Filmy Mania

” अल्टिमेट वेलनेस वॉरियर ” अभिनेत्री शिल्पा शेट्टी !

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ठरली या मासिकाची मॅगझिन कव्हर ! अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनायपासून फिटनेस पर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनयाचा पलिकडे जाऊन या अभिनेत्री...

तमन्ना भाटिया हिच्या ” जी करदा ” ची रिलीज डेट जाहीर !

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या शूटींग करण्यात व्यस्त आहे. " जी करदा "  ही तिची आतापर्यंतचा सर्वात प्रतिक्षित वेब शो येणार असून याची रिलीज डेट...

‘गोदावरी’ चित्रपट ३ जूनपासून जिओ सिनेमावर मोफत 

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला, निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’ हा चित्रपट जिओ सिनेमावरील डिजिटल प्रीमियरद्वारे आणखी अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज...

मनोज बाजपेयींच्या फॅमिली मॅनपासून अमित साधच्या दुरंगापर्यंत असे अनेक वेबशो च्या नव्या सीझन पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक ! 

ओटीटी शोने त्याच्या आकर्षक कथा आणि  प्रेक्षकांचा मूड ओळखून अनेक नवीन वेब शो ओटीटी वर रिलीज केले. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेनुसार हवं ते बघता यावं...

‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर

     सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन हे   'कोण होणार करोडपती'या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या बाप-लेकीबरोबर  रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दोन सचिन एकत्र असतील. तेही नक्कीच गमतीदार असेल. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार चिरतरुण व्यक्तिमत्त्व सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर.                              चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली. श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी  वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही  सादर केले आणि 'कोण होणार करोडपती'चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला. 'कोण होणार करोडपती' विशेष, ३ जून,  शनिवारी रात्री ९ वाजता,सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल

Popular