फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात
अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत.
अशाकृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे
. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’
पुरस्कार जाहीर झालेआहेत. हा कार्यक्रम झी युवावर रविवार २० जानेवारीला संध्याकाळी ७
वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर
यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिला 'तेजस्वी चेहरा' या सन्मानाने गौरवण्यात येणार
आहे.
हिंदी-मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली श्रिया पिळगावकर हिने
वयाच्या ५व्या वर्षांपासूनच कॅमेराची भाषा शिकली. लहानपणी तिने तू तू मे मे या मालिकेत
बिट्टूची भूमिकावठवली. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं पण तिने
तिच्या अभिनय कौशल्याने भारतातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता मिळवली.
अभिनयच नव्हे तर श्रियानेदिग्दर्शन क्षेत्रात देखील आपली चुणूक दाखवली. तिने द पेन्टेड
सिग्नल आणि ड्रेसवाला या २ शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या. तसेच पंचगव्य या डॉक्युमेंट्रीच
दिग्दर्शन करून तिने वेगळ्याच विषयाला हातघातला. अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीला झी
युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात 'तेजस्वी चेहरा' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
...झी युवा सन्मान रविवार २०जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर.
मुंबई येथील ताज लँड्स एन्डने उत्सवी रंग रूप धारण केले होते. भगव्या रंगात तो दिवस विलीन झाला होता जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ती...
सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या
एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते
लग्नापर्यंतचा...
मुंबई– 2016 मध्ये ऊरी हल्ल्याने संपूर्ण देशातल्या प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि आजही हा विषय गहन चर्चेचा ठरला आहे. बटालियन 609 हा आगामी चित्रपट...
मुख्यमंत्र्यांनी आज केलं पोस्टरच अनावरण
मुंबई-
बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता...