Filmy Mania

नृत्यांगना विशाखा काळेच्या आत्महत्येमागे कारण काय ? …हडपसर पोलिसांचा तपास सुरु …

राज्यात ६ कलाकारांच्या आत्महत्या... पुणे-नृत्य कलावंत असलेल्या तरूणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हडपसर भागातील   गोंधळेनगर भागात मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास...

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक

पुणे-महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती...

अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणचे निधन

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते 51 वर्षांचे होते. अजयने मंगळवारी दुपारी...

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत होणार शिवबांचा विवाह-सोहळा

जिजाऊ लावणार शिवबा आणि साईबाई यांचं लग्न - 'स्वराज्यजननी जिजामाता  विवाह-सप्ताह विशेष' ५-१० ऑक्टोबर स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची पुनर्बांधणी सुरू केली आहे. शहाजी राजांनी पाठवलेली कवड्यांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोत, हे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवड्यांची माळ अभिमानानं परिधान केली. दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महतत्त्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लवकरच शिवबा आणि सईबाई यांचा विवाह-सोहळा पार पडणार आहे. शिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला याला बरीच राजकीय कारणं होती. स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. शिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोचू शकले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी एकट्यांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. ही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्या, तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नये, ह्यासाठी शत्रू पक्ष करत होता. पण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना एकट्या स्त्रीनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर प्रेक्षकांना 'विवाह-सप्ताह' पाहायला मिळणार आहे. मुलखावेगळ्या आईची ही गाथा आता रंजक अशा वळणावर येऊन पोचली आहे. जिजाऊ रयतेचा जाणता राजा घडवत आहेत. 'स्वराज्यजननी जिजामाता'  सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा.  सोनी मराठी वाहिनीवर.

नाट्यपरिषदेच्या खोटारडेपणावर ज्येष्ठअभिनेत्री भडकल्या..

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न, काय आहे प्रकरण ? ५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक, आणि...

Popular