अमेरिका-भारत दरम्यानचे व्यावसायिक संबंध विकसित करून अमेरिका आणि भारतातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात त्यांनी बजावलेल्या परिवर्तनशील भूमिकेचा सन्मान
गुरुग्राम – यू.एस.-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने (यूएसआयएसपीएफ) वॉशिंग्टन येथे झालेल्या आपल्या पहिल्या वार्षिक लीडरशिप समिटमध्ये १२ जुलै रोजी स्पाईसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अजय सिंह यांना `यूएसआयएसपीएफ लीडरशिप पुरस्कार` देऊन गौरव केला. अमेरिका आणि भारतादरम्यानचे व्यावसायत वृद्धी तसेच सहकार्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच परिवर्तनशील नेतृत्त्व आणि लोकसेवेतील त्यांच्या लक्षणीय योगदानाबद्दल फोरमने त्यांचा हा गौरव केला.
कॅटरपिलर इनकॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. जिम उमप्लेबी III यांचा देखील लीडरशिप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमेरिका-भारत दरम्यानचे व्यावसायिक संबंध दृढ करून अमेरिका आणि भारतातील नागरिकांचे जीवनमान प्रगतीशील करण्यात त्यांनी बजावलेल्या परिवर्तनशील भूमिकेबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला.
अमेरिका आणि भारतादरम्यानची धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने वॉशिंग्टन येथे वार्षिक लीडरशिप समिट आयोजित करण्यात आले होते. `धोरणात्मक भागीदाराचे बळकटीकरण` (स्ट्रेन्थनिंग दी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) ही या वर्षीच्या समिटचे विषयसूत्र होते.
`हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले आहे. स्पाईसजेट हा यूएसआयएसपीएफचा प्रवास आणि दृष्टीकोनाचा हिस्सा बनला आहे. आपल्या अथक मेहनतीने मरणासन्न कंपनीला नवसंजीवनी देऊन अवघ्या तीन वर्षांत जगभराच्या प्रशंसेला प्राप्त ठरणारी कंपनी बनविणाऱ्या स्पाईसजेटशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा ही सन्मान आहे. स्पाईसजेटचे हे यश भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मजबूत आणि वृद्धींगत होणाऱ्या संबंधांचे प्रतीक आहे. ही तर फक्त सुरुवातच आहे; नजीकच्या काळात एकत्रितपणे उंच भरारी घेण्याकडे आमचे उद्दीष्ट आहे,` असे स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंग म्हणाले.
श्री. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली स्पाईसजेटने बोईंगकडे अरुंद (नॅरो) आणि रुंद (वाईड) आकाराची विमाने बनविण्याची ऑर्डर दिली असून बोईंगच्या इतिहासातील नव्या विमानांची ही सर्वात मोठी मागणी आहे. या विमानांती ऑर्डर देऊन अमेरिकेत हजारोंसाठी रोजगार उपलब्ध केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी स्पाईसजेटची प्रशंसा केली आहे. स्पाईसजेटने दिलेल्या ऑर्डरमध्ये ५० बॉम्बर्डिअर क्यू४०० विमानांचा समावेश असून बॉम्बर्डिअरच्या इतिहासात क्यू४००साठी आलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
भारत सरकारचे अधिकारी, अमेरिका आणि भारतातील प्रमुख उद्योगपती आणि अमेरिकेतील सरकारी अधिकारी यानिमित्ताने एकत्र येऊन त्यांनी गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.
सुमारे ३०० ज्येष्ठ उद्योगपती आणि गुंतवणूकदार या समिटला उपस्थित होते. वॉलमार्ट, डाऊ, बोईंग इंटरनॅशनल, अॅबॉट, अॅम्वे आणि बँक ऑफ अमेरिका या कंपन्यांसह अमेरिका आणि भारताच्या उद्योग क्षेत्र तसेच सरकारचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी होऊन अमेरिका आणि भारत या दोन देशांदरम्यानची भागीदारी किती महत्त्वपूर्ण आहे, याबद्दल आपली मते मांडली. शिवाय, तसेच लोकशाही, सुरक्षेबरोबरच रोजगारनिर्मिती, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उद्योग आणि सरकारमध्ये शाश्वतता निर्माण करून आर्थिक विकासाला गती देण्याबाबत त्यांनी चर्चा केली.
या समिटला भारताकडून अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना, नीति आयोगाचे व्हाईस-चेअरमन राजीव कुमार तर, अमेरिकेकडून सिनेटर रॉब पोर्टमॅन (R-OH); यूएसडीएचे व्यापार आणि परराष्ट्र कृषीव्यवहारविषयक अंडर सेक्रेटरी टेड मॅककिने; डेप्युटी यूएस ट्रेड प्रतिनिधी जेफ्री गेरिश आणि सिनेट इंडिया कॉकसचे सहअध्यक्ष सिनेटर मार्क वॉर्नेर (D-VA) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यूएसआयएसपीएफचे चेअरमन तसेच सिस्कोचे माजी कार्यकारी चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व जेसी२ व्हेन्चर्सचे संस्थापक जॉन चेम्बर्स यांच्याबरोबर माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांची रंगलेली चर्चा ही यावर्षीच्या समिटचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
भारताने साधलेल्या अभूतपूर्व जागतिक आर्थिक प्रगतीचा मागोवा समिटमध्ये घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने विकास करीत असून ग्राहक अर्थव्यवस्थेत लवकरच तिसरे स्थान प्राप्त करीत असून व्यापार, तंत्रज्ञान आणि नाविन्यता याबाबतीत अमेरिका भारताशी संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे. संघटना स्थापन झाल्याच्या पहिल्या वर्षातच अमेरिका आणि भारतातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यूएसआयएसपीएफ हे उभय देशांमधील भागीदारी आणखी वृद्धींगत करण्याचे एक माध्यम बनली आहे.
स्पाईसजेट लि.बद्दल माहिती –
स्पाईसजेट ही भारताची सर्वाधिक पसंतीची एअरलाइन असून कंपनीने आधी कधीही नव्हे, इतक्या वाजवी किमतीत अधिकाधिक भारतीयांना हवाई सफर घडवत आहे. स्पाईसजेटकडून दिवसाला ५५ ठिकाणी जाणाऱ्या सरासरी ४१२ विमानसेवा सुरू असून त्यात ४८ राष्ट्रीय आणि ७ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे. या एअरलाइनच्या ताफ्यात ३६ बोईंग ७३७एजी आणि २२ बॉम्बार्डिअर क्यू-४०० विमाने आहेत. बहुतांश विमानांमध्ये `स्पाइसमॅक्स` उपलब्ध करण्यात आले असून भारतातील इकॉनॉमी क्लासमधील आसनव्यवस्थेतील ही सर्वात प्रशस्त व्यवस्था आहे.
देशातील सर्वात पसंतीची एअरलाइन असलेल्या स्पाईसजेटचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यात `बीएमएल मुंजल अॅवॉर्ड २०१८`चा समावेश असून `बिझनेसे एक्सलेन्स थ्रू लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेन्ट`साठी हा सन्मान देण्यात आला. विंग्ज इंडिया २०१८मध्ये `उत्कृष्ट राष्ट्रीय एअरलाइन` पुरस्कार तर अर्नस्ट अॅण्ड यंगकडून परवर्तनशील व्यावसायाबद्दल `२०१७ वर्षातील उद्योजक` पुरस्काराने स्पाईसजेटला गौरविण्यात आले. याशिवाय, २०१६ या आर्थिक वर्षात वेगवान विकास साधल्याबद्दल सीएपीए चेअरमनच्या ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये समावेश, सिंगापूर येथे झालेल्या एशियावन अॅवॉर्ड सोहळ्यात `आशियातील सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड २०१६`, `ग्लोबल एशियन ऑफ दी ईयर अॅवॉर्ड` आणि `एशियाज् ग्रेटेस्ट सीएफओ २०१६` या पुरस्कारांनी स्पाईसजेटला सन्मानित करण्यात आले. डब्ल्यूटीएम लंडनमध्ये `वर्ल्ड ट्रॅव्हल लीडर्स अॅवॉर्ड`, लास वेगासमध्ये प्युचर ट्रॅव्हल एक्सपिरिएन्स या जागतिक पुरस्कार सोहळ्यात `बेस्ट चेक-इन इनिशिएटिव्ह` पुरस्कार आणि अॅसोचेमच्या १०व्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात (नागरी हवाईसेवा आणि पर्यटन) `उत्कृष्ट राष्ट्रीय एअरलाइन` पुरस्काराने गौरविण्यात आले.
यूएस – इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमबद्दल माहिती –
अमेरिका आणि भारतादरम्यान अतिशय मजबूत अशी धोरणात्मक भागीदारी तयार करण्याच्या दृष्टीने यूएस – इंडिया स्टॅटेजिक पार्टनरशिप फोरम वचनबद्ध आहे. यामध्ये उभय देशांमधील व्यापाराला प्रोत्साहन देणे हा प्रमुख भाग असला तरी, याच्या पलीकडे जाऊन उभय देशांमधील अधिक संबंध दृढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. नव्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध करण्यासाठी व्यवसाय आणि सरकार हे एकत्र आल्यास नागरिकांचे राहणीमान उंचावेल, असा आमचा प्रयत्न आहे.
वॉशिंग्टन येथे मुख्यालय असलेल्या यूएसआयएसपीएफची न्यूयॉर्क, सिलिकॉन व्हॅली, मुंबई आणि नवी दिल्लीत कार्यालये आहेत.