मानसिक सक्षम भारताच्या निर्मितीसाठी
नवजात बालकांमधील जन्मापासूनच्या हायपोथारॉयडिजमचे निदान करता
यावे यासाठी तपासणीचा पुण्यातील तज्ज्ञांचा आग्रह
पुणे : आपला देश वैद्यकीय अत्याधुनिकतेत जगभरात अग्रेसर म्हणून
उदयाला येत आहे. भारत अलिकडे सर्वात जास्त आरोग्य सेवा पुरवणारा देश आहे आणिआमच्याकडे जगातील उच्च कुशल आणि पात्र वैद्यकीय सेवा पुरवठादार आहेत. तरीही, दर्जेदारआरोग्यसेवा आणि राष्ट्राभर काळजीचा अभाव यामुळे देशात विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होतअसतात. यापैकी `जन्मापासूनचा हायपोथारॉयडिजम (सीएच) हा एक आरोग्याचासर्वात मोठा प्रश्न असून, देशभरात 2640 नवजात बालकांपैकी एकाला हा आजार होतो.
या विषयाला प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. वामन खाडिलकर (ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ,एन्डोक्रिनोलॉजिस्ट, इरा डायबेटिक क्लिनिक), डॉ. उदय फडके (प्रौढांचे ज्येष्ठ एन्डोक्रिनोलॉजिस्ट,केअर हॉस्पिटल), डॉ. सुप्रिया फणसे (बालरोगतज्ज्ञ, एन्डोक्रिनोलॉजिस्ट, दिनानाथ हॉस्पिटल), डॉ. राहुल जहांगीरदार (बालरोगतज्ज्ञ, एन्डोक्रिनोलॉजिस्ट, भारती हॉस्पिटल)आणि डॉ. संजय मानकर (बालरोगतज्ज्ञ, मानकर चाइल्ड हॉस्पिटल) आदी मान्यवर एकत्र आले
होते, यावेळी जन्मापासूनच्या हायपोथारॉयडिजमचे लवकर निदान झाल्याने कशा प्रकारे जोखीम कमी होते आणि कशा प्रकारे अडचणी कमी होऊ शकतात याचा आढावा घेण्यात आला.या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी इरा डायबेटिक क्लिनिकचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ,एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. वामन खाडिलकर म्हणाले की, “जन्मापासूनचे हायपोथारॉयडिजममुळे येणारी मानसिक दुर्बलता टाळता येऊ शकते. ही स्थिती अगदी अर्भक असतानाच ओळखता येणे, हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. निवडक नवजात बालकांची तपासणी
हा काही योग्य दृष्टीकोन नाही. प्रत्येक नवजात अर्भकाची तपासणी होणं गरजेचं आहे.
निदानानंतर तातडीने उपचार सुरू करता येतात. प्रत्येक आठवड्यात पाच गुणांनी बुद्ध्यांक घटत असतो. यामुळेच पालक, वैद्यकीय सेवा देणारे आणि काळजी घेणारे अशा प्रत्येकामध्येच याबाबतची जागरूकता येणे गरजेचे आहे. पूर्व प्रसूती समुपदेशन आणि इतर प्रक्रियांमध्ये नवजात बालकाच्या तपासणीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. गॅलक्सी केअर हॉस्पिटलचे प्रौढांचे ज्येष्ठ एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. उदय फडके म्हणाले की, `शारिरीक प्रक्रिया आणि मेंदूचा विकास यामध्ये थायरॉइड संप्रेरक फार मोठी भूमिका बजावते. जन्मापासूनच्या हायपोथारॉयडिजमवर वेळीच उपचार झाले नाहीत तर गंभीर मानसिक आणि
शारिरीक परिणाम संभवतात. परंतु या विषयाबाबत अद्याप जागरूकतेचा अभाव असून, दुर्दैवाने आमच्याकडे अशा केस फारच उशीरा येतात, आणि त्यावेळेस आमच्या हातातही फार काही उरलेले
नसते. यामुळेच ही परिस्थिती वेळीच जाणता यावी यासाठी जागरूकता आवश्यक आहे, कारण तिचे वेळेत निदान न झाल्याचे त्याचा मुलाच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो. जन्मापासूनच्या हायपोथारॉयडिजमवर थायरॉइड संप्रेरकांच्या बदलामुळे सहज इलाज करता येऊ शकतो. यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक आदींनी नवजात बालकाची सीएच तपासणी करण्यावर भर द्यायला हवा, या तपासणीमुळे वेळीच नुकसान होणे वाचवता येईल आणि बाळाचे संरक्षण करता येईल
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ, एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सुप्रिया फणसे म्हणाल्या की, “जन्मापासूनच्या हायपोथारॉयडिजमवर सुलभतेने उपचार होऊ शकतात. परंतु, जन्मापासून हायपोथारॉयडिजम असलेल्या बहुतांश बालकांना जन्माच्या वेळी अनेक वैद्यकीय सुविधाच उपलब्ध नसतात. हायपोथारॉयडिजमची लक्षणे दिसायला काही आठवडे किंवा महिनेही जावे
लागतात, परंतु हा काळ अतिशय जास्त असून, या काळात त्याचा मेंदूवर गंभीर परिणाम होतो. यामुळेच वैद्यकीय वैशिष्ट्यांसहच केवळ हायपोथारॉयडिजमची तपासणी करणे हे अविवेकी आहे. लवकरात लवकर निदान आणि त्यावर पहिल्या दोन आठवड्यातच उपचारांना सुरुवात यामुळे मेंदूच्या हानीपासून एखाद्या बालकाला वाचवता येऊ शकते. यामुळेच जन्माच्यावेळी प्रत्येक
बालकाची हायपोथारॉयडिजमची तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे
भारती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ, एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. राहुल जहांगीरदार म्हणाले की, “बाळाच्या जन्मानंतरच्या अगदी सुरुवातीचा काळ हा त्याच्या मानसिक आणि शारिरीक विकासासाठी गरजेचा असतो. थायरॉइड संप्रेरकाचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मेंदू सर्वसामान्यपणे विकसित होत नाही, यामुळे कधीही भरून न निघणारी हानी होते. यापेक्षा अगदी सोपी तपासणी
करून मोठ्या प्रमाणात गुंतागुंत टाळता येऊ शकते. यामुळेच प्रत्येक बालकाची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर निदान होणे व त्यावर उपचार होणे अपरिवार्य आहे. मानकर चाइल्ड हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मानकर म्हणाले की, “विकसित देशांमध्ये आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे, अशा देशांमध्ये नवजात बालकांच्या तपासणीही अनिवार्य करण्यात आली आहे. भारतानेही या तपासणीचे महत्त्व
समजून घ्यायला हवे आणि प्रत्येक नवजात बालकाची तपासणी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. उशीरा निदान झाल्याने उपचारही उशीरा सुरू होतात. कुठल्याही बालकाला निदान न झाल्याने मानसिक दुर्बलतेचा सामना करावा लागू नये. एक साधी तपासणी बालकाच्या भविष्याचे सुरक्षाकवच बनू शकते