SHARAD LONKAR

55167 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशाविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना आज प्रसिद्ध विचारवंत, लेखक, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे माजी ऱ्होड्स प्राध्यापक, सध्या भारत सरकारच्या क्षमता उभारणी  आयोगातील मानव संसाधन  सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशावरील आपले पुस्तक भेट दिले. पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आढावा घेत आहे आणि पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून अर्थ लावत आहे, ज्यांना सार्वजनिक सेवेत जीवन व्यतित करण्याची आकांक्षा आहे त्यांना या दोन्हीद्वारे  एक मार्ग उपलब्ध करून देत आहे.  डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी यापूर्वी नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यापैकी “व्हॉईसेस फ्रॉम द ग्रासरुट्स” आणि “लीडरशिप लेसन्स फॉर डेली लिव्हिंग” या पुस्तकांची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आहे.  ‘पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या पद्धतीने प्रेरित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून भारताच्या नागरी विद्वत्तेचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात या नेतृत्वपद्धतीचे सिंहावलोकन केले आहे. मोदी यांचे अथक कठोर परिश्रम आणि संवादात्मक  दृष्टीकोनाने त्यांनी  पंतप्रधानपदापर्यंत केलेल्या वाटचालीवर मंत्रिमंडळातील आणि मंत्रिमंडळाबाहेरील त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश टाकला आहे. विद्वत्तेचे क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र अशा क्षेत्रांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत यांनी व्यक्त केलेली मते आणि रंजक किस्से यांचा देखील या पुस्तकात समावेश आहे.  खरोखरच या पुस्तकावर  मोदी यांची आणि त्यांच्या काळातील घटनाक्रमाची छाप आहे आणि जागतिक स्तरावर भारताला मध्यवर्ती स्थान मिळवून देण्याच्या मोदी यांच्या संकल्पाला हे पुस्तक अधोरेखित करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात भारतीय नेतृत्वाच्या विविध स्वरुपांचा अतिशय आद्य आणि सर्वाधिक प्रामाणिक दस्तावेज म्हणता येईल अशा प्रकारचे हे पुस्तक आहे, प्रत्यक्षात हे पुस्तक म्हणजे एक केस स्टडी आहे असे त्यांनी सांगितले आणि भविष्यातील संशोधकांना  संदर्भासाठी एक उपयुक्त दस्तावेज ठरेल, असे भाकित वर्तवले.

बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत:डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा

जो बायडेन अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणुकीला नकार देत असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले. असे त्यांनी म्हटले आहे.बायडेन यांनी...

निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू:पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली पृष्टी

आजाराचा प्रसार रोखण्यासाठी  तातडीने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना अंमलात आणण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना मुंबई-केरळमधील मलप्पुरम  जिल्ह्यात निपाह विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे. मल्लपुरम इथल्या एका 14  वर्षाच्या   मुलामध्ये अॅक्युट इन्सेफलायटिस सिंड्रोम (Acute Encephalitis Syndrome - AES) अर्थात तीव्र स्वरुपाच्या मेंदुज्वराची लक्षणे आढळून आली. ही लक्षणे आढळल्यानंतर त्याला आधी पेरिंथलमन्ना येथील आरोग्य केंद्रात दाखल केलं गेलं, त्यानंतर त्याला उच्चस्तरीय सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र संसर्गानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाचे  नमुने पुण्यातील एनआयव्ही  अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले. त्यात या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.    राज्य सरकारने तातडीने, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित खाली नमूद उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे : निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट झालेल्या प्रकरणामध्ये संबंधिताच्या कुटुंबात, त्याच्या आसपासच्या परिसरात आणि एकसमान भौगोलिक परिस्थिती असलेल्या परिसरांमध्ये या आजाराची लागण झालेले आणखी रुग्ण आहेत का याचा शोध घ्यावा.निपाहची लागण झालेल्या रुग्णाच्या गेल्या 12  दिवसांमध्ये थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा (कोणत्याही प्रकारे थेट संपर्कात आलेल्या) शोध घेणेरुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना विलगीकरणाच्या कठोर नियमांनुसार विलगीकरणात ठेवावे.प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी नमुने संकलित करणे आणि त्यांची सुरक्षित वाहतूक करणे. ज्या सरकारला या प्रकरणाचा तपास करण्यात तसेच या आजाराची साथ पसरण्याशी संबंधित महामारीजन्य दुव्यांचा शोध घेण्यात मदत करण्यासाठी आणि राज्य सरकारला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य अभियानाअंतर्गतचे बहुसदस्यीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथक रवाना केले जाणार आहे. यासोबतच, राज्य सरकारने केलेल्या विनंतीनंतर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर ) कोझीकोडमधील रुग्णांवरील उपचारांसाठी एककृत्तक प्रतिपिंडे अर्थात मोनोक्लोनल अँटीबॉडीज पाठवल्या आहेत. यासोबतच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंच्या अतिरिक्त नमुन्यांची तपासणी करण्यासाठीदेखील फिरत्या जैवसुरक्षित तपासणी प्रयोगशाळा अर्थात मोबाईल बीएसएल -3 प्रयोगशाळाही कोझीकोडमध्ये पाठवल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने पाठवलेल्या एककृत्तक प्रतिपिंडे सदर रुग्ण दगावण्याआधीच पोहचल्या होत्या मात्र, रुग्णाची आरोग्य स्थिती अत्यंत खालावलेली असल्याने त्याच्यावर या प्रतिपिंडांचा वापर करणे शक्य होऊ शकले नाही. केरळमध्ये या आधीदेखील निपाह विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजाराचा (Nipah Virus Disease - NiVD) उद्रेक झाला होता. सर्वात अलीकडे म्हणजेच 2023 सालीही कोझिकोड जिल्ह्यातच या आजाराची मोठी साथ पसरली होती. फळांवर जगणारे परावलंबी किटक / वटवाघुळ हे निपाह विषाणूचे मुख्य प्रसारक आहेत. अशा वटवाघुळाने चावा घेतलेले दुषित फळ खाल्याने मानवामध्ये निपाह विषाणुचा संसर्ग होऊ शकतो.

आमदार फोडण्यासाठी फडणविसांनी पैसे कुठून आणले?त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावा.. त्यांनी दहीभात, चिंचुके देऊन आमदार फोडले का? अमित शहांना संजय राऊतांचे जाहीर आव्हान

मुंबई-फडणवीस आमदार फोडण्याची भाषा करतात. मग त्यांनी चिंचुके देऊन आमदार फोडले का? आमदार फोडण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले. अमित शहा यांना भष्टाचार चालत नसेल...

स्वारगेट ते कात्रज मेट्रोची १० वर्षे फक्त चर्चाच: जबाबदारी आमदारांची होती अन त्या दोष पुणेकरांना देतात, हा तर नाकर्तेपणा : अश्विनी कदम

-स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रात म्हणजेच आमदार, खासदार असूनही या मेट्रोची अंमलबजावणी नाही पुणे : पुणे मेट्रो सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी...

Breaking

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...
spot_imgspot_img