‘बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसऱ्या आवृत्तीतमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा थरार रंगणार असून ‘ पुणे अनमोल रतन ’ या पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचे अनावरण नुकेतच पुण्यात करण्यात आले. या वेळी ‘पुणे अनमोल रतन’चा संपूर्ण संघ व ‘पुणे अनमोल रतन’ संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवीन सदारंगांनी या प्रसंगी उपस्थित होते. बी.सी.एल आवृतीमध्ये २ मधील सामने या महिन्यात ( फेब्रुवारी ) मध्ये आयोजित केले जातील. त्यात प्रत्येक शनिवार व रविवार 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे सामने सध्याच्या आघाडीच्या असणाऱ्या ‘कलर्स’ या वाहि णीवरती प्रसारित केले जातील. ‘बॉक्स क्रिकेट लीग’मध्ये टी. व्ही. चित्रपट जगतातील कलाकरांची मांदियाळी आपणास पाहवयास मिळेल. असे ‘पुणे अनमोल रतन’ संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘श्री नवीन सदारंगांनी’ यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
‘पुणे अनमोल रतन’ या संघाचा कर्णधार लोकप्रिय अभिनेता वरुण बडोला आहे. लोकप्रिय अभिनेत्री ‘दिव्या त्रिपाठी’ हि ब्रँड अॅम्बेसेडर असून बी.सी.एल आवृतीमध्ये 2 मध्ये नेहमीपेक्षा मोठा असेल. 150 ख्यातनामक टीव्ही कलाकार, दिग्दर्शक, बॉलीवूड आणि मॉडेल यांचा यात समावेश असेल. हा सर्वात मोठा सेलिब्रिटी क्रिकेट शो असणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी हि पर्वणीच असणार आहे.
‘पुणे अनमोल रतन’ संघ खालीलप्रमाणे असेल.
- वरुण बडोला ( पुरुष कर्णधार ) 2. दिव्यांका त्रिपाठी ( स्त्री खेळाडू ) 3 .रूपल त्यागी (स्त्री खेळाडू) 4 .विनीत कुमार ( पुरुष खेळाडू ) 5 .कृष्णा सोनी ( पुरुष खेळाडू ) 6 अभिनव कपूर ( पुरुष खेळाडू ) 7 अंकुर नायर ( पुरुष खेळाडू ) 8 विपुल गुप्ता ( पुरुष खेळाडू ) 9 नीरज मालवीय ( पुरुष खेळाडू ) 10 मोहित अरोरा ( पुरुष खेळाडू ) 11 राजा भेरवानी ( पुरुष खेळाडू ) 12 प्रिया शिंदे ( स्त्री खेळाडू ) 13 गुंजन उत्रेजा ( पुरुष खेळाडू )
14 तनया अब्रोल ( स्त्री खेळाडू ) 15 पुनीत सचदेव ( पुरुष खेळाडू ) 16 प्रवीणा प्रणिती ( स्त्री खेळाडू ) 17 स्वरभ रॉय ( पुरुष खेळाडू ) 18 कुंचीका सदानंद ( स्त्री खेळाडू ) 19 परम सिंग ( पुरुष खेळाडू ) 20 हर्षिता गौर ( स्त्री खेळाडू ) 21 राजेश्वरी सचदेव ( स्त्री खेळाडू ) 22 इशू दतवानी ( पुरुष सह-मालक ) 23 नवीन सदारंगानी ( पुरुष सह-मालक )