Filmy Mania

‘मिर्जापुर’ आणि ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्यामूळे अली फजल-कीर्ति कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स !!

टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामूळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप जास्त वाढत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या...

11 मार्चपासून सुरू होणार बाबांच्या राजकन्येचा प्रवास

राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील 'ती' राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते - कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. 21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनीआवाज दिला आहे तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृध्द करणाऱ्या अशोक पत्की यांचं संगीत याला लाभलं आहे. या मालिकेच्या शीर्षकगीताच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी जमलेली देवकीपंडित आणि अशोक पत्की यांच्या संगीताची मैफल प्रेक्षकांना सुखावणारी ठरणार आहे.‘एक होती राजकन्या’ असा बाबांच्या कवितेतून होणारा या राजकन्येचा उल्लेख आणि राजकुमाराच्या भेटीने होणारा शेवट,11 मार्चपासून सोमवार ते शनिवारसंध्याकाळी 7.30 वाजता  सोनी मराठीवर.

‘एक घर मंतरलेलं’गूढ आणि रहस्यमय नवीन मालिका

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची अडारकर. यापूर्वी 'का रे दुरावा' या मालिकेत ही जोडी बराच काळ एकत्र...

शीतलीला आहे मराठी भाषेचा अभिमान

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं...

स्वराज्याच्या तेजःसूर्याचा इतिहास उलगडणारे महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’

बारामतीत पार पडला शुभारंभाचा प्रयोग पुणे-मोठ्या वृक्षांच्या छायेत लहान वृक्ष वाढत नाहीत या वाक्याला छेद देत ज्यांनी आपल्या पित्याने कमावलेला नावलौकिक आणि त्यांची कीर्ती स्वकर्तृत्वाने...

Popular