प्रदीर्घ काळानंतर बालगंधर्व मध्ये निनादली तिसरी घंटा

Date:

पुणेः- कोरोना महामारीचे काळे ढग दूर सारून नाट्य कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात पुन्हा एकदा इंद्रधनुष्य खुलेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गो-हे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून सर्व नाट्यगृह आजपासून सुरु होत आहेत, ह्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणेतर्फे नटराज पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, अभिनेत्री लीला गांधी आदी सिने-नाट्य सृष्टीतील कलाकार, रंगमंच मागील कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्य़ संख्येने उपस्थित होते.

डाॅ.नीलम गो-हे पुढे म्हणाल्या, कोरोना सारख्या महामारी मुळे गेली दीड-दोन वर्षे सांस्कृतिक क्षेत्र झाकोळले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घडणा-या पुणेकरांना घरात कोंडून घ्यावे लागले. यामुळे कलाकार तर त्रस्त झालेच त्याच बरोबर रसिक पुणेकरांना देखील खूप त्रास झाला. या काळात अनेकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले. लोकांनी आत्महत्या सारखे पाऊल लावण्यापर्यंत विचार केला. पंरतू हा सगळा नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करायचे आहे.

संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे म्हणाले, आज केवळ नाट्यगृहाचे द्वार उघडलेले नसू आज\कलाकारांच्या आशचेद्वार उघडलेले आहे. गेली दोनवर्षे नाट्यगृह बंद आणि सांस्कृतिक क्षेत्राला जणूकाही आणिबाणिच लागली होती. तो काळ आता सरला असून आता नव्या उमेदिने नटराजाची सेवा करायची.

अभिनेत्री लीला गांधी कलाकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा दिवस असून आता थांबायचे नाही. भविष्यात कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी परमेश्र्वर चरणी प्राथना आहे. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...