Industrialist

“ हा विकासाभिमुख अर्थसंकल्प – नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसइ) चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) आशिषकुमार चौहान

“ हा विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे, जो पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती या दोन्हीवर लक्ष केंद्रित करणारा आणि जवळपास प्रत्येकासाठी आयकर कमी करून राज्यांना भरपूर पैसे...

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आज 35% कोसळले:संसदेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ; US शेअर बाजारातून अदानींना बाहेरचा रस्ता

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल 35% ची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत 1000 रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर...

एयर इंडिया ने मिलानसाठी थेट विमानसेवा चालू केली; यूरोपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली 

नवी दिल्ली, २ फेब्रुवारी, २०२३: भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने कालपासून आठवड्यातून चार वेळा दिल्ली ते मिलान थेट विमानसेवा सुरू केली. नुकत्याच सुरू केलेल्या दिल्ली ते कोपेनहेगन आणि दिल्ली ते विएन्नाला या एयरइंडियाच्या उड्डाणांसह या नवीन विमानसेवेमुळे यूरोपमध्ये एअरइंडियाच्या पाऊलखुणा लक्षणीयरीत्या मजबूत होतील. परतीचे विमान AI १३८ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले.             दिल्ली ते मिलान हे विमान AI १३७  दर बुधवार, शुक्रवार, रविवार आणि सोमवारी चालते. ते दिल्लीहून दुपारी १४:२० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निघून १८:३० वाजता (LT) मिलान येथे उतरते. परतीचे विमान AI १३८ त्याच दिवशी २०:०० वाजता मिलानहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता दिल्लीला पोहोचते.             १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीटस् असलेल्या या आधुनिक पुढच्या पिढीच्या B787-8 ड्रिमलाइनर विमानामार्फत दिली जाणारी दिल्ली-मिलान-दिल्ली सेवा दोन्ही देशातील लाखों पर्यटक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवाश्यांच्या आकांक्षा पूर्ण करते.             भारतातील पर्यटकांना मिलान हून झ्यूरिक, रोम, फ्लॉरेन्स, व्हिएन्ना, व्हेनिस, मॉन्टेकार्लो, म्यूनिक, बुडापेस्ट, जिनिव्हा, कॅन्झ आणि कोपेनहेगन या लोकप्रिय शहरांमध्ये रस्त्याच्या मार्गाने सहज प्रवेश मिळेल. इटलीमध्ये असलेले भारतीय वंशाचे लोक आणि भारतीय उपखंडातील विविध शहरांना भेट देण्याचा विचार असलेले आणि आग्नेय आशिया, पूर्व आशिया, काठमांडू आणि अगदी ऑस्ट्रेलियामधील गंतव्य स्थानांवर प्रवास करण्याचा इरादा असलेले इटालियन पर्यटकांना या दिल्ली ते मिलान थेट विमानसेवेचा लाभ होईल. दोन्ही देशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला सलाम म्हणून एयर इंडिया या मार्गाच्या भाड्यावर प्रचारात्मक आकर्षक सूट ही देणार आहे.             काल एयर इंडियाच्या ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख आणि ग्राउंड हॅन्डलिंग ग्लोबल प्रमुख श्री.राजेश डोग्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभानंतर २०४ प्रवाश्यांसह विमान AI १३७ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मिलान कडे वेळेवर निघाले. एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, जीएमआर आणि एआयएसएटीएस अधिकाऱ्यांसमवेत श्री. राजेश डोग्रा यांनी समारंभपूर्वक दीप प्रज्वलन केले आणि फीत कापून नवीन विमान सेवेचे उद्घाटन केले.  टर्मिनल ३ वर एका सजवलेल्या समर्पित काऊंटर वर विमानासाठी रिपोर्टिंग करणाऱ्या पहिल्या प्रवाश्याला एक मोठे सजवलेले आकर्षक बोर्डिंग कार्ड दिले गेले. या पहिल्या विमान सेवेचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रवाश्यांना जेवणाचा एक संपूर्ण व आनंददायी अनुभव देण्यासाठी अस्सल इटालियन खाद्य पदार्थांसह भारतीय पदार्थांची विशेष समृद्ध चव यांना मिळवून खास बनवलेला केलेला मेन्यू हे होते.             मिलान येथील मालपेन्सा विमानतळावर या सोहळ्याच्या स्मरणार्थ उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या विमानाचे जोरदार स्वागत केले. परतीचे विमान AI १३८ २४९ प्रवाश्यांसह मिलानहून निघून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ०८:०० वाजता दिल्ली येथे पोहोचले.             ही उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने एयर इंडिया आता ७९, – ४८ यूनायटेड किंगडम कडे जाणाऱ्या आणि ३१ अन्य यूरोप खंडात जाणाऱ्या-,  साप्ताहिक थेट विमानसेवेमार्फत यूरोप मधील सात शहरांना विमानसेवा देईल.             भाडे तत्वावर घेतलेल्या विमानांच्या ताफ्यात वाढ करणे आणि विद्यमान विमाने सक्रिय सेवेत परत चालू करणे यावर एयर इंडियाने सातत्याने भर दिल्यामुळे हा विस्तार शक्य झाला आहे.             या विस्तारावर भाष्य करताना एयर इंडिया चे मुख्य वाणिज्य अधिकारी श्री. निपुण अग्रवाल म्हणाले, “या मिलान कडे जाणाऱ्या नवीन विमानसेवेतून  आम्ही यूरोप मधील प्रमुख स्थळे व्यापण्यासाठी आमचे पंख पसरणार आहोत आणि आमच्या भारताचे जागतिक नेटवर्क मजबूत करण्यासाठी योजलेल्या पंच वर्षीय (विहान.एआय) Vihaan.AI या योजनेच्या एक महत्त्वाच्या घटकाची पूर्तता करणार आहोत. या नवीन उड्डाणांची सुरुवात हा या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे , जो आमच्या विमानांच्या ताफ्याच्या विस्ताराला पूरक आणि सुसंगत आहे. आम्ही नवीन प्रवाश्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे खास एयर इंडियाचे खास भारतीय आदरातिथ्य करण्यास उत्सुक आहोत.”

FPO तून उभारलेले 20 हजार कोटी अदानी परत करणार:रात्री उशीरा FPO रद्द केला, गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी निर्णय : अदानी

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस...

किफायतशीर घरांसाठी ७९,००० कोटी रु. निधीची तरतूद इमारत, बांधकाम साहित्य आणि संबंधित क्षेत्रांसाठी उतप्रेरक- प्रकाश छाबरिया

फिनॉलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश छाबरिया यांचे केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ बाबत वक्तव्य “अर्थसंकल्पाने उपभोगाला अधिक प्रोत्साहन देण्यावर आणि अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला...

Popular