पुणे-धनकवडीतील स्मशानभूमीजवळ दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून नव्या आणि जुन्या नोटांच्या स्वरूपातील तब्बल 6 लाख 65 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आली.
संदीप विठ्ठल मांढरे व पल्लव वसंत असबे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांच्या ताब्यातून 2 हजाराच्या 306 , 500 च्या 02 व 100 रु च्या 520 नोटा जप्त करण्यात आल्या.
ही रक्कम सी आर पी सी 41 ड प्रमाणे पुढील चौकशी साठी जप्त करून ताब्यात घेण्यात आली असून पोलीस उपायुक्त डहाने, सहा, पोलीस आयुक्त पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोळी हे तपास करत आहेत.