SHARAD LONKAR

55282 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

गोदरेज कॅपिटलचा महाराष्ट्रातील डेअरी फार्म कर्जामध्ये प्रवेश

क्रीमलाइन डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा ई-डेअरी सह भागीदारी §  या भागीदारीद्वारे, डेअरी फार्मिंग समाजाला सक्षम करणे हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे. तसेच संपूर्ण इकोसिस्टीममध्ये आर्थिक समावेशकता आणि आर्थिक समृद्धी आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. §  आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना मुंबई, २१ मे, २०२४: गोदरेज उद्योग समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोदरेज कॅपिटलने डेअरी फार्म लोन लाँच करून कृषी क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा ई-डेअरी यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारी करत गोदरेज कॅपिटल महाराष्ट्र आणि इतर भागातील  लहान डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य करेल. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची उपकंपनी आहे. गोदरेज उद्योग समुहाअंतर्गत ही कंपनी वैविध्यपूर्ण खाद्य आणि कृषी-व्यवसाय पाहते. गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने ही उत्पादनांची विक्री करते. भारतातील दुग्धजन्य पदार्थांचा वापर सातत्याने वाढत असल्याने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही उत्तम संधी तर आहेच पण आव्हाने देखील निर्माण करते. उत्पादकता सुधारणे तसेच देशात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी वेळेवर आणि योग्य वित्तपुरवठा करून या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे महत्त्व गोदरेज कॅपिटलने ओळखले आहे. म्हणूनच या उपक्रमांतर्गत, गोदरेज कॅपिटलने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भागीदार म्हणून Dvara E-Dairy ला सोबत घेतले आहे. दुग्धव्यवसायासाठी कर्ज देण्यासोबतच गोदरेज कॅपिटल GAVL च्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना गुराढोरांची खरेदी तसेच त्यांच्या देखभालीसाठी तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देईल. या ऑफरमुळे डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य तर मिळेलच पण यासह इतर फायदे देखील मिळतील. यात पूर्ण डिजीटल प्रक्रिया, कर्ज किंवा अन्य अर्जाची जलद मंजुरी आणि वितरण आणि दोन वर्षांपर्यंतचे कर्जफेडीचा पर्याय यांचा समावेश आहे. गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, "आमच्या देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. दुग्धव्यवसाय समाजाला आर्थिक सहाय्य, प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच याद्वारे एक सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णागिरी जिल्ह्यात पहिल्या कर्जाचे वितरण ही केवळ एक सुरुवात आहे. वास्तविक आम्ही तामिळनाडूच्या इतर प्रदेशांमध्ये डेअरी उद्योग सक्रिय करण्यात आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासह डेअरी फार्मिंग क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे.” अनेक मर्यादा असूनही आजही डेअरी उद्योगाचे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. यावर जवळपास 80 दशलक्ष शेतकऱ्यांची उपजीविका चालते. दुधाच्या एकूण खर्चाच्या 70% मध्ये आहार हा सर्वात मोठा घटक आहे. उत्तम आणि पोषक आहार हा निरोगी दुग्धव्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. याचा गुरांच्या दुग्धउत्पादकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होते. उत्तम आणि भरपूर दूध उत्पादनासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भूपेंद्र सुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोदरेज जर्सी, म्हणाले, “गुरांचे चांगले आरोग्य म्हणजे उत्तम दुग्धउत्पादन. यामुळे शेतकरी देखील सक्षम होतात. आणि त्यांचा नफा वाढतो. त्यामुळे, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर्जेदार खाद्य उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. गोदरेज कॅपिटल आणि द्वारा ई-डेअरी यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांना गुरांचे दर्जेदार खाद्य मिळवून देईलच पण शेतीविषयक इतर गरजांसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्यास सक्षम करेल. या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन आमचे शेतकरी गुरांची संख्या वाढवू शकतात तसेच उच्च उत्पादकता आणि चांगल्या समृद्धीसाठी प्रयत्न करू शकतात.” Dvara E-Dairy चे संस्थापक, MD आणि CEO रवी के.ए. म्हणाले, "गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कंपन्यांसोबत भागीदारी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या भागीदारीमुळे भागधारकांचे मूल्य वाढले आहे. तसेच यामुळे हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेजकडून परवडणाऱ्या दरात वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे. याशिवाय भांडवल तसेच कॅटल लोनसाठी हा एक नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. या सगळ्या व्यवस्थेमुळे आर्थिक सेवा या अगदी घरात उपलब्ध होणार आहेत. यासोबतच दुग्ध उत्पादकांना दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल." गोदरेज कॅपिटल सर्वसमावेशक वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे, तसेच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना आर्थिक पाठबळही देत आहे. यासोबतच, गोदरेज कॅपिटल एमएसएमई कर्जासाठी महाराष्ट्राच्या बाजारपेठेतील 10% हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहे. मागील वर्षापासून ही कंपनी पाय भक्कमपणे रोवून उभी असून त्याच आधारे कंपनीने कोल्हापूर आणि ठाणे उघडत राज्यात आपला ठसा उमटवला आहे. स्थानिकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच त्या - त्या भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गोदरेज कॅपिटल काय काय करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा विस्तार. 

 टीवीएस नेअपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन केली पुण्यात लाँच

पुणे, 21 मे, 2024: दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) - आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे 'ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले आहे. टीवीएस अपाचे आरटीआर 160 आणि आरटीआर 160 4वी...

प्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ. (प्रा.) ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटर येथे मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी च्या प्रमुख म्हणून रुजू 

डॉ. ज्योती बाजपेयी यांना ऑन्कोलॉजीचा 19 वर्षांहून अधिक अनुभव असून यापूर्वी त्या मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर येथे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत होत्या. ~डॉ. ज्योती बाजपेयी या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) च्या लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत आणि वुमन फॉर ऑन्कोलॉजी (ईएसएमओ-डब्ल्यू 40) च्या कोअर कमिटी सदस्य आहेत,तसेच इम्यूनोथेरपी आणि सारकोमासाठी भूतपूर्व फॅकल्टी आहेत. ~त्यांनी प्रशिक्षणात मेमोरियल स्लोन केटरिंग सेंटर, न्यूयॉर्क, यूएसए आणि सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर, जॉन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर, यूएसए येथे निरीक्षक हे पद देखील भुषविले आहे. पुणे21 मे 2024:  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज जाहीर केले आहे की, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्र) च्या प्रमुख म्हणून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. डॉ. बाजपेयी यांनी इम्युनो-ऑन्कोलॉजी, प्रिसिजन मेडिसिन, दुर्मिळ आणि आव्हानात्मक कर्करोग (सारकोमा, गर्भधारणा-संबंधित कर्करोग, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील कर्करोग, एलजीबीटीक्यू+ कर्करोग, वृद्धापकाळातील कर्करोग) आणि स्त्रियांचे कर्करोग  (स्तन आणि स्त्रीरोग) या क्षेत्रातील केलेल्या कार्यासाठी त्या एक प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळखल्या जातात. डॉ. बाजपेयी यांचा टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई येथे प्राध्यापक आणि ब्रेस्ट डीएमजी कन्व्हेनर म्हणून 15 वर्षांचा अनुभव तसेच कर्करोगाच्या क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. त्यांना न्यू यॉर्क, यूएसए मधील प्रख्यात मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर (एमएसकेसीसी) कडून इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि मेलेनोमामधील विशेष प्रशिक्षण आणि बाल्टिमोर, यूएसए मधील जॉन्स हॉपकिन्स येथील प्रतिष्ठित सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमधून हाडे आणि सॉफ्ट टिश्यू सारकोमामधील दीर्घ अनुभव असल्यामुळे डॉ. बाजपेयी आपली वैद्यकीय कार्ये कुशलतेने हाताळतात. शिवाय, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) येथे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्या ईएसएमओ लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत. अपोलो कॅन्सर सेंटर्स (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्र) च्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी म्हणाल्या, “अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. हे रुग्णालय जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या बरोबरीने वैद्यकीय सेवा प्रदान करते. प्रोटॉन बीम थेरपी, ब्रेन ट्यूमरसाठी झेडएपी-एक्स थेरपी आणि ट्यूमर बोर्ड बेस्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स यांसारख्या प्रगत सुविधांमुळे मी माझ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देऊ शकते. माझ्या प्रशिक्षण आणि अनुभवाने, मी अपोलो कॅन्सर सेंटरमधील कार्यक्रम मजबूत करण्यास उत्सुक आहे.” युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) लीडर्स जनरेशन प्रोग्रामच्या पदवीधर असलेल्या डॉ. ज्योती बाजपेयी आज ईएसएमओ-डब्ल्यू40 (वुमन इन ऑन्कोलॉजी) च्या कोअर कमिटी सदस्य आहेत. डॉ. बाजपेयी यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) आणि सोसायटी फॉर इम्युनोथेरपी ऑफ कॅन्सर (एसआयटीसी) आणि सारकोमा, स्त्रीरोगविषयक कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या इम्युनोथेरपीसाठी ऍडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर (एबीसी) ची मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे. सारकोमा, गर्भधारणेशी संबंधित कर्करोग, स्तन आणि स्त्रीरोगविषयक कर्करोग, इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी यांसारख्या दुर्मिळ कर्करोगांसारख्या त्यांच्या मुख्य आवडीच्या क्षेत्रातील त्यांचे संशोधनात्मक कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ श्री. संतोष मराठे म्हणाले, “जागतिक मानकांसोबत खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवा पुरवणे ही अपोलो हॉस्पिटल्सची बांधिकली आहे. नवी मुंबईतील एसीसी येथे एकाच छताखाली रोग व्यवस्थापन उपचार मार्गांसह (डिसीज मॅनेज्ड केअर पाथवेजसह) विशिष्ट अवयवांसाठी पूर्णवेळ चिकित्सक असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. नवी मुंबईतील एसीसी येथे विशेष प्रशिक्षित परिचारिका, ऍडव्हान्स्ड रिहॅब आणि शस्त्रक्रियेनंतरच्या टीमद्वारे प्रिसिजन टेक्नॉलॉजी सॉल्युशन्ससह कर्करोगासाठी व्यापक वैद्यकीय सेवा प्रदान केली जाते. आमच्या कुशल ऑन्कोलॉजी टीममध्ये डॉ. ज्योती बाजपेयी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण त्यांच्या येण्यामुळे केवळ मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्स मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना खूप फायदा होणार आहे. डॉ. बाजपेयी यांनी दुर्मिळ कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वसमावेशक आणि प्रगत उपचार देण्यात मदत होईल. त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्स येथील इतर वरिष्ठ सल्लागारांना उपचार देताना खूप मदत होणार आहे. यामुळे प्रदेशातील कर्करोग रुग्णांसाठी उपचारात्मक पर्याय वाढणार आहेत.

ग्रामीण भारताचा वैद्यकीय दीपस्तंभ – टेलिमेडिसिन सुविधा

भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशात वैद्यकीय सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे एक आव्हान आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे तुलनेने सुलभ आहे, पण ६६ टक्के जनता ज्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करते, तिथे आजही प्राथमिक वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवणे महाकठीण आहे.   महाराष्ट्रातील अनेक दुर्गम गावे, वाड्या व वस्त्यांमध्ये, जिथे मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे आरोग्य सुविधा मिळणे तर दुरापास्तच! बहुतांश गावांतील स्त्री-पुरुष शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करतात. रोजच अर्धपोटी राहणाऱ्या या लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नसते. जगण्याचा संघर्षच एवढा मोठा असतो की, त्यापुढे बाकी सारे काही मागे पडते. अशात छोट्यामोठ्या आजारांमुळे जर रोजगार बुडला तर अख्खे घरच उपाशी राहते.  अशावेळी आजार लपवण्याकडे किंवा दुखणे अंगावर काढण्याकडेच कल असतो. आणि असे केल्याने जर आजार बळावला तर त्या कुटुंबाला कोणी वाली नसतो. कारण गावात एक तर कायमस्वरूपी डाॅक्टर नसतात. आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळ पैसा नसतो. घरातील लहान मुले आजारी पडली तरी रोजगार मिळवण्यासाठी कामावर जावेच लागते. शासकीय स्तरावरील प्रयत्न अशा अत्यंत गरीब आणि कोणत्याच सुविधांचे वारे न लागलेल्या असहाय्य जनतेच्या  आरोग्यरक्षणासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.  देशभरात ठिकठिकाणी तब्बल १,५०,००० आरोग्य कल्याण केंद्रे स्थापन करून शासन सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व वयोगटांतील लोकांचे आरोग्य चांगले राहावे,  या हेतूने प्रतिबंधात्मक आणि आरोग्याला चालना देणारा आरोग्यविषयक सजग दृष्टिकोन बाळगण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वरील आरोग्य कल्याण केंद्रे दुर्गम भागांसहित संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांना सर्वांगीण आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामध्ये रुग्णसेवा, नवजात शिशु व मातेची आरोग्यविषयक देखभाल अशा सुविधांचा समावेश असतो.पण शासनाचे हे उपायही कोविड १९ साथीच्या काळात अतिशय तोकडे पडले. २०१९-२० मध्ये कोविड महामारीने जगभर थैमान घातले होते. जिथे विकसित देशांतील आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडल्या, तिथे अफाट लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचे जाळे विकसित नसलेल्या भारताची परिस्थिती काय झाली असेल? पण सरकारने याच काळात  टेलिमेडिसिन क्षेत्राला अधिकृत मान्यता दिली व वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त केला. ग्रामीण महाराष्ट्र आणि भारत फोर्ज भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांची मूळ कौटुंबिक पार्श्वभूमी खेड्यातील असल्याने ग्रामीण भागांतील विविध समस्यांविषयी त्यांना जाण आहे व त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सीएसआर प्रकल्पांतर्गत भारत फोर्जने निवडक १०० गावांतील सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि रोजगार यांबाबत ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी गावकरी आणि भारत फोर्ज एकजुटीने प्रयत्नशील आहेत आणि त्यातून गावाचा कायापालट होत आहे. टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे काय? सर्वसामान्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सोसावा न लागता देशांतर्गत स्तरावर कोठेही चांगल्या दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुविधांचा दर्जा सुधारणे, आणि आरोग्यसुविधा वितरणाचा खर्च कमी करणे, यासाठीचा आदर्श उपाय म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा ! टेलिमेडिसिन सुविधांमधून व्हिडिओ काॅलद्वारे ग्रामीण भागांतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा व वैद्यकीय मार्गदर्शन पोहोचविता येते. टेलिमेडिसिन सुविधा पुरविण्याचा घेतला ध्यास टेलिमेडिसिन सुविधा क्षेत्राला मान्यता मिळाल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये बाबासाहेब कल्याणी यांच्या सक्षम मार्गदर्शनांतर्गत आणि डोअरस्टेप हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने भारत फोर्जने महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यांत सॅटेलाईट सुविधेच्या साहाय्याने टेलिमेडिसिन सुविधेचा शुभारंभ केला. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव तालुक्यातील ठाकरेवाडी, चिखली, फडाळेवाडी येथील वाड्या वस्त्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर, कण्हेरखेड, रुई, नागझरी व जयपूर अशा एकूण आठ गावांमध्ये ८ टेलिमेडिसिन सेवा केंद्रे उभारून भारत फोर्जने महाराष्ट्रातील टेलिमेडिसिन सुविधांचा भक्कम पाया रचला. या सर्व गावांतील व वाड्यांतील लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत असून वैद्यकीय सुविधांंपासून वंचित आहेत. रोजची भाजी भाकरी मिळवण्यासाठी येथील लोकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याप्रति जागरूक करणे हे मोठे आव्हान होते. अशी लावली सवय वरील गावांत व्हिडिओ काॅलद्वारे वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याची सवय ग्रामस्थांना लावणे व या सुविधेप्रति त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत फोर्जने प्रत्येक टेलिमेडिसिन केंद्रात दोन अनुभवी स्थानिक परिचारिकांची नियुक्ती केली. त्यांच्याशी गावकरी परिचित असल्याने आधुनिक टेलिमेडिसिन सुविधा आणि पारंपरिक वैद्यकीय सुविधा यांमधील अंतर कमी झाले आणि ग्रामस्थ या केंद्रांशी जोडले गेले. आजार, आणि उपचारांबरोबरच औषधे मिळण्याची सुविधा येथे असल्याने गावकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात भारत फोर्जला यश आले. या केंद्रांमुळे प्राथमिक उपचार मिळवण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागत असलेली पायपीट थांबली आहे. एकूण ८ गावांमध्ये यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधेचा लाभ भारत फोर्जने आजवर ३८,७९७ गावकऱ्यांना दिला आहे. भारत फोर्जच्या टेलिमेडिसिन सुविधेचे फायदे * * दुर्गम, अतिदुर्गम भागात Outreach programme च्या माध्यमातून आरोग्यसुविधेचा थेट लाभ * * ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक जागरूकतेत वाढ. विशेषत: सकस आहार आणि पुरेशा व्यायामाचे महत्त्व         गावकऱ्यांना कळले. * * सर्दी, खोकला, ताप, असे किरकोळ आजार आणि छोट्यामोठ्या जखमांवर तात्काळ इलाज व औषधोपचार शक्य. * * तात्काळ उपचारांमुळे हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची रोजंदारी बुडण्याचा धोका कमी. आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी अत्यंत उपयुक्त सेवा * * हृदयविकार, मधुमेह, यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन रुग्णास त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करता आले. "टेलिमेडिसिन या भारत फोर्जने दिलेल्या आरोग्य सुविधेमुळे आमच्या आदिवासी भागाला खूप फायदा झाला. रोजंदारीवर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणार्‍या गरीब वर्गासाठी ही सुविधा खूप महत्त्वाची वाटते. भीमाशंकर खोर्‍यात वसलेल्या आमच्या आदिवासी जनतेला त्यांची उपजीविकेची सुविधा फार महत्त्वाची वाटते. पण कामावर गेल्यानंतर त्यांना होणारे आजार, थकवा, साथीचे रोग, इ.मुळे त्यांचे शारीरिक नुकसान तर होतेच, आणि त्यांना आर्थिक झळही सोसावी लागते. परिणामी, टेलिमेडिसिन सुविधा त्यांना खूपच महत्त्वाची वाटते. या सुविधेमुळे येथील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि छोट्यामोठ्या आजारापासून बचाव होऊ लागला आहे. भारत फोर्जचे मनापासून आभार!" आशा खंडू पारधी सरपंच, ठाकरवाडी, पुणे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी सुविधा ग्रामीण महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागातही तात्काळ वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी ही टेलिमेडिसिन सेवा ग्रामस्थांसाठी जीवनदायी ठरत आहे. किरकोळ आणि गंभीर आजार तसेच तातडीच्या परिस्थितीत वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन या सुविधेमधून मिळू शकते. याखेरीज, दूरस्थ पद्धतीने घेतली जाणारी आरोग्यविषयक मार्गदर्शक सत्रे, रुग्णांसाठी फिजिओथेरपी व्यायाम, आणि हिमोग्लोबीन व रक्तातील साखरेची तपासणी अशा कार्यक्रमांचे आयोजनही या केंद्रांमध्ये केले जाते. आपत्कालीन परिस्थिती हाताळता यावी, म्हणून टेलिमेडिसिन केंद्रांवर कार्यरत कर्मचारी आणि ग्रामस्थांना कंपनीतर्फे कृत्रिम श्वासोच्छ्वास (सीपीआर) प्रशिक्षणही दिले जाते. टेलिमेडिसिन केंद्रांवरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचा लाभ ग्रामस्थांना होताना दिसत आहे. स्तनांचा कर्करोग, संधिवात, रक्तक्षय (ॲनिमिया) इत्यादी महत्त्वपूर्ण आजारांबरोबर फ्रॅक्चर झाल्यास काय करावे, याबद्दलची माहिती, काळजी आणि प्रतिबंधनाविषयी तज्ज्ञ डाॅक्टर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात. याशिवाय, भारत फोर्जचे सीएसआर कर्मचारी गावोगावी भेटी देऊन टेलिमेडिसिन सुविधांचा लाभ घेण्याविषयी ग्रामस्थांना उत्तेजन देत असतात. ग्रामीण भारताच्या आरोग्यदायी जीवनासाठी आशेचा किरण आरोग्यसंपन्न भारताच्या निर्माणासाठी भारत फोर्जने सुरू केलेल्या टेलिमेडिसिन सुविधांचा लाभ आजवर येथील तब्बल १६,८६६ ग्रामस्थांनी घेतला असून दर्जेदार आरोग्य सुविधांवर आपलाही अधिकार आहे, ही सुखद जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या प्रवासात भारतीयांना दर्जेदार आरोग्यसुविधा देण्यास भारत कटिबद्ध असल्याचे आश्वासक चित्र निर्माण करण्याचे काम शासनाबरोबरच आपलेही आहे, असे भारत फोर्ज मानते. त्या दृष्टीने टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून देऊन भारत फोर्जने ग्रामीण भागाला आशेचा किरण दाखवला आहे. यापुढेही ग्रामीण भारताचे आरोग्य चित्र अधिकाधिक निरामय करण्याकामी भारत फोर्ज आपले योगदान देतच राहील.

राजस्थानमध्ये सिमेंट केंद्र सुरू करण्यासाठी करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक 

उत्तर भारतातील बाजारपेठेत JSW सिमेंटचा प्रवेश झाला आहे इक्विटी आणि दीर्घकालीन कर्ज याचे नियोजन करत गुंतवणूक करायची आहे मुंबई - 21 मे 2024: 24.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW सिमेंटने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड, एकात्मिक सिमेंट उत्पादन सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 3,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सिमेंट कारखान्याचे  भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. JSW सिमेंटच्या या नवीन सिमेंट सुविधा केंद्रात 3.30 MTPA पर्यंतचे क्लिंकरायझेशन युनिट, 2.50 MTPA पर्यंतचे ग्राइंडिंग युनिट, तसेच 18 मेगावॅटच्या वेस्ट हीट रिकव्हरी बेस्ड पॉवर प्लांटचा समावेश आहे. तसेच खाणीतून चुनखडी प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आणि भट्टीत पर्यायी इंधन वापरण्याची व्यवस्था याची देखील व्यवस्था करून त्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीला इक्विटी तसेच दीर्घकालीन कर्जाच्या समन्वयातून निधी दिला जाईल. JSW सिमेंटने यासंदर्भातील काही नियामक आणि वैधानिक मंजुरी आधीच मिळवल्या आहेत. तसेच इतर आवश्यक मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे युनिट एकदा कार्यान्वित झाल्यानंतर JSW सिमेंट उत्तर भारतातील आकर्षक सिमेंट बाजारपेठेत प्रवेश करेल. सध्याच्या गुंतवणुकीमुळे 1 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले की, “आमच्या सिमेंट व्यवसायाद्वारे राजस्थानमध्ये करत असलेली ही आमची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. या भागात रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करून राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी मी राजस्थान राज्य सरकारसोबत सहयोग  करण्यास उत्सुक आहे. नागौरमध्ये एकात्मिक सिमेंट सुविधा निर्माण करण्यासाठीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे JSW सिमेंट पुढील काही वर्षांत संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवेल. या प्रदेशातील हे नवीन केंद्र आम्हाला उत्तरेकडील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि NCR प्रदेशातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करेल. JSW सिमेंटचे CEO श्री. नीलेश नार्वेकर म्हणाले, “या गुंतवणुकीमुळे आम्ही उत्तर भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या आणि आकर्षक सिमेंट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहोत. या राज्यातील जीडीपी वाढीचा दर सर्वाधिक आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण विकासही झालेला दिसतो. या तेजीत असलेल्या बांधकामासाठी पोषक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत तसेच आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे सिमेंट आणि जागतिक दर्जाची ग्राहक सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे.”

Breaking

पुण्यात कॉंग्रेस +ठाकरेंची सेना, मनसे एकत्र

पुणे :महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

पुण्यात पाच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:अमितेशकुमार

पुणे :महापालिका निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी...

शासकीय योजनेतील कर्ज उदिष्ट बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९: शासकीय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकातील प्रलंबित...

भव्य रॅलीने जाऊन प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला

म्हणाले,हडपसरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असेल..!! “प्रभाग क्रमांक ४१ हा माझ्यासाठी...
spot_imgspot_img