दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात बोरिवलीमध्ये आंदोलन

Date:

मुंबई दि. २४ – कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम स्थानकाबाहेर आज शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा टोकाचे उग्र आंदोलन करू, असा इशारा प्रविण दरेकर यांनी आदोलनावेळी दिला.
राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य हक्कासाठी भाजप पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलनानंतर कोरोनाच्या लसीचे दोन डस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी याकरता बोरिवली स्टेशन मास्तर घोष यांना याबाबत निवेदन दिले. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, श्री. प्रकाश दरेकर यांच्यासह नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे केली होती. परंतु राज्य सरकारने अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही याकरता भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लोकांना कोविड काळात काम नाही. मुंबईत कामाकरता खाजगी वाहनांनी येण्यासाठी रोज ७०० -८०० रुपये मोजावे लागत आहेत. बसने येण्यासाठी नागरिकांना तीन ते चार तास लाईनमध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. जर बसमध्ये प्रवास करण्यास मुभा आहे तर रेल्वेने प्रवास करण्यास मुभा का नाही? नागरिकांचे खाजगी वाहन व बसने प्रवास करताना त्रासाला समोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत सामान्य चाकरमन्यांची नोकरी धोक्यात येत असून सर्वसामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून? असा सवाल दरेकर यांनी केला.
कोरोनाच्या महामारीमुळे रेल्वे सर्वसामान्यांना बंद करण्यात आली होती. पण जनता कोरोनाने मरणार नाही तर उपमासमारीने मरेल. मुख्यमंत्री अहंकारापोटी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत नाहीत. अनेक पक्षांतील नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे रेल्वे सुरू करण्याची मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्री काही केल्या ऐकायला तयार नसून हे अहंकारापोटी केले जात आहे. हे सरकार निष्क्रिय आणि उदासीन आहे असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.
प्रविण दरेकर यांनी सांगितले की, आम्ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही रेल्वे सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. रेल्वे हा केंद्राचा विषय आहे. पण आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याला अधिकार आहेत. राज्याने अनुकुलता दर्शविल्यास व निर्णय घेतल्यास रेल्वेची तशी तयारी आहे. पण केवळ अहंकारापोटी मुंबईची लाईफलाईन सुरू केली जात नाही. आजचे आंदोलन ही तर केवळ सुरुवात आहे, या पुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, रेल्वे सुरू करण्यासाठी आघाडी सरकारने तोडगा काढावा, इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात भाजपच्या कॉंग्रेसभवन वरील हल्लाबोल आंदोलनासमयी दगडफेक: कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी

पुणे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती...

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...

पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, मग त्यांच्याशी क्रिकेट खेळता कसे?:राष्ट्रभक्ती की ढोंग?

मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट...