भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उदघाटन

Date:

पुणे- भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त सुनील देशमुख, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे वरिष्ठ व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा यांच्‍या उपस्थितीत या पर्यटक निवासाचे उद्घाटन करण्यात आले.

सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक निवासात तळमजल्यावर 30 डीलक्‍स रूम, 3 व्‍हीआयपी सूट, भव्य रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावर 48 डीलक्स रूम आहेत. या ठिकाणी 8 लोकनिवास असून 2 कॉन्फरन्स हॉल आहेत. कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्टरसह सर्वसोयीनी युक्त असून या ठिकाणी 45 कव्‍हर्ड कार पार्किंग तयार आहेत. वाहन चालकांसाठी स्वतंत्र सोय आहे. पर्यटक निवासातील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था असून येथील खोल्या परवडणाऱ्या दरात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रामटेकडीत पोलिस फायरिंगमधील जखमी दुधानीला पकडले पण साथीदार फरार

पुणे : वानवडीतील रामटेकडी परिसरात पोलिस पथकावर आरोपींनी दुचाकी...

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून द्यावे– समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी

-जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न पुणे...

मध्यरात्री पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे-पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या...

गद्दारांचा ‘खोपकर’ करणारी शिवसेना आज विकलांग झाली..

२१ एप्रिल १९८९. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची...