झी युवा या वाहिनीने युथफूल कन्टेन्ट सादर करून तमाम महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली...
मराठी संस्कृती आणि मूल्य झी टॉकीजनी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच त्यांच्या सादरीकरणातून जपली आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा' म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक...
जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनलीआहे. झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनातघर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणिअजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.
लग्न झाल्यापासून अज्या आणि शीतली यांना एकत्र असा वेळच घालवायला नाही मिळत आहे. नातेवाईक आणि घरच्या सदस्यांची उठबस करण्यातच शीतलीचासर्व वेळ जातो त्यामुळे अज्याची मात्र चिडचिड होतेय. समाधान मामा आणि जीजी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून त्यांना बाहेर फिरायला जायचा सल्लादेतात. सध्या मालिकेत अज्या आणि शीतली त्यांच्या हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. महाबळेश्वरच्या गारव्यात अज्या आणि शीतलीप्रेमाचे ४ क्षण घालवत आहेत.
या खास भागाचे चित्रीकरण करताना शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, "प्रेक्षकांना अज्या-शीतलीचं प्रेम आणि त्यांची अनोख्या लव्हस्टोरी मध्येजास्त इंटरेस्ट आहे आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत व सर्व अडचणींपासून दूर, काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहेत त्यामुळे आमच्या इतकेच प्रेक्षक देखीलखूप उत्सुक असणार आहेत."
अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण म्हणाला, "प्रेक्षक अजिंक्य आणि शीतलच्या लग्नासाठी खूपचं उत्सुक होते आणि आता ते एकत्र आले आहेत त्यामुळेत्यांना एकत्र बघताना देखील प्रेक्षकांना नक्कीच छान वाटत असणार आहेत. होनीमूनसाठी ते दोघे महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आले आहेत आणिप्रेक्षक लवकर हे पाहू शकणार आहेत कि त्या दोघांनी महाबळेश्वर मध्ये काय मजा केली आणि ते कुठे कुठे फिरले." 'लगीर झालं जी' मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर!!!
झी युवावरील बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या मालिकेत आता प्रेक्षक एक नवा चेहरा पाहत आहेत. योगिता चव्हाणने गावठी या मराठी चित्रपटातून...
झी युवा या वाहिनीने युथफूल कन्टेन्ट सादर करून तमाम महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचेमनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमातप्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री फुलपाखरू मालिकेत योग टीचर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपट नाटक आणि मालिका या तीन ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिके द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी या मालिकेत एका योग टीचरच्या भूमिकेत दिसणारआहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही.
छोट्या पडद्यावरील तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, "माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात छोट्या पडद्यावर झाली त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीमखूप एनर्जेटिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना देखील खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."
हेमांगी कवीची ही नवीन भूमिका पाहायला विसरू नका फुलपाखरूमध्ये सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त झी युवावर!!