Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अविनाश भोसलेंची 164 कोटींची तर संजय छाब्रियांची 251कोटींची संपत्ती जप्त

Date:

पुणे- ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांवर पोहचली आहे, अशी माहिती ईडी अंमलबजावणी संचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

ईडीने व्यावसायिक संजय छाब्रिया आणि ईडीच्या कस्टडीतील अविनाश भोसले यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त केली. भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरुमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला. आतापर्यंत ईडीने 1827 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. छाब्रियांवर यापूर्वी सीबीआयकडून कारवाई झाली होती.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआयचा आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून हि माहीती समोर आली आहे.लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीत दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती.

या हाॅटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून सत्तर कोटी दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण सहाशे कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः तीनशे कोटींची रक्कम भरत व्यवहार ईमारत खरेदीसाठी केला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...