मुंबई, दि. ३ मे २०२३ : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून श्री. अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. अरविंद भादीकर हे कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.
अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. भादीकर हे अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत. मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले.
खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५ मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा, नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते.
नवी दिल्ली, 3 मे 2023
अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी, दूरदृष्टीने संरचनात्मक बदल घडत आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी...
लीवोने पुण्यामध्ये नवीन स्किन अॅण्ड अॅण्टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आयझॅक ल्यूक्ससोबत सहयोग केला, ब्रॅण्ड क्लायण्ट्सना उच्च दर्जाची सेवा व निष्पत्ती देण्याप्रती त्याच्या कटिबद्धतेसाठी ओळखला जातो. नवीन...
गुरुग्राम, ०३ मे २०२३: भारतातील अग्रगण्य एअरलाइन्सपैकी एक आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने पूर्ण-सेवा कॅरियर विस्तारा (टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम) सोबत...
आशा पारेख, अंजन श्रीवास्तव, डॉ.निलेश साबळे यांचाही गौरवमुंबई- संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने...