सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दि 26मार्च ते 31मार्च 2024 या दरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात सहा दिवस आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी -ढोलकीचा जुगलबंदी...
अभिनेत्री झरीन खानने 2 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे 3रा राष्ट्रीय ट्रान्सजेंडर अवॉर्ड 2024 ला प्रमुख पाहुनी म्हणून उपस्थित राहिली. सामाजिक कारणांना सक्रियपणे पाठिंबा...
सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. 'जय जय शनिदेव' असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हेअजून गुलदस्त्यात आहे. मालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. लवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. मालिकेत कोण कलाकार असतील, मालिकेचा सारांश काय असेल; हे पुढे समजेलच. त्यासाठी सोनी मराठी पाहत राहा. मालिकेबद्दलची पुढील माहिती सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होईल.
‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी 'चांदवा' अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट...