एयर इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवा एक्स- इंडियासाठी अद्ययावत इनफ्लाइट मेन्यू

Date:

फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी व्हिगन पर्याय, लॉरेंट- पेरियर शॅम्पेन आणि वाइन्सची आकर्षक श्रेणी

केबिन क्लाससाठी गॉर्मे मील्स, ट्रेंडी अपेटायझर्स आणि आकर्षक डेझर्ट्स

नवी दिल्ली – एयर इंडियाने ग्राहकांना अधिक आनंद मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या (एक्स- इंडिया) सर्व केबिन्समधील इनफ्लाइट खाद्यपदार्थ व पेये यांचा समावेश असलेला मेन्यू अद्ययावत केला आहे.

प्रवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या मदतीने हा मेनू नव्याने तयार करण्यात आला असून त्यात गॉर्मे मील्स, ट्रेंडी अपेटायझर्स, रूचकर डेझर्ट्स तसेच आरोग्यदायी खाण्याचा ट्रेंड लक्षात घेऊन भारतातील स्थानिक पदार्थांचा प्रभाव दर्शवणारे खाद्यपदार्थ समाविष्ट करम्यात आला आहे. एयरलाइनच्या बार मेन्यूमध्ये आता प्रीमियर ब्रँड्सच्या स्पिरीट्सचा समावेश करण्यात आला असून उत्तमोत्तम फ्रेंच आणि इटालियन वाइन्सचा समावेश असलेली वाइन लिस्ट तयार करण्यात आली आहे.

एयर इंडियाच्या इनफ्लाइट सेवा विभागाचे प्रमुख संदीप वर्मा म्हणाले, ‘प्रवाशांचा एयर इंडियाचा अनुभव उंचावण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही नव्या मेन्यूमध्ये नवा विचार व उर्जा आणली आहे. प्रवाशांनी एयर इंडियाच्या ऑन बोर्ड विमानसेवेतील खाद्यपदार्थ व पेयांचा एखाद्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये असल्याप्रमाणे आनंदाने आस्वाद घ्यावा असे आम्हाला वाटते.’

‘नवा मेनू तयार करताना आम्ही त्यात पौष्टिक आणि रूचकर तसेच आधुनिक व शाश्वत पद्धतींचा वापर करून बनवलेले खाद्यपदार्थ समाविष्ट करण्यावर भर दिला आहे.’

एयर इंडियात खानपानाचा दर्जेदार अनुभव देण्यासाठी इन- हाउस तज्ज्ञ, केटरिंग भागीदार व विविध पुरवठादारांची टीम एकत्र आणली गेली.

व्हिगन खाद्यपदार्थांचा विचारपूर्वक समावेश – एयर इंडियाच्या फर्स्ट आणि बिझनेस क्लास ग्राहकांपैकी जे व्हिगन जीवनशैलीचा अवलंब करतात त्यांच्यासाठी वनस्पतीजन्य पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला असून त्यात सब्ज सीख कबाब, थाई रेड करी विथ टोफू अँड व्हेजिटेबल्स, ब्रोकोली अँड मिलेट स्टेक, लेमन सेवया उपमा, मेदू वडा आणि मसाला उत्तपम यांचा समावेश आहे.

मुख्य आणि हलक्या जेवणासाठी नवी प्रेरणा – सर्व क्लासमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्यासाठी फ्युजन व अभिजात खाद्यपदार्थांचा मेळ घालण्यात आला आहे. त्यात मशरूम स्क्रॅम्ब्ल्ड एग, टर्मरिक चिली ऑम्लेट, मिक्स्ड व्हेजीटेबल पराठा, अचारी पनीर आणि इमेंथल सँडविच इन मल्टीग्रेन ब्रेड, ग्रिल्ड प्रॉन्स न ए फेनेल क्रीम सॉस, बेक्ड फिलेट फिश विथ अ हर्ब आलमंड अँड गार्लिक क्रस्ट, मसाला दाल अँड ब्राउन राइस खिचडी विथ स्प्राउट्स, रोस्ट टोमॅटो अँड बोकोसिनी कप्रेसे विथ कालामाटा ऑलिव्ह्ज अँड पेस्टो, क्लासिक टोमॅटो अँड कोरिएंटर शोरबा विथ क्रिस्प नमकपारा यांचा समावेश असेल.

गोड पदार्थ एयर इंडियाच्या प्रवाशांना एकापेक्षा एक सरस डेझर्ट्सचाही आस्वाद घेता येईल. त्यामध्ये मँगो पॅशनफ्रुट डिलाइट, क्विनोआ ऑरेंज खीर, एसप्रेसो आलमंड क्रम्बल मूस केक, खजूर तुकजा, केसर फिरनी, सिंगल ओरिजिन चॉकलेट स्लाइस, चम-चम सँडविच विथ ब्लूबेरी सॉस आणि हंगामी फळे यांचा समावेश असेल.

बार मेन्यूग्राहकांना एयर इंडियाच्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या बार मेन्यूमध्ये फाइन वाइन्स उपलब्ध होणार असून त्यात लॉरेंट- पेरियर ला कुवे ब्रुट शॅम्पेन, उत्तर इटलीच्या प्रसिद्ध वाइनयार्ड्स शॅटो दे लहेस्ट्रेंजलेस ऑलिव्हियर्सचॅटौ मिलॉनच्या वाइन्स यांचा समावेश असेल. त्याशिवाय नव्या मेन्यूमध्ये विविध प्रकारच्या व्हिस्की, जिन, व्होडका आणि प्रीमियम ब्रँड्सच्या बीयर्सही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

आदर्श जोडी – फळांच्या स्वादांपासून सुगंधी मसाल्यांची चव असलेली मॉकटेल्स एयर इंडियाच्या सिलेक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात व्हर्जिन मेरी, कॅलिफोर्निया ऑरेंज, अपल स्पित्जर आणि विविध ज्युसेसचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे फाइन डाइनचा अनुभव आणखी उंचावण्यास मदत होईल. गरम पेयांची आवड असलेल्यांसाठी ताजी कॉफी (क्लासिक कॉफी ब्लेंड व कॅपॅचिनो) किंवा चहा (आसाम, अर्ल ग्रे आणि मसाला) उपलब्ध करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....