महिंद्रातर्फे नवी आलीशान एक्सयूव्ही500 दाखल

Date:

 

12.32 लाख रुपये या नव्या किमतीपासून (W5 प्रकारासाठी एक्स-शोरूम मुंबई)

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या समूहाचा भागअसलेल्या कंपनीने आकर्षक  डिझाइन, आलीशान, ऐसपैस इंटेरिअर व अधिक शक्ती व टॉर्क या वैशिष्ट्यांमुळे प्रीमिअमएसयूव्ही श्रेणीमध्ये ठसा उमटवणारी नवी आलीशान एक्सयूव्ही500 दाखल केल्याचे आज जाहीर केले. वाढीव सस्पेन्शनमुळेहे वाहन चालवण्याचा अधिक आनंद मिळतो, तसेच त्यामध्ये आवाजरहित केबिनही आहे. 12.32 लाख रुपयांपासून (W5
प्रकारासाठी एक्स-शोरूम मुंबई) किंमत असलेली ही गाडी महिंद्राच्या भारतभरातील डीलरशिपमध्ये तातडीने उपलब्ध होणारआहे.
नवी आलीशान एक्सयूव्ही500 दाखल करण्याविषयी, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरायांनी सांगितले, “2011 मध्ये दाखल करण्यात आल्यापासून, एक्सयूव्ही500ने आकर्षक शैली, अत्याधुनिक वैशिष्ट्ये,
अप्रतिम कामगिरी व सर्वोत्तम सुरक्षा यामुळे प्रीमिअम एसयूव्ही श्रेणीमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला आ हे. एक्सयूव्ही500नेभारतात 12 ते 18 लाख रुपये या किमतीच्या दरम्यान प्रीमिअम एसयूव्ही श्रेणीची निर्मिती केली आहे व तेव्हापासून नवेपायंडे पाडणे व चाकोरी मोडणे या बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे. आज, नवी आलीशान एक्सयूव्ही500 दाखल करूनआम्ही लक्झरी व स्टाइल या बाबतीत नवे बेंचमार्क निर्माण करून या वाहनाचे महत्त्व अधिक वाढवले आहे. अधिकप्रीमिअम व आलीशान गाडीबद्दल ग्राहकांची वाढती आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने या गाडीचे डिझाइन केले आहे.”नव्या आलीशान एक्सयूव्ही500ने वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये समाविष्ट करून नवे बेंचमार्क निर्माण केले असून ते पुढीलप्रमाणे
आहेत:
 डॅशबोर्ड व डोअर-ट्रिम्सवर सॉफ्ट-टच लेदर
 आलिशन क्विल्टेड टॅन लेदर सीट
 या उद्योतील पहिलीवहिली स्मार्ट वॉच कनेक्टिविटी
 सिक्स्थ जनरेशन इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोचार्जर (eVGT)
 या उद्योगातील पहिली कनेक्टेड अॅप्स व इकोसेन्स टेक्नालॉजी
 आर्केमिज असलेला ऑडिओ
 डायमंड-कट 45.72 सेमी (235/60 R18) अलॉय व्हील्स

यापेक्षा दुप्पट किंमत असलेल्या वाहनांमध्येही न आढळणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये या गाडीतही आहेत. 6 एअरबॅग्ज,
ईबीडीसह एबीएस, रोलओव्हर मिटिगेशनसह ईएसपी, हिल होल्ड व हिल डिसेंट कंट्रोल आणि सर्व चाकांवर डिस्क ब्रेकयामुळे ही गाडी  अतिशय सुरक्षित आहे. तसेच, एक्सयूव्ही500 मध्ये ईमर्जन्सी कॉलिंग हे या श्रेणीतील पहिले सुरक्षाविषयकवैशिष्ट्य आहे.
ऑप्शनल पॅकसह W5, W7, W9, W11 व W11 OPT या 5 डिझेल प्रकारांत उपलब्ध असलेली नवी एक्सयूव्ही500
ग्राहकांना G AT हा गॅसोलिन पर्यायही देते. हे वाहन W7 AT, W9 AT, W11 AT, W11 OPT AT व W11 OPT
AWD AT या डिझेल ऑटोमॅटिक प्रकारांतही मिळेल. ग्राहकांना 7 आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...