एक मजबूत ब्रँड निर्माण केला असून, आपली उपस्थिती वाढवली आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरी यासह मौल्यवान धातू / दागिन्यांची उत्पादने विविध किंमती आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. जे ग्राहकांच्या गरजा भागवतात आणि विशेषत: विवाहसोहळे, एंगेजमेंट, वर्धापनदिन आणि सण, तसेच दररोज परिधान केलेले दागिने यासारख्या खास प्रसंगांसाठी डिझाइन केलेले संग्रह समाविष्ट करतात. प्रवर्तक, सौरभ विद्याधर गाडगीळ हे सहाव्या पिढीतील उद्योजक आहेत आणि त्यांना भारतातील ज्वेलरी उत्पादन उद्योगात 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी पारंपारिक कौटुंबिक व्यवसायाला समकालीन ब्रँडमध्ये रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलवाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

एयर इंडियातर्फे बेंगळुरू- सॅन- फ्रान्सिस्को क्षेत्रात सेल्फ चेक- इन बॅगेज सुविधा लाँच

• भारतातील अमेरिकी प्रवाशांसाठी ही स्वयंचलित सुविधा पुरवणारी पहिली आणि एकमेव विमानकंपनी • बेंगळुरू विमानतळासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सेवा देणारी पहिली विमानकंपनी गुरुग्राम, २० मार्च २०२४ – एयर...

पुण्याची क्रितीका रेड्डी बनली ॲक्सिस बँकेच्या कला, हस्तकला आणि साहित्यासाठी संपूर्ण भारतातील स्पर्धा SPLASH ची विजेती

●        सहा विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि उपविजेत्याला प्रत्येकी रु. 50 हजाराची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येणार ●        स्पर्धेला ६.८ लाखांहून अधिक सहभागींकडून मोठा प्रतिसाद; 50 दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली स्पर्धा पुणे , 20 मार्च 2024 : अॅक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. बँकेने संपूर्ण भारतात घेतलेल्या कला, हस्तकला आणि साहित्यावरील वार्षिक स्पर्धा SPLASH च्या सहा राष्ट्रीय विजेत्यांची घोषणा केली. ही स्पर्धा 7-14 वयोगटातील मुलांसाठी होती. सर्व सहा अंतिम स्पर्धकांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि उपविजेत्याला प्रत्येकी रु. 50 हजाराची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येईल. हॅम्लेज, फॅबर कॅसल, अमेरिकन टुरिस्टर आणि BoAt सारख्या भागीदारांकडून प्रत्येकी 1 लाख, रोमांचक हॅम्पर्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि उपविजेत्याला रु. प्रत्येकी 50 हजार मिळणार आहेत. 7 ते 10 वर्षे वयोगटातील विजेते: ●        कला :  शिवाश सोनी, GDGPS, नवी दिल्ली ●        हस्तकला : यशवी प्रेमकुमार, सेंथिल पब्लिक स्कूल, सेलम, तामिळनाडू ●        साहित्य: क्रितीका रेड्डी, सिटी इंटरनॅशनल स्कूल औंध, पुणे, महाराष्ट्र 11 ते 14 वयोगटातील विजेते: ●        कला : पी. अक्षिता, द प्रेसिडेंशियल स्कूल, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ●        शिल्प : देवयुध दास, दिल्ली पब्लिक स्कूल, उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल ●        साहित्य : स्तुती जैन, D.A.V. पब्लिक स्कूल, लुधियाना, पंजाब एक माइलस्टोन म्हणून या स्पर्धेला देशभरातून ६.८ लाखाहून अधिक स्पर्धकांकडून प्रवेश मिळाला, ज्यात दरवर्षी ३६% वाढ झाली आहे. या उपक्रमाद्वारे, प्रत्येक मुलाला त्यांची प्रतिभा दाखविण्याच संधी मिळावी याची खात्री करून, बँकेने शारीरिकरित्या (शारीरिक आणि डिजिटल दोन्ही पद्धतीने) स्पर्धा आयोजित करून 50 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. उपक्रमाबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे मुख्य विपणन अधिकारी अनूप मनोहर म्हणाले की,  “आम्ही सर्व सहभागींचे आभार मानू इच्छितो आणि विजेत्यांनी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनंदन करू इच्छितो. आमचा ठाम विश्वास आहे की तरुणांच्या मनात एक चांगल्या उद्यासाठी जग घडवण्याची, मोल्ड करण्याची आणि बदलण्याची ताकद आहे. ॲक्सिस बँक म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला समुदाय तयार करण्याच्या या प्रवासाचा भाग बनू इच्छितो. स्प्लॅशच्या माध्यमातून, आम्ही कला, हस्तकला आणि साहित्य यासारख्या सर्जनशील माध्यमांद्वारे तरुण मनांना त्यांच्या कल्पना, विचार आणि दृश्ये व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढेही करत राहू.” नवीन पिढीमध्ये दयाळूपणाचा विचार रुजवण्याच्या आणि सद्भावना वाढवण्याच्या उद्देशाने, ॲक्सिस बँकेने 1,900+ शाळांपर्यंत पोहोचले आणि तिच्या 5000+ शाखा सक्रिय केल्या. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिष्ठित कलाकार विक्रांत शितोळे यांच्यासह दिशा कथारानी, Imagimake च्या सह-संस्थापक; अमर चित्रकथेचे समूह कला संचालक सॅव्हियो मस्करेन्हास; आणि राजीव चिलाका, ग्रीन गोल्ड ॲनिमेशनचे सीईओ यांचा समावेश असलेल्या ज्युरी पॅनेलने या सहभागींना निवडले.

इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे कविन क्विंतल यांनी २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पहिल्या फेरीत टॉप १५ मध्ये मिळवले स्थान

एपी २५० क्लास रेस २ - इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे रायडर कविन क्विंतल यानी आज दुसरी रेस १३ व्या स्थानावर समाप्त करत टीमसाठी ३ पॉइंट्स मिळवले. त्यांचे सहकारी मोहसिन...

Popular