भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे परदेशात हस्तांतरित होणे  रोखण्यासाठी  आणि एफएटीएफ  काळा पैसा विरोधी तसेच  दहशतवाद वित्तपुरवठा विरोधी मानकांची प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्यासाठी ब्रिक्सने प्रयत्न करणे आवश्यक आहे: डॉ जितेंद्र सिंह

Date:

भ्रष्टाचाराविरुद्धच्या आपल्या वचनबद्धतेचा भारताने आज पुनरुच्चार केला आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत अत्यंत कडक धोरण अवलंबले असलयाचे  स्पष्ट केले.

भारताच्या वतीने ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित करताना, पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत भ्रष्टाचार आणि बेहिशेबी पैशांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. या संदर्भात  मोदी सरकारने गेल्या 8 वर्षात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत असे त्यांनी सांगितले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी ब्रिक्स देशांच्या मंत्र्यांना आणि मान्यवर  प्रतिनिधींना  अलीकडच्या काळातील  भारताच्या  भ्रष्टाचारविरोधी विविध प्रयत्नांची माहिती दिली, याअंतर्गत माहिती तंत्रज्ञान  साधनांचा व्यापक वापर करून ई-गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण  लक्षणीयरीत्या कमी झाले  आहे.

पारदर्शक नागरिक-स्नेही सेवा प्रदान करण्यासाठी आणि थेट लाभ हस्तांतरण उपक्रमाद्वारे पारदर्शक पद्धतीने नागरिकांना कल्याणकारी लाभांचे  वितरण करण्यासाठी पद्धतीशीर सुधारणा राबवल्यामुळे भ्रष्टाचाराला  मोठ्या प्रमाणात आळा बसल्याकडे डॉ जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी या उपक्रमाबद्दल  चीनचे  आभार मानले आणि दहशतवादाला सुरक्षित आसरा नाकारण्याच्या ब्रिक्सच्या  उपक्रमाला यशस्वीरित्या अंतिम स्वरुप दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच भ्रष्टाचारविरोधी आणि आर्थिक विकासावरील ब्रिक्स कार्यशाळेतील अनुभव सामायिक केले.

भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी ब्रिक्स सहकार्य संकल्पनेबाबत बोलताना  डॉ जितेंद्र सिंह यांनी भविष्यातील कारवाईची काही क्षेत्र अधोरेखित केली, यात   फरारी आर्थिक गुन्हेगारांचा शोध व प्रत्यार्पण  आणि परदेशात असलेल्या त्यांच्या मालमत्ता कायद्याच्या कक्षेत  आणणे यांचा समावेश आहे.   भ्रष्टाचाराद्वारे मिळवलेल्या निधीचे परदेशात हस्तांतरण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि एफएटीएफ  काळा पैसा विरोधी तसेच  दहशतवाद वित्तपुरवठा विरोधी मानकांची प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अशा गुन्ह्यांसाठी गुन्हेगार आणि मालमत्ता परत आणण्याबाबत एकवाक्यता विकसित करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय संस्थांमध्ये ज्ञानाच्या आदानप्रदानद्वारे मनी लॉन्ड्रिंग  विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मनी लाँड्रिंग, बँकांची  फसवणूक, कर चुकवेगिरीसारख्या आर्थिक गुन्ह्यांचा देशाच्या तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय प्रभाव पडतो, असे भारताने नमूद केले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त करत  नमूद केले की, कोविड परिस्थिती असूनही, ब्रिक्स देशांनी गेल्या काही वर्षांत बरेच काही साध्य केले आहे.

आपल्या समारोपात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, मंत्री आणि प्रतिनिधींना विश्वास आहे की या ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी मंत्रीस्तरीय घोषणापत्र संबंधी  चर्चेमुळे सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांना  वित्तपुरवठा या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी प्रभावी धोरणे आखण्यात मदत होईल.

ब्रिक्स हा एक महत्त्वाचा गट आहे जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणतो. या गटातील  भूभागात  जगातील 41% लोकसंख्येचा समावेश आहे.   जागतिक जीडीपीमध्ये आपला वाटा 24% असून जागतिक व्यापारात 16% पेक्षा जास्त वाटा आहे. आपण ब्रिक्स देश हे जागतिक आर्थिक विकासाचे  मुख्य इंजिन आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२६: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले. महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.