Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भविष्य निर्वाह निधी खात्यांचे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन उपलब्ध

Date:

मुंबई, दि 29 : भविष्य निर्वाह निधीधारक राज्य शासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन 2021-22 या वर्षातील खात्याचे वार्षिक विवरणपत्र (स्लिप्स) प्रधान महालेखापाल कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भविष्य निर्वाह निधीधारकांनी हे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळवावे, असे आवाहन उपमहालेखापाल (निधी) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील भविष्य निर्वाह निधीधारक सन 2021-22 या वर्षाचे वार्षिक विवरणपत्र पाहण्यासाठी/ डाऊनलोड करण्यासाठी/ प्रिंटिंगसाठी सेवार्थ प्रणालीच्या संकेतस्थळास भेट देऊ शकतात. राज्य शासनाने वर्ष 2019-20 पासून मूळ प्रती देणे बंद केले आहे. जीपीएफ खात्यासंदर्भात विवरणपत्रामध्ये विसंगती अथवा त्रुटी आढळल्यास उप महालेखापाल आणि प्रधान महालेखापाल कार्यालयाशी संपर्क साधावा. जमा आणि वजावटीतील तफावत, जन्म दिनांक आणि नियुक्तीची तारीख विवरणपत्रावर छापील नसल्यास या नोंदीच्या पडताळणी आणि अद्ययावतीकरणासाठी प्रधान महालेखापाल यांच्या कार्यालयात पाठवाव्यात. तसेच agaeMaharashtra1@cag.gov.in हा ईमेल पत्ताही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 2 रा मजला, प्रतिष्ठा भवन, न्यु मरीन लाईन्स, १०१, महर्षि कर्वे मार्ग मुंबई ४०० ०२० या पत्त्यावर तसेच, 022-22039680 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...