Feature Slider

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले

मुंबई, दि. 13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत...

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च...

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवणार, धमकी देणारा फोन आल्यामुळे खळबळ

पुणे-पुण्यात गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील गुगल कार्यालयाला फोन करुन एकाने ही धमकी दिली. तर, मुंबईच्या सहायक पोलिस...

देश जोडणाऱ्या राहुलजी गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल?

कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा !: नाना पटोले मविआचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये संयुक्त प्रचार सभा. चिंचवड दि. १३...

कुठे नेऊन ठेवले आपल्या कसब्याला ? रवींद्र धंगेकर यांचा सवाल

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता तरीही ... पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न,अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी प्रश्न जैसेथे च का ? पुणे-शहराच्या मध्यभागी असणारा आपला कसबा विधानसभा मतदारसंघ आता सर्वप्रकारच्या नागरी प्रश्नांचे आगर बनला असून, त्यामुळेच भाजपाला विचारावेसे वाटते की कुठे नेऊन ठेवले आपल्या कसब्याला? केंद्रात, राज्यात व पुण्यातही भाजपा सत्तेवर असतानाही कसब्याचे प्रश्न का सोडविले नाहीत? अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी, कमी दाबाने पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न, मध्यवर्ती बाजारपेठेचे प्रश्न, भाजीमंडई व मिनिमार्केटचे प्रश्न असे असंख्य प्रश्न असतानाही आणि आमदार व सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे असतानाही त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच कसबा मतदारसंघातील नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.  महाविकास आघाडीतर्फे मात्र हे प्रश्न सोडविणे हाच माझा अजेंडा असेल, असे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले, पदयात्रा संपल्यानंतर ते बोलत होते.  आज सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी नारायण पेठेतील मुरलीधर भोजनालय येथून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेसचे गोपाळ तिवारी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रेस सुरुवात झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी गोपाळ तिवारी यांनी पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन धंगेकर यांचा सत्कार केला. यावेळी ब्राम्हण समाजाचे अनेक स्त्री- पुरुष सहभागी होते. तिन्ही पक्षाचे झेंडे, धंगेकरांचे कटआउट्स यासह पदयात्रा निघाली. पदयात्रेच्या प्रारंभी धंगेकरांच्या पदयात्रेची माहिती सांगणारी रिक्षा व पाठोपाठ शेकडो कार्यकर्ते अशी ही पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात होते. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, कमलताई व्यवहारे, दीप्ती चवधरी, लता राजगुरू, वैशाली मराठे, नीता परदेशी, संगीता तिवारी, ...

Popular