Filmy Mania

‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला

पुणे : धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय... त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक...

‘कोण होणार करोडपती’ लवकरच सोनी मराठीवर

नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व घेऊन येत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या  सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार ? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार?आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न  आता सगळ्यांच्या मनात आहेतच.  यासगळ्याच गोष्टी हळूहळू उलगडणारआहेत... लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या 'कोण होणार करोडपती' च्या नव्या पर्वात...

हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेसाठी भाऊ कदम, सागर कारंडे, भाग्यश्री मोटे एकत्र

विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. या मालिकेचे शीर्षक आहे श्री कामदेव प्रसन्न. त्यांच्यासोबत...

माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन

बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या 'बकेट लिस्ट' या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

– उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण...ही आहे 'ती फुलराणी'तल्या मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, "नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!", असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला... त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा 'ती फुलराणी' फक्त सोनी मराठीवर...

Popular