Industrialist

स्विच मोबिलिटीची कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यासाठी जेएसडब्ल्यूशी भागिदारी

 कर्मचारी वाहतुकीसाठी पहिली लक्षणीय आणि सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस ऑर्डर-स्विच मोबिलिटीकडे १२ वर्षांसाठी बसेस मालकी आणि हाताळणी, चार्जिंग सुविधा आणि देखभालीचे काम-जेएसडब्ल्यू विजयनगर येथे कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर केला जाणार चेन्नई– २८ नोव्हेंबर २०२२ – स्विच मोबिलिटी लि. (स्विच) या अत्याधुनिक कार्बन न्युट्रल इलेक्ट्रिक बस आणि हलक्या व्यवसायिक वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने जेएसडब्ल्यूशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत भारतात कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. देशात कर्मचारी वाहतुकीसाठी मिळालेली ही इतकी मोठी पहिलीच ऑर्डर असून जेएसडब्ल्यू स्टीलच्या विजयनगर कारखान्यात ७१ बसेस वितरित केल्या जातील. या बसेसचे मालकी आणि सर्व कामकाज १२ वर्षांसाठी स्विच मोबिलिटीकडे राहाणार असून त्यात चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे, देखभाल करणे यांचा समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला जेएसडब्ल्यू समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी झेंडा दाखवला. स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘भारतातील खासगी बसेसची बाजारपेठ देशातील महत्त्वाच्या वाहतूक बाजारपेठांपैकी एक असून त्याचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यापैकी खासगी इलेक्ट्रिक बस बाजारपेठ पुढील पाच वर्षांत ६० अब्ज रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. स्विच ईआयव्ही१२ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी वाहतूक क्षेत्रात प्रवेश करताना आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शाश्वत प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. जेएसडब्ल्यूसह केलेली ही भागिदारी स्विच मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याअंतर्गत आम्ही देशातील आमची पहिली व सर्वात मोठी खासगी बसेसची ऑर्डर पूर्ण करत आहोत. आमच्या स्विच उत्पादनांमध्ये विश्वास दाखवल्याबद्दल मी जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. या शाश्वत प्रवासात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवलेल्या देशातील इतर काही कॉर्पोरेट्सबरोबरही आमची बोलणी सुरू आहेत.’ एयर कंडिशन्ड बसेसमध्ये स्विच ईआयव्ही१२ चा समावेश असून ग्राहकस्नेही तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि अत्याधुनिक स्वरूप ही तिची वैशिष्ट्ये आहेत. स्विच ईआयव्ही१२मध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान सुविधा स्विच ऑन देण्यात आले आहे जे रिमोट अनेबल करते, रियल टाइम डायग्नोस्टिक आणि देखरेख सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या डिजिटल बॅटरी व्यवस्थापन साधन सुविधा देते. ईआयव्ही प्लॅटफॉर्मचे ईव्ही आर्किटेक्चर हे युरोपियन स्विच ई१ बसेसमध्ये पाहायला मिळते. बसेसमध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या मॉड्युलर बॅटरीजचा आधुनिक लिथियम- इयॉन केमिस्ट्रीसह समावेश करण्यात आला असून या बॅटरीज भारतीय हवामान लक्षात घेऊन खास तयार करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन्स आणि बॅटरीज अधिक चांगली कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकाऊपणा आणि बाजारपेठेत मालकीहक्काचा कमी खर्च यांसह तयार करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसेसचे कामकाज व सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी स्विच आपल्या कर्मचारी वर्गाचा विस्तार करत असून पुढील पाच वर्षात मनुष्यबळ ३० टक्के वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत राहात कंपनीने २०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरवले आहे.

हिंदुजांनी यावर्षीच्या युकेमधील एशियन रिच लिस्टमध्ये सलग आठव्यांदा अव्वल स्थान मिळवले

मागील वर्षीच्या तुलनेत ३ बिलियन युरोंची वाढ नोंदवत, ३०.५ बिलियन युरोंच्या अनुमानित संपत्तीसह, हिंदुजा परिवाराने यावर्षीच्या युकेमधील एशियन रिच लिस्टमध्ये सलग आठव्यांदा अव्वल स्थान मिळवले. वेस्टमिन्स्टर पार्क...

इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याच्या ध्येयात मीशो ओएनडिसीमध्ये सामील

बंगळूर, नोव्हेंबर २३, २०२२: भारताची तेजीने वाढणारी कॉमर्स कंपनी मीशो ने आज जाहीर केले की, ते खरेदीदारांना  अति-स्थानिक विक्रेत्यांशी जोडून  सर्वसमावेशक ई-कॉमर्स ईको सिस्टम तयार करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला...

सत्या हिंदुजा, अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटचे संस्थापक साउंड अज फ्रीडम डायलॉग सादर करणार

मुंबई, २३ नोव्हेंबर – सत्या हिंदुजा – विविधगुणी कलाकार, स्पॅशियल साउंड एनव्हॉरमेंट कंपोझर आणि अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटच्या संस्थापक (एएसई) मानसिक स्वातंत्र्य आणि आरोग्यासाठी नव्या वाटा खुल्या...

मुंबई हून न्यूयॉर्क (जे एफ के), फ्रँकफर्ट आणि पॅरिस साठी विमाने वाढविली.

एअर इंडियाने भारतापासून यूएसए आणि यूरोप मधील सहा गंतव्यस्थानांपर्यंत नेटवर्क अजून मजबूत केले. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांहून नवीन विना-थांबा उड्डाणे चालू केली.     दिल्ली हून...

Popular