‘आत्मनिर्भर भारत अभियान’ भारताला जगातील सर्वात मजबूत देश बनवत आहे- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Date:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ही संकल्पना भारताला जगातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित देश बनवत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 16 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात केले.

आपल्या  गरजा, विशेषत: सुरक्षिततेशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार कोणत्याही देशावर अवलंबून नसलेल्या नवीन भारताचे (न्यू इंडिया) स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांचे विवेचन करताना राजनाथ सिंह म्हणाले, 310 वस्तूंच्या स्वदेशीकरणाच्या तीन सकारात्मक याद्या जारी करणे तसेच खाजगी क्षेत्राला देशाच्या विकास गाथेचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित करणे, सशस्त्र दलांना स्वदेशी विकसित अत्याधुनिक शस्त्रे/प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सुसज्ज करण्याच्या सरकारच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. ते पुढे म्हणाले की, देशांतर्गत उद्योगात पुढील काही वर्षांत जल, जमीन, आकाश आणि अंतराळात नवीनतम संरक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता आणि समर्थता आहे आणि सरकार त्यांना आवश्यक वातावरण प्रदान करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

सरकारच्या प्रयत्नांमुळे साध्य झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना संरक्षण मंत्री म्हणाले, संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी पूर्वी 1,900 कोटी रुपयांची होती, ती आता 13,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 2025 पर्यंत संरक्षण उत्पादनातून 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार आहे, ज्यामध्ये 35,000 कोटी रुपयांची निर्यात समाविष्ट आहे. त्यांनी देशातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू INS विक्रांतचा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये 76% स्वदेशी सामग्री आहे, जीचे पंतप्रधानांनी 02 सप्टेंबर 2022 रोजी कोची येथे लोकार्पण केले होते. भारताच्या स्वावलंबनाच्या मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आत्मनिर्भरता’म्हणजे अलगाव नसल्याचं राजनाथ सिंह यांनी  स्पष्ट केलं,  संपूर्ण जगाला आशा आणि दिलासा देण्याचा भारताचा संकल्प आहे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. “आज जगाला हे समजले आहे की, मॅन्युफॅक्चरिंग हब (उत्पादन केंद्र)कोणत्याही एका देशात नसावेत. बदललेल्या परिस्थितीत, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या ( MNCs) त्यांच्या उत्पादनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहेत. भारताने तो शोध तर पूर्ण केलाच, पण या उत्पादन निर्मिती बदलांमध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याची क्षमता आहे, अशी आशाही दिली आहे. भारत हा जागतिक आशावादाचा केंद्रबिंदू आहे. आमच्याकडे संधींचा महासागर, अनेक पर्याय आणि मोकळेपणाची भावना आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोकळ्या मनाने संधींचे नवीन दरवाजे उघडतो. आमचे ध्येय राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे आणि त्याच वेळी आमच्या मित्र देशांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे हे आहे. आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’,” असही ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा मजबूत अर्थव्यवस्था बनण्यास सुरुवात केली आणि सध्याचे सरकार ‘राष्ट्र प्रथम’ (नेशन फर्स्ट) ही त्यांची संकल्पना पुढे नेत आहे. “अटलजींच्या नेतृत्वाखालीच देश विकासाच्या मार्गावर परतला. त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि गरिबांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले; महागाई नियंत्रणात आणली आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांच्या पुढे नेला. आता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या आठ वर्षांत प्रक्रियात्मक तसेच संरचनात्मक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. कालबाह्य कायदे बदलून देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सोबतच आमचा भर देशात ‘इज ऑफ लिव्हिंग’ वाढवण्यावर आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत,” ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या आणि धाडसी निर्णयांचे कौतुक केले, ज्याने जगामध्ये भारताची प्रतिमा एका मूक निरीक्षकापासून प्रतिज्ञाकर्ता आणि प्रदाता अशी बदलली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात, आम्ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आम्ही केवळ आमच्या नागरिकांचे संरक्षण केले नाही तर इतर देशांनाही मदत केली. सुमारे 100 देशांना कोविड लस, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आमच्या पंतप्रधानांनी अमेरिका, रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला आणि ‘ऑपरेशन गंगा’ द्वारे आम्ही सुमारे 22,500 भारतीय नागरिकांना युद्धक्षेत्रातून सोडवण्यात यशस्वी झालो. हे भारताची मुत्सद्देगिरी, विश्वासार्हता आणि नेतृत्वाची गुणवत्ता प्रतिबिंबित करते,” ते म्हणाले.

देशवासीयांमधील एकता आणि देशभक्ती हे देशातील वेगाने होत असलेल्या विकासामागील एक प्रमुख कारण असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्राला हृदय आणि मनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.देशाला अधिक उंचीवर नेण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्तम साहित्य निर्मितीसाठी मनाची मशागत आवश्यक : स्वाती महाळंक

वल्लरी प्रकाशनच्या ‘गुलबक्षी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे : मनात दाटलेले...

टाटा स्मॉल कॅप फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक पुन्हा सुरू

मुंबई, 14एप्रिल 2026: टाटा म्युच्युअल फंडने ६ एप्रिल २०२६ पासून 'टाटा स्मॉल कॅप फंड'मध्ये 'लम्पसम' आणि 'स्विच-इन' द्वारे सर्व नवीन गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्मॉल-कॅप श्रेणीतील निधीचे योग्य नियोजन आणि लिक्विडिटी (तरलता) राखण्यासाठी फंड हाऊसने एकरकमी गुंतवणुकीवर तात्पुरती बंदी घातली होती, जी आता उठवण्यात आली आहे. हा बदल भविष्यातील गुंतवणुकीसाठी लागू असेल आणि तो योजनेच्या माहिती पुस्तिकेचा (SID आणि KIM) अविभाज्य भाग राहील.   याविषयी बोलताना टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणाले, “गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याचा आमचा निर्णय हा सध्याच्या बाजारपेठेतील संधींवरील आमचा विश्वास आणि मजबूत आर्थिक स्थिती व शाश्वत वाढ असलेल्या कंपन्या निवडण्याच्या आमच्या क्षमतेवर आधारित आहे. या श्रेणीत चढ-उतार होणे स्वाभाविक असले, तरी अलीकडच्या घसरणीमुळे दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य स्तरावर गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.”   बाजारातील अलीकडच्या चढ-उतारामुळे स्मॉल-कॅप शेअर्सच्या किमती आणि व्हॅल्युएशनमध्ये सुधारणा झाली आहे, ज्यामुळे या सेगमेंटमधील गुंतवणुकीचा दर आता अधिक वाजवी स्तरावर आला आहे. या बदलामुळे मूलभूतपणे भक्कम कंपन्या आता चांगल्या किमतीत उपलब्ध आहेत, जे आमच्या 'बॉटम-अप' गुंतवणूक पद्धतीसाठी योग्य आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप क्षेत्रात गुंतवणुकीची संधी मिळावी यासाठी ही योजना एकरकमी गुंतवणुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.   योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती, तसेच रिस्क-ओ-मीटरमध्ये कोणताही बदल होणार नाही. गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करावी, कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते आणि गुंतवणुकीपूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

बिर्लास्टुडिओज आणि वी ची भागीदारी:भारतातील पहिले ‘मोबाईल-फर्स्ट’ टॅलेंटहंट’रील सेरिअल स्टार’ आयोजित करणार

मुंबई, १४ एप्रिल, २०२६: बिर्ला स्टुडिओजने वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या सहयोगाने 'रील से रिअल स्टार' (Reel Se Real Star) हा उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली. 'मोबाईल फर्स्ट' अभिनय टॅलेंट शोधणारे हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे. भारतीय मनोरंजन सृष्टीतील संधींची दारे सर्वांसाठी खुली करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 'ओळख आणि संधी' हे मुख्य ध्येय उराशी बाळगून, 'रील से रिअल स्टार' हे व्यासपीठ भौगोलिक मर्यादा, चित्रपटसृष्टीत प्रवेशाच्या आड येणारे अडथळे दूर करत आहे – स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सिनेमाचे दरवाजे खुले होणार आहेत.   हा उपक्रम एका साध्या पण अत्यंत प्रभावी विचारावर आधारलेला आहे: "कला ही कोणा एकाची मक्तेदारी नसते, ती कोणातही असू  शकते आणि प्रत्येक प्रतिभेला व्यासपीठ मिळायलाच हवे." या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना बिर्ला स्टुडिओजच्या संस्थापिका आणि अध्यक्षा अनन्या बिर्ला म्हणाल्या: "अनेकदा योग्य प्रतिभेला हवी तशी संधी मिळत नाही—आणि याच कमतरतेमुळे अनेक होतकरू कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून वंचित राहतात. आजच्या काळात उपलब्ध असलेल्या प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी आणि वोडाफोन आयडियाचे (वी) देशव्यापी जाळे यांच्या मदतीने, आम्ही पारंपारिक मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहोत. चित्रपटसृष्टीची दारे सर्वांसाठी कशी खुली करता येतील, याचा नव्याने विचार करण्याची ही एक उत्तम संधी आहे. 'रील से रिअल स्टार' हा आमचा एक असा प्रयत्न आहे, जिथे देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीमधील कलागुणांचा शोध घेतला जाऊ शकतो आणि संधी मिळवण्यासाठी परिस्थितीचा अडथळा येणार नाही. कारण आम्ही असे मानतो की, प्रत्येक प्रतिभेला स्वतःला सिद्ध करण्याची एक खरी संधी मिळायलाच हवी." वोडाफोन आयडियाची (वी) अफाट डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील तसेच सांस्कृतिक दृष्टी यांचा मेळ घालत, भारतातील सर्वात अस्सल आणि वैविध्यपूर्ण 'ॲक्टिंग टॅलेंट पाईपलाईन' निर्माण करण्याचे या व्यासपीठाचे ध्येय आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान असूनही वंचित राहिलेले कलाकार मनोरंजन सृष्टीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील. वोडाफोन आयडियाचे (वी) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजित किशोर म्हणाले, "कनेक्टिविटी तेव्हाच सर्वात अर्थपूर्ण ठरते जेव्हा ती संधी निर्माण करते. 'रील से रिअल स्टार' हे व्यासपीठ देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना 'ऑडिशन रूम' थेट त्यांच्या हातात आणून देईल. चित्रपटसृष्टीतील प्रवेशाच्या आड येणारे पारंपारिक अडथळे मोडीत काढणार आहे. आमचे भक्कम नेटवर्क, २० कोटींहून अधिक युजर्सपर्यंत असलेली आमची डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी यांच्या जोरावर, आम्ही संपूर्ण भारतात प्रतिभा शोधण्याच्या प्रक्रियेचे 'लोकशाहीकरण' करत आहोत. आमचे ध्येय साधे आहे: प्रतिभेला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसाव्यात आणि तिचा शोध कुठूनही घेतला जावा— मग ते गजबजलेले महानगर असो किंवा दुर्गम गाव. आम्ही केवळ एक व्यासपीठ तयार करत नाही आहोत, तर लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची एक खरी संधी देत आहोत." ही मोहीम संपूर्ण देशभरात चालवली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण भारतभरातील उदयोन्मुख कलाकारांना संपूर्णपणे डिजिटल, ॲप आणि वेब-आधारित प्रक्रियेद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. यात सहभागी होणारे कलाकार आपल्या ऑडिशन्स थेट अपलोड करू शकतील, ज्यामुळे सिनेसृष्टीतील कोणाच्याही ओळखीची गरज आता उरलेली नाही. 'रील से रिअल स्टार' मध्ये जनसहभाग आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा एक अनोखा संगम घडून येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची पारख नामवंत दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज करतील, तसेच त्यांना बहुमोल मार्गदर्शन देखील करतील. यामुळे या उपक्रमाची विश्वासार्हता आणि कलात्मक दर्जा जपला जाईल. भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे एक सुवर्णसंधी — एका नामांकित दिग्दर्शकासोबत चित्रपटात काम करण्याची! हा उपक्रम येत्या काही महिन्यांत 'वी' (वोडाफोन आयडिया) ॲपवर सहभागासाठी उपलब्ध होईल. सध्या, इच्छुक कलाकार बिर्ला स्टुडिओज किंवा वी च्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात.