होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू'या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गो
ष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.
चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहे. प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांनी खूप पसंती मिळत आहे.
'होणार सून..' यामालिकेतील जान्हवीचं तीन पदरी छोटं मंगळसूत्र अनेकींना आवडलं आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात
. तसंच वैदेहीचं मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे.
वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आलं आहे. हेमंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके आहे. यामुळे हे आणखी चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.'आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखील सांभाळायचं असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींना खूप कुतुहल वाटतं. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्र शोभेल असं असलं कीत्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. आणियाच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे.'असं प्रिया कळंबे सांगतात.
‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे...
झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध व रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली...
‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावरअक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-
शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातूनकेमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्नयामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका आता खरी रंगात आली आहे. राधिका गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम आता कोर्टात चांगलाच रंगत आहे. जवळजवळकेस राधिकाच्या बाजूने झुकत असताना पण गुरु आजारी पडल्याचं खोटं नाटक करून कोर्टाची पुढची तारीख घेतो. आईला त्याची काळजी आहे हे तो चांगलाचजाणून आहे आणि त्यामुळे कपटी, खोटा गुरुनाथ अजूनही हार मनात नसून आईचे मन आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आईच्या मदतीवर गुरु हीकेस जिंकणार का? कि तोंडावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून तेत्याला धारेवर धरतात. या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाईकरण्याची चेतावनी देतात. मग गुरु खरंच राजीनामा देणार का? आणि दिला तर मग शनाया गुरुसोबत राहणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आली. झी मराठी वाहिनीने पुन्हा एकदा शंभर...