Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

टायटन वॉचेसचे नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन

अचूकपणा ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे अर्थपूर्ण शैलीतून स्वतःला अभिव्यक्त करू इच्छितात अशा पुरुषांसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन बंगलोर, : मेकॅनिकल विश्वाविषयी पुरुषांना वाटणारे आकर्षण सर्वश्रुत आहे. हे आकर्षण घड्याळांमध्ये साकार करून टायटन वॉचेसने आपले नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन सादर केले आहे. मेकॅनिकल वॉचमेकिंगचे नाजूक सौंदर्य अधोरेखित करत हे कलेक्शन व्हिजिबल मेकॅनिक्सचा सोहळा साजरा करते. कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळामध्ये मनमोहक स्केलेटल डायल्स आहेत, ज्यामध्ये नाजूक इंजिनीयरिंग हे प्रत्येक शैलीचे सार आहे. इंटिग्रेटेड ब्रेसलेट्सपासून ड्युअल फिनिश सॉलिड लिंक स्ट्रॅप्सपर्यंत प्रत्येक डिझाईन त्यामधून विविध व्यक्तिमत्त्वे प्रतिबिंबित होतील अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. २१ ज्वेल बेयरिंग्स, दर तासाला २१६०० बीट्सची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आणि ४२ तासांचे पॉवर रिझर्व्ह असलेले हे कलेक्शन अचूकपणा, कारीगरी आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करते, चोखंदळ घड्याळप्रेमींसाठी तयार करण्यात आले आहे. टायटनच्या ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये चार अनोख्या श्रेणी आहेत, अनोखी व्यक्तिमत्त्वे दर्शवण्यासाठी त्या खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. यिन यांग स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच या अतुलनीय कलेक्शनचा केंद्रबिंदू आहे, संतुलनाचा कलात्मक सन्मान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, असामान्य यिन यांग स्केलेटल डायल डिझाईन आणि रिफाईंड प्रेस-पॅटर्न डिटेलिंग यामध्ये दर्शवण्यात आले आहे. सुबक स्टेनलेस स्टील आणि शानदार रोज गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असलेली ही श्रेणी औपचारिक वातावरणासाठी उत्कृष्ट आहे. फिनिक्स स्केलेटल ऑटोमॅटिक घड्याळ हे फिनिक्स पक्षापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, हे शक्तीचे आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे प्रतीक आहे. याची बोल्ड स्केलेटल डायल फिनिक्स पक्षाच्या पंखांप्रमाणे नाजूक डिझाईन करण्यात आली आहे. नर्ल्ड क्राऊन याचे सोफिस्टिकेटेड डिझाईन अधिक शानदार बनवतो. मोनोक्रोमॅटिक एक्लिप्स ब्लॅक आणि ऑप्युलँट एम्बर रोज गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्रभावी डिझाईन आणि उत्कृष्ट फिनिश यामुळे हे घड्याळ संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या पेहरावांसाठी आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी उत्तम ठरते. नेक्सस स्केलेटल ऑटोमॅटिकमध्ये आधुनिक सौंदर्य आणि चिरंतन प्रतीकात्मकता यांचा मिलाप आहे. याची अनोखी स्केलेटल डायल जहाजाच्या सुकाणूपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे, जे हालचाली आणि प्रगती दर्शवते, नाजूक ऑटोमॅटिक हालचाली दर्शवते. कॉफी ब्राऊन, गनमेटल आणि मिडनाईट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पोर्टी अपील आणि इंटिग्रेटेड ब्रेसलेट असलेले हे घड्याळ स्मार्ट कॅज्युअल लूक्स आणि दररोज वापरण्यासाठी साजेसे आहे. गोल्डन हार्ट स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच सोनेप्रेमींसाठी बनवण्यात आले आहे. बाय-मेटल आणि फुल गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध असून गिल्टेड स्केलेटल डायलमधून विलक्षण जागरूकतेने तयार करण्यात आलेले बारकावे दिसून येतात. फॉर्मल प्रसंग, समारंभ आणि सांज सोहळ्यांमध्ये तुमच्या पेहरावाला अत्यावश्यक असलेला उठावदार, लक्झरियस स्पर्श देण्यासाठी हे अगदी योग्य आहे. टायटन वॉचेसच्या मार्केटिंग हेड अपर्णा रवी म्हणाल्या, "टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन हा आमच्या वाटचालीतील एक लक्षणीय टप्पा आहे, प्रगत, सोफिस्टिकेटेड होरोलॉजी आणि आधुनिक शैली यांचा समन्वय दर्शवणारी घड्याळे तयार करून नावीन्य घडवत राहण्याप्रती टायटनची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. चोखंदळ आणि शैलीविषयी जागरूक असलेले पुरुष, ज्यांना घड्याळ हे स्व-अभिव्यक्तीचे माध्यम वाटते, अशांसाठी हे तयार करण्यात आले आहे, यांची कारीगरी तुम्ही काहीही बोलण्याआधी खूप काही व्यक्त करते.” प्रत्येक घड्याळामध्ये ल्युमिनस काटे, स्पष्टपणे अप्लाय करण्यात आलेले इन्डायसेस आणि ड्युएल-फिनिश्ड सॉलिड स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्स आहेत, दिवसभर आणि रात्रीदेखील प्रीमियम फील देणाऱ्या या घड्याळांच्या किमती १८,३२५ रुपयांपासून २२,१५० रुपयांपर्यंत आहेत. टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन सर्व टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एयर इंडियाद्वारे टोक्यो हानेडा येथे १५ जून २०२५ पासून दैनंदिन विमानसेवा

·  दिल्ली ते टोक्यो हानेडा विमानसेवेची फ्रीक्वेन्सी चार साप्ताहिक फ्लाइट्सवरून सातवर नेणार गुरुग्राम, २९ एप्रिल २०२५ – एयर इंडिया, या भारताच्या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने दिल्ली ते टोक्यो हानेडादरम्यानच्या नॉन-...

आजच्या बाजारपेठेत रिटेल गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप फंड हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो.

पुणे, : आज भारतीय शेअर बाजार एका रोमांचक वळणावर उभा आहे. जगभरात सुरू असलेली टॅरिफ युद्धे आणि मॅक्रो इकॉनॉमिक आव्हानांमुळे, जागतिक बाजारपेठा अत्यंत अस्थिर आहेत...

पूनावाला फिनकॉर्पचा  कन्झ्युमर ड्युरेबल लोन मार्केटमध्ये  प्रवेश

मुंबई - सायरस पूनावाला ग्रुपने प्रमोट केलेल्या एनबीएफसी आणि ग्राहक तसेच एमएसएमई कर्जदेण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पीएफएल) ने आज त्यांच्या कन्झ्युमर...

भिमतर्फे विश्वासार्ह युजर्सना सुरक्षितपणे पेमेंट करता यावे यासाठी पार्शियल डेलिगेशनसह युपीआय सर्कल लाँच

युजर्सना पाच विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सना रियल- टाइम अप्रुवलसह युपीआय अ‍ॅक्सेस देता येणारमुंबई – एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफइंडियाच्या (एनपीसीआय) संपूर्ण...

Popular